शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

निराधारांचे अनुदान आता थेट खात्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 00:17 IST

जिल्ह्यात निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचे आयसीआयसीआय बँकेकडून बायोमेट्रीक पद्धतीने अनुदान वाटप करण्यात येत आहे. मात्र मागील वर्षभरापासून बायोमेट्रीक मशीनवर वृद्ध निराधारांचे बोटाचे ठसे उमटत नसल्याने त्यांचे अनुदान रखडले होते. अशा निराधारांचे अनुदान आता थेट बँक खात्यावर जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले आहेत.

ठळक मुद्देअडीच हजार लाभार्थ्यांचे ठसे उमटत नसल्याची अडचण

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : जिल्ह्यात निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचे आयसीआयसीआय बँकेकडून बायोमेट्रीक पद्धतीने अनुदान वाटप करण्यात येत आहे. मात्र मागील वर्षभरापासून बायोमेट्रीक मशीनवर वृद्ध निराधारांचे बोटाचे ठसे उमटत नसल्याने त्यांचे अनुदान रखडले होते. अशा निराधारांचे अनुदान आता थेट बँक खात्यावर जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले आहेत.शासनाच्या निर्देशाप्रमाणे निराधार योजनेतील लाभार्थ्यांचे अनुदान आयसीआयसीआय बँकेकडून बायोमेट्रीक पद्धतीने थेट गावात जावून वाटप केले जात होते. मात्र काही लाभार्थ्यांच्या बोटाचे ठसे बायोमेट्रीक मशीनवर उमटत नव्हते. परिणामी मागील वर्षभरापासून अशा जवळपास ४ हजारांहून अधिक निराधारांचे अनुदान वाटप रखडले होते. याबाबत शासनस्तरावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरूच होते. मात्र निराधार अनुदानाअभावी आर्थिक विवंचनेत सापडले होते.बोटाचे ठसे उमटत नसल्याच्या अडचणीच्या अनुषंगाने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने बैठक घेऊन ज्या लाभार्थ्यांचे बायोमेट्रीक मशीनवर ठसे उमटत नाहीत, अशा लाभार्थ्यांचे अनुदान त्यांच्या आधार संलग्न बँकामध्ये जमा करण्याचे आदेश दिले. बँकेमार्फत हे अनुदान आता वाटप होणार आहे.या आदेशानंतर जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांनी २ हजार ३५२ लाभार्थ्यांचे प्रलंबित अनुदान त्या निराधारांच्या बँक खात्यात वर्ग केले आहेत. मात्र अजूनही १ हजार ८५२ निराधारांचे बँकेमध्ये वर्ग करण्याची प्रक्रिया तहसीलस्तरावर सुरूच आहे.ज्या लाभार्थ्यांना बायोमेट्रीक पद्धतीने निराधार योजनेचे अनुदान प्राप्त झाले नाही अशा लाभार्थ्यांनी आपले आधार व बँक खात्याची झेरॉक्स त्या त्या तहसील कार्यालयात जमा करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.जिल्ह्यात संजय गांधी योजनेचे २१ हजार ५५० लाभार्थी आहेत तर श्रावणबाळ योजनेचे ३७ हजार १३५ लाभार्थी आहेत. जिल्ह्यात इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजनेचा २५ हजार ७३९ लाभार्थी लाभ घेतात तर इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजनेचे १५ लाभार्थी जिल्ह्यात आहेत.जिल्ह्यात राष्ट्रीय सामाजिक सहाय्यता कार्यक्रमांतर्गत निराधारांचे अनुदान वाटप केले जाणार आहे. यासाठी प्रशासकीय पातळीवरील तयारी अंतिम टप्प्यात आल्याचे संजय गांधी निराधार योजनेचे तहसीलदार विजय अवधाने यांनी सांगितले. या प्रणालीच्या अंमलबजावणीनंतर निराधारांच्या अनुदान वाटपास विलंब होणार नसल्याचे ते म्हणाले.एनएसएपी कार्यक्रमाच्या अंमलबजावणीची तयारीजिल्ह्यात राष्ट्रीय सामाजिक सहाय्यता कार्यक्रमाची तयारी केली जात आहे. निराधारांचे अनुदान आता याच पोर्टल प्रणालीवर वितरित केले जाणार आहेत. जिल्ह्यात २५ हजार ७३९ लाभार्थी इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेचा लाभ घेतात. यातील २३ हजार ७५९ लाभार्थ्यांचे आधार सिडींग करण्यात आले आहे. ही टक्केवारी ९२ टक्के इतकी आहे तर इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजनेच्या २२३ लाभार्थ्यांचे आधार सिडींग केले. तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजनेच्या १०० टक्के लाभार्थ्यांचे सिडींग करण्यात आले आहे.