शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

देशात नैसर्गिक शेतीची आवश्यकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 00:07 IST

मागील काही दिवसांपूर्वी यवतमाळ जिल्ह्यात पिकांवर कीटकनाशकांची फवारणी केल्यामुळे २० शेतक-यांना आपला जीव गमवावा लागला. या संदर्भात कृषी विभागाने जरी संबंधित कंपनीला क्लिनचीट दिली असली तरी हे प्रकरण गंभीर आहे. त्यामुळे आज देशाला नैसर्गिक शेतीची गरज असल्याचे आम आदमी पार्टीचे ब्रिगेडीअर सुधीर सावंत यांनी सांगितले.

ठळक मुद्देब्रिगेडीअर सावंत : शेतक-यांच्या मृत्यूचे प्रकरण गंभीर

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : मागील काही दिवसांपूर्वी यवतमाळ जिल्ह्यात पिकांवर कीटकनाशकांची फवारणी केल्यामुळे २० शेतक-यांना आपला जीव गमवावा लागला. या संदर्भात कृषी विभागाने जरी संबंधित कंपनीला क्लिनचीट दिली असली तरी हे प्रकरण गंभीर आहे. त्यामुळे आज देशाला नैसर्गिक शेतीची गरज असल्याचे आम आदमी पार्टीचे ब्रिगेडीअर सुधीर सावंत यांनी सांगितले.येथील शासकीय विश्रामगृहात रविवारी आम आदमी पार्टीच्या वतीने आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते़ ते म्हणाले, सत्ताधारी आणि विरोधी पक्ष हे देशातील नागरिकांशी खेळत आहेत. आज देशात भ्रष्टाचार शिगेला पोहोचला असल्याचे सांगत त्यांनी सीसीटीव्हीचे उदाहरण दिले. ते म्हणाले, राज्य सरकारच्या वतीने मुंबईमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे खरेदी करण्यात आले. त्यासाठी ९०० कोटी रूपयांचा खर्च झाला. परंतु, आम आदमी पार्टीचे सरकार असलेल्या दिल्लीत मात्र अवघ्या २७२ कोटी रूपयांत दीड लाख सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असल्याचे ब्रिगेडीअर सावंत यांनी सांगितले.देशात आज नैसर्गिक शेतीची आवश्यकता आहे. यवतमाळ जिल्ह्यात रासायनिय कीटकनाशकांच्या फवारणीमुळे २० शेतकºयांना जीव गमवावा लागला. यासंदर्भात कृषी विभागाच्या वतीने कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही. उलट औषध कंपनीला क्लीनचीट देण्यासाठी खटाटोप करण्यात आला़ परंतु, हे प्रकरण गंभीर असल्याचे ते म्हणाले़भ्रष्टाचारमुक्त भारतसाठी आम आदमी पार्टी हा नवीन पर्याय असून येत्या ३१ मार्चपर्यंत पार्टी मजबूत करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यात वाटचाल सुरू करण्यात आली आहे़आतापर्यंत ४ तालुकाध्यक्ष, ३७ ग्राम कमिटीची स्थापना करण्यात आली आहे. या माध्यमातून नांदेड जिल्ह्यात पक्षाची झपाट्याने वाढ होणार असल्याचा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. त्याचप्रमाणे ३० एप्रिलपर्यंत राज्यातही पार्टी मजबूत करण्यासाठी बांधणी केली जात असल्याचे ब्रिगेडीअर सावंत म्हणाले, सांगितले. यावेळी मराठवाडा समन्वयक अजिंक्य शिंदे, धनंजय जोगदंड, बालाजी आबादार, शिवाजी हंबर्डे यांच्यासह आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.