शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

‘उदे गं अंबे उदे’च्या गजरात माहूरगडावर नवरात्रोत्सवास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2020 19:03 IST

Navratri गडावर जाणाऱ्या रस्त्यावर चोख बंदोबस्त

ठळक मुद्देभाविकांविना यंदा साध्या पद्धतीने घटस्थापना

माहुर (जि. नांदेड): महाराष्ट्रातील देवींच्या साडेतीन शक्तिपिठांपैकी एक पूर्ण व मूळ पीठ असलेल्या श्रीक्षेत्र माहूर येथील श्री रेणुकादेवी संस्थान गडावर शनिवारी परंपरेनुसार नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला. ‘उदे गं अंबे उदे’ च्या गजरात पहिल्या माळेला सकाळी सहा वाजता सुरुवात झाली. अभिषेकांचे सहस्त्रआवर्तन देत मुख्य देवता श्री रेणुकामातेच्या वैदिक महापूजेने धार्मिक कार्यक्रमांना प्रारंभ झाला.

नवरात्रोत्सवानिमित्त शनिवारी सकाळी ९ वाजता श्री रेणुकामातेच्या मुख्य गाभाऱ्यातील व परिसरातील परिवार देवता श्री तुळजाभवानी मंदिर, श्री परशुराम मंदिर, श्री महालक्ष्मी मंदिरात एका दगडाच्या कुंडात मातृका भरुन त्यात सप्त धान्य टाकून, कुंडावर मातीचा कलश, त्यात नागवेलीची पाने व श्रीफळ, तर सभोवताली पाच उसाचे धांडे उभारुन आणि त्याअधारे कलशावर पुष्पहार चढवून सकाळी घटस्थापना करण्यात आली. यावेळी पंचामृताने अभिषेक करण्यात आला. घटस्थापनेनंतर संस्थानचे पदसिद्ध अध्यक्ष तथा नांदेडचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीराम जगताप, सहा. जिल्हाधिकारी किनवट तथा पदसिद्ध सचिव किर्तीकिरण पुजार यांच्या हस्ते कुमारिकापूजन करण्यात आले. 

पुजारी विनायक फांदाडे, चंद्रकांत रिठे, दुर्गादास भोपी यांच्या हस्ते सिंगार, अलंकार  करून राखाडी रंगाचे पैठणी महावस्त्र मातेला परिधान करण्यात आले. दुपारी १२़३० वाजता संस्थानचे अध्यक्ष श्रीराम जगताप, सचिव किर्तीकिरण पुजार, तहसीलदार  सिद्धेश्वर वरणगावकर आदींच्या हस्ते महाआरती करण्यात आली, नंतर छबिना मिरवणूक काढण्यात येऊन परिसरातील परिवार देवतांची पूजा नैवेद्य व आरतीपूजन करण्यात आले. यावेळी संस्थानचे पदसिद्ध उपाध्यक्ष  तथा उपविभागीय पोलीस अधिकारी विलास जाधव, संस्थानचे विश्वस्त चंद्रकांत भोपी, संजय काण्णव, समीर भोपी, भवानीदास भोपी, आशिष जोशी, पुजारी शुभम भोपी, आश्विन भोपी यांची उपस्थिती होती.

गडावर जाणाऱ्या रस्त्यावर चोख बंदोबस्तप्रतिपदेपासून दशमीपर्यंत मंदिरात देवीसमोर अखंड नंदादीप तेवत ठेवून दररोज  दहीभात, पुरणपोळीचा नवैद्य, आरतीनंतर छबिना काढला जावून श्री रेणुकामाता ज्या गडावर प्रकटली, त्या गडाला प्रदक्षिणा घालून छबिना परत रेणुका मंदिरात येत असतो. कोरोना महामारीमुळे  भाविकांविना पुजारी व विश्वस्त समिती यांच्या उपस्थितीत साध्या पद्धतीने यंदा घटस्थापना करण्यात आली. गडावर जाणाऱ्या रत्यावरील टी पॉर्इंट व मेन रोडवर पोलिसांनी बॅरिकेट लावून भाविकांनी गडावर जावू नये यासाठी उपाययोजना केली आहे.

टॅग्स :Navratriनवरात्रीNandedनांदेड