शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

काळ्या बाजारासाठी नव्याने मोर्चेबांधणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 00:53 IST

नांदेडात झालेल्या कृष्णूर धान्य घोटाळ्याचा तपास अद्याप सुरुच असताना या घोटाळ्यातील आरोपींनी आता धान्य काळा बाजारासाठी नव्याने मोर्चेबांधणी सुरु केली आहे़

ठळक मुद्देधान्य घोटाळाकृष्णूर, नांदेड एमआयडीसीतील कंपनीची होणार का तपासणी ?

नांदेड : नांदेडात झालेल्या कृष्णूर धान्य घोटाळ्याचा तपास अद्याप सुरुच असताना या घोटाळ्यातील आरोपींनी आता धान्य काळा बाजारासाठी नव्याने मोर्चेबांधणी सुरु केली आहे़ त्यासाठी नव्या दमाच्या दलालांची नियुक्तीही करण्यात आली आहे़ त्यामुळे धान्याचा हा काळाबाजार अद्यापही सुरुच असल्याचे दिसून येते़कृष्णूरच्या इंडिया मेगा अ‍ॅग्रो अनाज कंपनीवर पोलिसांच्या छाप्यात दहा ट्रक शासकीय धान्य पकडले होते़ त्यानंतर तपासात हा घोटाळा कोट्यवधी रुपयांचा असल्याचे उघडकीस आले़ सहाय्यक पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्याकडून हा तपास गुप्तचर विभागाकडे गेला आहे़ या प्रकरणात आतापर्यंत एकाही आरोपीला अटक झाली नाही़असे असताना धान्याच्या काळा बाजारासाठी मात्र या व्यवहारातील मास्टर मार्इंड पुन्हा कामाला लागले आहेत़ तालुका आणि जिल्हा पातळीवर काळाबाजारासाठी नव्या दमाच्या दलालांची निवड करण्यात आली आहे़ नवीन लोकांना सोबत घेवून पुन्हा ही साखळी तयार करण्यात येत आहे़ त्यामुळे एवढा मोठा घोटाळा उघडकीस आल्यानंतरही या प्रकरणातील आरोपी पुन्हा ‘पहिले पाढे पंचावन्न’ करण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येते़इंडिया मेगा अ‍ॅग्रो अनाज कंपनीत पडलेल्या धाडीप्रमाणेच नांदेड एमआयडीसी आणि कृष्णूर येथे असलेल्या तीन मोठ्या कंपन्यांची उलाढालही कोट्यवधी रुपयांमध्ये आहे़ त्यामुळे या ठिकाणीही धान्याचा काळाबाजार झाल्याची शक्यता नाकारता येत नाही़ त्यामुळे या कंपन्यांचीही तपासणी गुप्तचर विभागाकडून होणार का? हा कळीचा मुद्दा आहे़ या कंपन्यांची तपासणी झाल्यास यामध्ये आणखी मोठे घबाड हाती लागण्याची दाट शक्यता आहे़ तत्कालीन पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी घोटाळेबाजांना पळता भुई थोडी केली होती़ त्यात आता धान्य घोटाळा करणाऱ्यांची साखळी पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यासाठी पोलीस अधीक्षक संजय जाधव काही कठोर पावले उचलतील का? असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे़नाशिकमध्ये मोक्काची शिफारस, नांदेडात मोकळेचशासकीय धान्याचा काळाबाजार करणा-यांच्या विरोधात नाशिक पोलिसांनी ५८ महसूल अधिकारी, कर्मचाºयांविरोधात मोक्काअन्वये कारवाई करण्याची शिफारस करीत न्यायालयात पुरवणी आरोपपत्र सादर केले आहे़ त्यामुळे खळबळ उडाली आहे़ नांदेडातील धान्य घोटाळा तर त्यापेक्षा अधिक मोठा आहे़ सहाय्यक पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी त्यावेळी तशी तयारीही केली होती़ परंतु, त्यांच्याकडून तपास गुप्तचर विभागाकडे देण्यात आला़ त्यामुळे हा विषय थांबला़

टॅग्स :NandedनांदेडfraudधोकेबाजीNanded policeनांदेड पोलीसNanded S Pपोलीस अधीक्षक, नांदेड