शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

दोन तरुणींना बुडताना वाचवणा-या पार्डीच्या एजाजला राष्ट्रीय शौर्य बालक पुरस्कार जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2017 13:18 IST

पाण्यात वाहून जाणा-या दोन तरुणींना जीवाची पर्वा न करता वाचविणा-या पार्डी ता. अर्धापूर येथील एजाज अ. रऊफ नदाफ यास भारतीय बालकल्याण परिषदेच्या वतीने दिला जाणारा राष्ट्रीय शौर्य बालक पुरस्कार-२०१७ जाहीर झाला.

ठळक मुद्देदेशात २५ बालकांना हा पुरस्कार मिळणार असून महाराष्ट्रातून एकमेव एजाज नदाफला हा शौर्य पुरस्कार मिळणार आहे. ३० एप्रिल२०१७ रोजी पार्डीनजीक असलेल्या नदीवरील बंधा-यात बुडणा-या २ तरुणींना त्याने वाचवले होते

पार्डी ( जि. नांदेड) : पाण्यात वाहून जाणा-या दोन तरुणींना जीवाची पर्वा न करता वाचविणा-या पार्डी ता. अर्धापूर येथील एजाज अ. रऊफ नदाफ यास भारतीय बालकल्याण परिषदेच्या वतीने दिला जाणारा राष्ट्रीय शौर्य बालक पुरस्कार-२०१७ जाहीर झाला. यंदा महाराष्ट्रातून हा पुरस्कार एकमेव एजाजला मिळाला. २६ जानेवारी रोजी नवी दिल्ली येथे होणा-या शानदार कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा पुरस्कार एजाजला दिला जाणार आहे. 

बुधवारी (दि. ६) या पुरस्कारासाठी निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. पुरस्काराचे वितरण २६ जानेवारी रोजी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार असून प्रजासत्ताक दिनानिमित्त घेण्यात येणा-या दिल्ली येथील पथसंचलनामध्येही  सहभाग घेता येणार आहे. देशात २५ बालकांना हा पुरस्कार मिळणार असून महाराष्ट्रातून एकमेव एजाज नदाफला हा शौर्य पुरस्कार मिळणार आहे. तसे पत्र तहसील कार्यालयास प्राप्त झाले. सदरील पत्राची प्रत पुरस्कारप्राप्त एजाज नदाफ यांस देऊन तहसील प्रशासनाच्या वतीने देऊन तहसीलदार अरविंद नरसीकर यांनी सत्कार केला. यावेळी मंडळ अधिकारीशेख शफिय्योद्दीन, पार्डी म.चे तलाठी माधव पाटील, माजी जि. प.सदस्य रामराव भालेराव, नागोराव भांगे पाटील, सय्यद युनूस पार्डीकर, पालक अ.रउफ नदाफ, अरबाज नदाफ आदी उपस्थित होते.

तरुणींना बुडताना वाचवले होते ३० एप्रिल२०१७ रोजी पार्डीनजीक असलेल्या नदीवरील बंधा-यातील पाण्यात कपडे धुण्यासाठी चार तरुणी गेल्या होत्या. त्यांचा तोल गेल्यामुळे त्या पाण्यात बुडत होत्या. यावेळी  त्यांच्यासोबत असलेल्या बहिणीस ही बाब लक्षात आल्यानंतर तिने मदतीचा धावा केला. यावेळी नागरिक धावून गेले असता मदत मिळाल्यामुळे दोघींना वाचविण्यात यश आले़ तर दोघींचा मृत्यू झाला. यात एजाज नदाफ या बालकाने जिवाची पर्वा न करता दोघींचे प्राण वाचविले होते. एका विद्यार्थ्याच्या धाडस व समयसुचकतेमुळे दोन युवतीचे प्राण वाचले. त्याच्या या शौर्याची दखल घेऊन तहसीलदार डॉ.अरविंद नरसीकर यांच्या मार्फत  भारतीय बालकल्याण परिषद दिल्ली यांना माहिती पाठविण्यात आली होती.

टॅग्स :Nandedनांदेड