शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

समाजाच्या प्रश्नासाठी एकजुटीची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 00:23 IST

मराठा समाज लाखात असूनही त्यांचा परिणाम कोणत्या राजकीय पक्षावर होत नाही़ मराठा समाजाची स्वतंत्र आणि एकसंघ वोट बँक तयार होणे गरजेचे असून त्याशिवाय समाजाचे प्रश्न सुटणार नाहीत, असे प्रतिपादन आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केले़

ठळक मुद्देमराठा युवकांशी संवाद : हर्षवर्धन जाधव यांचे प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : मराठा समाज लाखात असूनही त्यांचा परिणाम कोणत्या राजकीय पक्षावर होत नाही़ मराठा समाजाची स्वतंत्र आणि एकसंघ वोट बँक तयार होणे गरजेचे असून त्याशिवाय समाजाचे प्रश्न सुटणार नाहीत, असे प्रतिपादन आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केले़रविवारी ‘मराठा युवा मन परिवर्तन यात्रा’निमित्त नांदेडात आले असता त्यांनी मराठा युवकांशी संवाद साधला़ औरंगाबादचे प्रा़चंद्रकांत भराट, मानसोपचार तज्ज्ञ इशा झा, डॉ़शाम पाटील, विलास तांगडे यांच्यासह डॉ़संजय कदम, भागवत देवसरकर, पंजाबराव काळे, धनंजय सूर्यवंशी, शाम पाटील वडजे, अविनाश कदम, संदिप पावडे, मारूती देशमुख नरंगलकर, इंजि़पी़ आऱ देशमुख, माधव देवसरकर आदींची प्रमुख उपस्थिती होती़ प्रास्ताविक डॉ़संजय कदम यांनी केले़आरक्षणाच्या लढाईत अनेकांनी पोलिसांच्या लाठ्या काठ्या खाऊन, स्वत:वर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करून घेतले आहेत़ ही लढाई एवढ्यावरच न थांबता मागील काही दिवसात मराठवाड्यात जवळपास २७ युवक-युवतींनी मराठा आरक्षणासाठी आपले बलिदान दिले़आत्महत्यांचे सत्र सुरूच असून ते कुठेतरी थांबले पाहिजे़ यासाठी एक मराठा बांधवा या नात्याने मराठवाड्यात ‘मराठा युवा मन परिवर्तन यात्रा’ काढली असल्याचे आ़ जाधव यांनी सांगितले़शांततेच्या मार्गाने अठावन्न मुकमोर्चे काढणाऱ्या मराठा समाजाचा अंत न पाहता सरकारने समाजाचे प्रश्न मार्गी लावावेत़ आरक्षण देण्यासाठी कोणत्याही अहवालाची गरज नसून विधिमंडळात सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येवून हा प्रश्न मार्गी लावता येवू शकतो़ परंतु, राजकीय स्वार्थापोटी अनेकजण दुटप्पी भूमिका घेत आहेत, असा आरोप आ़जाधव यांनी केला़ मराठा समाज आत्महत्या करीत असल्याचे पाहून सरकारवर दबाव आणण्यासाठी आपण राजीनामा दिला़ परंतु, त्याचे काही मंडळी राजकारण करीत आहेत ते चुकीचे आहे़ मला समाजाचे नेतृत्व करायचे नाही किंवा कोणता राजकीय पक्ष काढायचा नाही़यात कुठलाही राजकीय स्वार्थ नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले़ परंतु, मराठा समाज कोणत्याही एका पक्षाच्या मागे नसल्याने तो विविध पक्षात विखुरला गेल्याने लाखांमध्ये असूनही त्यांचा सरकारवर दबाव निर्माण होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली़ मराठा आरक्षणासाठी एकट्या मुख्यमंत्र्यांना जबाबदार धरणे योग्य नसून सर्वांनी समाजाला न्याय देण्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे, असे मत आ़जाधव यांनी व्यक्त केले़---

  • तरूणांनो आत्महत्या नको; लढणे आपल्या रक्तात

मराठा आरक्षणासाठी लढा उभारणे, रस्त्यावर उतरणे इतपर्यंत ठिक आहे़ परंतु, आत्महत्येसारखे टोकाचे पाऊलने आपल्या शोभणारे नाही़ आपण शिवरायांच्या रक्ताचे वंशज असून लढणे हे आपल्या रक्तात आहे़ त्यामुळे आत्महत्या न करता शासनावर अहिंसक, लोकशाही मार्गाने आपण दबाव आणू परंतु, आत्महत्या नको, असे आवाहन आ़हर्षवर्धन जाधव यांनी केले़

  • जीवन अनमोल आहे ते गमवू नका- इशा झा

जगण्यासाठी प्रत्येकाच्या आयुष्यात संषर्ष असतो़ परंतु, तो संघर्ष विकोपाला जावून आत्महत्या करणे हा पर्याय नाही़ आयुष्यातील संघर्षावर मार्ग शोधून जगणं गरजेचे आहे़ आत्महत्या हा पर्याय नाही, असे मत मानसोपचार तज्ज्ञ इशा झा यांनी व्यक्त केले़ कोणी नैराश्यात असेल आत्महत्येसारखे विचार मनात येत असतील तर त्यांना समुपदेशनसाठी आमच्यापर्यंत घेवून यावे़

टॅग्स :NandedनांदेडHarshavardhan Jadhavहर्षवर्धन जाधवShiv Senaशिवसेनाmarathaमराठा