शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

कंत्राट आक्षेपांच्या कचाट्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 00:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नांदेड : जिल्हा पुरवठा विभागाच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाहतूक कंत्राट आक्षेपांच्या कचाट्यात ...

ठळक मुद्देजिल्हा पुरवठा विभाग : अपात्र निविदाधारकाला पुन्हा पात्र ठरविल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : जिल्हा पुरवठा विभागाच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाहतूक कंत्राट आक्षेपांच्या कचाट्यात सापडले आहे. सर्वात कमी दर असलेला निविदाधारकही प्रारंभी अपात्र ठरला होता असा आरोप केला आहे़ या सर्व प्रकरणामुळे ही निविदा प्रक्रिया वादात सापडली आहे़जिल्हा पुरवठा विभागाने ९ आॅक्टोबर रोजी अन्नधान्य वाहतुकीसाठी निविदा मागवल्या होत्या़ त्यानुसार ९ निविदा प्राप्त झाल्या़ त्यातील ६ निविदाधारक पात्र ठरले़ उर्वरित तिघेजण अपात्र ठरल्याचे सांगण्यात आले़ या तीनपैकी अपात्र ठरलेल्या प्रशांत अ‍ॅग्रोटेकच्या संचालकांनी न्यायालयात धाव घेऊन या निविदा प्रक्रियेत ‘जैसे थे’ चे आदेश मिळविले़ न्यायालयाने पुरवठा विभागाला आपले म्हणणे मांडण्याचे आदेश दिले आहेत़त्यातच आता या निविदा प्रक्रियेत सर्वात कमी दर असलेल्या पारसेवार अ‍ॅण्ड कंपनीला या निविदा प्रक्रियेत प्रारंभी अपात्र ठरवले होते, अशी माहिती पुढे आली आहे़ निविदा प्रक्रियेत समाविष्ट असलेल्या एका कंत्राटदाराने हा आरोप केला आहेत़ पारसेवार अ‍ॅण्ड कंपनीने आर्थिक पत प्रमाणपत्र जोडले नव्हतेच त्यासह नियमावलीप्रमाणे कंपनी असल्यामुळे निविदा भरताना सर्व संचालकांकडून अधिकार पत्र घ्यावे लागते, त्यानुसार सदरील कंपनीने सर्व संचालकांकडून २०१७ मध्ये निविदा भरण्यासाठी अधिकार पत्र दिले नाही, नोंदणी प्रमाणपत्र नियमावली व पॅनकार्डमध्ये ताळमेळ जुळत नाही आदी आरोप करण्यात आले आहेत़ समितीनेही प्रारंभी आर्थिक पत दर्शवणारी बॅलेंस शीट नसल्याने प्रारंभी अपात्र ठरवले होते़ मात्र त्यांना पुन्हा कागदपत्रे सादर करण्याची संधी देण्यात आली आहे़ मात्र अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या सूचनेनुसार निविदा प्रक्रियेदरम्यान कोणालाही नंतर कागदपत्रे सादर करण्याची संधी देवू नये असेही स्पष्ट करण्यात आले आहे़ जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली १६ नोव्हेंबर रोजी निविदा प्रक्रियेतील सर्व कंत्राटदारांची बैठक झाली होती़ त्या बैठकीत सदर निर्णय झाला होता़ मात्र या बैठकीचा इतिवृत्तांत सहभागी कंत्राटदारांना दिला नाही़ विशेष म्हणजे, ही बैठक झाली की नाही याबाबतच पुरवठा विभागाने साशंकता निर्माण केली आहे़ या बैठकीला उपस्थित राहण्याचे पत्रही पुरवठा विभागाने कंत्राटदारांना दिले होते़जवळपास ११ वर्षांपासून न्यायालयीन प्रकरणामुळे एकाच वाहतूक कंत्राटदाराकडे असलेली अन्नधान्य वाहतुकीसाठी पुरवठा विभागाने निविदा काढली खरी मात्र त्यानंतर झालेल्या या संपूर्ण आक्षेपांच्या मालिकेमुळे ही निविदा प्रक्रिया आता आणखीनच वादाच्या भोवºयात सापडली आहे़दरम्यान, मागील ११ वर्षांपासून अन्नधान्य वाहतूक करणाºया शोभना ट्रान्सपोर्टने १ डिसेंबरपासून वाहतूक कंत्राट सोडण्याचे पत्र दिले होते़ मात्र या निविदा प्रक्रियेतील वादाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील स्वस्त धान्य लाभार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी पुरवठा विभागाचे अंतिम आदेश येईपर्यंत काम करण्याची तयारी दर्शविली आहे़