शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

सहस्त्रकुंड धबधब्यावर ‘ नो सेल्फी’ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 00:59 IST

विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवरील हिमायतनगर तालुक्यात असलेला सहस्त्रकुंड धबधबा पाहण्यासाठी दरवर्षी पावसाळ्यात हजारो पर्यटक येतात़ काही जण धबधब्याचे मनोहारी दृश्य आपल्या कॅमेऱ्यात टिपण्यासाठी प्रयत्नशील असतात़ परंतु, काही हौशी पर्यटक जीव धोक्यात घालून सेल्फीचा प्रयत्न करतात़ अशाप्रकारे सेल्फी घेण्याच्या प्रयत्नात आजपर्यंत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे़ त्यामुळे यापुढे सहस्त्रकुंड धबधब्यावर सेल्फीला बंदी घालण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत़

ठळक मुद्देपोलीस अधीक्षकांचे आदेश : अतिउत्साही तरुण मंडळींना चाप आवश्यक

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवरील हिमायतनगर तालुक्यात असलेला सहस्त्रकुंड धबधबा पाहण्यासाठी दरवर्षी पावसाळ्यात हजारो पर्यटक येतात़ काही जण धबधब्याचे मनोहारी दृश्य आपल्या कॅमेऱ्यात टिपण्यासाठी प्रयत्नशील असतात़ परंतु, काही हौशी पर्यटक जीव धोक्यात घालून सेल्फीचा प्रयत्न करतात़ अशाप्रकारे सेल्फी घेण्याच्या प्रयत्नात आजपर्यंत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे़ त्यामुळे यापुढे सहस्त्रकुंड धबधब्यावर सेल्फीला बंदी घालण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत़पावसाळा सुरु होताच राज्यभरात धबधब्याच्या ठिकाणी आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची गर्दी होते़ जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाला असलेला सहस्त्रकुंड धबधबाही त्याला अपवाद नाही़ या ठिकाणी दरवर्षी पावसाळ्यात हजारोंच्या संख्येने पर्यटक येतात़ या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षा कठडे उभारण्यात आले आहेत़ परंतु, अनेक पर्यटक जीव धोक्यात घालून कठडे ओलांडतात़ काही हौशी तरुण सेल्फी घेण्यासाठी वाट्टेल तो प्रयोग करतात़ त्यातून दरवर्षी या ठिकाणी अनेकांना आपला जीव गमवावा लागतो़ काही दिवसांपूर्वीच सेल्फी घेण्याच्या प्रयत्नात दोघे जण धबधब्यात पडले होते़ जीवरक्षक दल व आपत्ती व्यवस्थापनच्या जवानांच्या सतर्कतेमुळे त्यांचा जीव वाचला होता़ सध्या सहस्त्रकुंड धबधबा प्रवाही झाला असून यावेळी सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी धबधब्याजवळ सेल्फी घेण्यास बंदी घातली आहे़ पर्यटकांनी पाण्यात उतरु नये, वाहत्या पाण्याजवळ जावू नये, धबधबा पाहण्यासाठी असलेल्या पादचारी पुलाचा पर्यटकांनी वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे़---अशी घ्या खबरदारी...पर्यटकांनी पाण्याच्या प्रवाहात उतरु नये़ धबधब्याजवळ जावून सेल्फी घेवू नये़ धबधब्यात मोठे व खोल कुंड असल्याने पर्यटकांनी आत उतरुन पोहण्याचे धाडस करु नये़ सोबतचे मुले व वयोवृद्ध व्यक्तींना धबधब्याजवळ जावू देवू नये़ धबधबा पाहण्यासाठी माहीतगार सोबत ठेवावा़

टॅग्स :NandedनांदेडWaterपाणी