शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

बाभळी बंधाऱ्याच्या पाण्याबाबत तेलंगणाची अडेलतट्टू भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2020 19:54 IST

बाभळीत निर्धारित वेळेपूर्वी पाणीसाठा करू देण्याबाबत तेलंगणा सरकार नकारात्मक भूमिकेतच आहे. 

ठळक मुद्देमुख्यमंत्री, सचिवांच्या पत्रांना उत्तर देईनात दीडशे टीएमसी पाणी समुद्रात

- अनुराग पोवळे

नांदेड : पोचमपाड धरणातून दीडशे टीएमसी पाणी समुद्रात सोडून दिल्यानंतरही बाभळी बंधाऱ्यात केवळ २.७४ टीएमसी पाणी अडवू देण्याबाबत तेलंगणा सरकारने अडेलतट्टू भूमिका घेतली  आहे.  राज्याच्या सचिवांनी आणि त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लिहिलेल्या पत्राला तेलंगणा सरकारने कोणताही प्रतिसाद दिला नाही. या भूमिकेतून बाभळी बंधाऱ्याबाबतचा तेलंगणाचा आकस कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मराठवाड्यातील सर्वच बंधारे, धरणे परतीच्या पावसाने भरल्याने गोदावरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जात आहे. तिकडे तेलंगणातील पोचमवाड धरणही १०० टक्के भरल्याने या धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरूच आहे. त्यामुळे दोन्ही राज्याच्या संमतीने बाभळीचे दरवाजे २९ आॅक्टोबरपूर्वीच बंद करण्याबाबत तेलंगणा राज्याशी चर्चा करण्यात येईल अशी भूमिका पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी घेतली होती. याबाबत चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे  पाठपुरावा केला. 

महाराष्ट्राच्या सचिवांनी तेलंगणा राज्याच्या सचिवांना २० दिवसापूर्वी याबाबत एक पत्र लिहिले. त्याला प्रतिसाद न मिळाल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आठ दिवसांपूर्वी स्वत: तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना पत्र लिहिले. मात्र त्यांच्या पत्रालाही प्रतिसाद दिला नाही.  नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, अधीक्षक अभियंता एस.के. सब्बीनवार यांनीही याविषयात निझामाबाद जिल्हा प्रशासनासह तेलंगणा सरकारशी पत्रव्यवहार केला होता. धर्माबाद तालुक्यातील बाभळी येथे २९ आॅक्टोबर २०१४ रोजी पूर्ण झालेल्या २.७४ टीएमसी क्षमतेच्या या बंधाऱ्याच्या वादात सर्वोच न्यायालयाने १ जुलै रोजी बंधाऱ्याचे दरवाजे उघडावेत आणि २९ आॅक्टोबर रोजी दरवाजे बंद करावेत असा निर्णय दिला आहे. 

५ हजार ५०० दलघमीपाणी तेलंगणातमराठवाड्यातील जायकवाडीसह सर्वच प्रकल्प तुडुंब भरल्यामुळे आतापर्यंत विष्णूपुरी प्रकल्पातून ५ हजार ५०० दलघमीहून अधिक पाणी तेलंगणात सोडले. हे पाणी थेट निझामाबाद जिल्ह्यातील पोचमपाड  धरणात पोहोचते. पोचमपाड धरणही १०० टक्के भरल्याने या धरणातून दीडशे टीएमसी पाणी समुद्रात सोडून दिले आहे. मात्र, बाभळीत निर्धारित वेळेपूर्वी पाणीसाठा करू देण्याबाबत तेलंगणा सरकार नकारात्मक भूमिकेतच आहे. 

टॅग्स :NandedनांदेडDamधरणTelanganaतेलंगणा