शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

तर भिंगे यांच्या रुपाने राष्ट्रवादीला आमदारकी; नांदेड जिल्ह्याला तेराव्या आमदाराची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2020 19:35 IST

काँग्रेस नेते अशोकराव चव्हाण यांच्याविरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लोकसभा निवडणूक लढविलेल्या प्राध्यापक यशपाल भिंगे यांची साहित्यिक म्हणून राज्यपाल नियुक्त सदस्यांसाठी शिफारस केल्याची चर्चा आहे.

ठळक मुद्देभिंगे यांच्या मतविभागणीमुळेच काँग्रेस नेते चव्हाण यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले होते.

नांदेड :  राज्यपाल नियुक्त बारा जागांसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून १२ जणांची नावे बंद लिफाफ्यात राज्यपालांकडे शुक्रवारी सुपूर्द करण्यात आली. यामध्ये नांदेड येथील प्रा. यशपाल भिंगे यांचेही नाव असल्याची चर्चा असल्याने भिंगे यांना आमदारकीची लॉटरी लागल्यास राष्ट्रवादीलाही जिल्ह्यात एकमेव आमदार लाभणार आहे. दुसरीकडे त्यांच्या रुपाने जिल्ह्याला तेरावा आमदार मिळेल.

काँग्रेस नेते अशोकराव चव्हाण यांच्याविरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लोकसभा निवडणूक लढविलेल्या प्राध्यापक यशपाल भिंगे यांची साहित्यिक म्हणून राज्यपाल नियुक्त सदस्यांसाठी शिफारस केल्याची चर्चा आहे. पीपल्स कॉलेजमध्ये प्राध्यापक असलेले यशपाल भिंगे पंढरपूर येथे ॲड.प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या सत्ता संपादन मेळाव्यापासून चर्चेत आले होते. आंबेडकर यांनी निवडणुकीच्या सहा महिने अगोदारच वंचितकडून राज्यातील पहिला उमेदवार म्हणून माळेगाव येथील मेळाव्यात भिंगे यांच्या उमेदवारीची घोषणा केली होती. या त्यांनी निवडणुकीत १ लाख ६६ हजारांहून अधिक मते मिळविली. या मतविभागणीमुळेच काँग्रेस नेते चव्हाण यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले होते. 

मागील काही दिवसांपासून भिंगे यांचा बायोडाटा राष्ट्रवादीने मागविल्याची चर्चा होती. त्यानंतर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या अनेक दिग्गज नेत्यांनी प्राध्यापक  यशपाल भिंगे यांच्या नावाला विरोध केला होता. काहींनी थेट पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे तशी पत्रेही पाठविली. मात्र त्यानंतरही भिंगे यांना पक्षाने प्राधान्य दिल्याचे दिसत आहे.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसNandedनांदेड