शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
4
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
5
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
7
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
8
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
9
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
10
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
11
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

नांदेडच्या ‘आयआयबी’चा भारतात उच्चांक; सहा विद्यार्थ्यांना ३६० पैकी तब्बल ३५५ गुण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2020 03:05 IST

IIB : आयआयबीच्या ६ विद्यार्थ्यांनी बायोलॉजी विषयात ३६० पैकी तब्बल ३५५ गुण घेवून देशात वेगळा विक्रम प्रस्थापित केला.

नांदेड : नीट परीक्षेच्या निकालात आयआयबीने यंदाही आपले वेगळेपण आणि उच्चांक कायम राखला आहे. आयआयबीच्या ६ विद्यार्थ्यांनी बायोलॉजी विषयात ३६० पैकी तब्बल ३५५ गुण घेवून देशात वेगळा विक्रम प्रस्थापित केला. तसेच जवळपास १ हजार ४० विद्यार्थ्यांनी ३०० हून अधिक गुण मिळविले आहेत.गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकांच्या उपस्थितीत आयआयबीच्या वतीने ‘गौरव गुणवंतांचा’ हा कार्यक्रम अनोख्या पद्धतीने साजरा केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयआयबीचे संचालक दशरथ पाटील हे होते तर उपजिल्हाधिकारी दीपाली मोतीयाळे, भार्गव राजे यांची प्रमुख उपस्थिती होती़. आयआयबीचे संचालक पाटील यांनी अध्यक्षीय भाषणात यंदा आयआयबीचे जवळपास दीड हजार विद्यार्थी एमबीबीएस प्रवेशास पात्र ठरतील, असा विश्वास व्यक्त केला.  कोणत्याही तक्रारीविना लॉकडाऊन काळात ऑनलाईन शिक्षणाबरोबर  घरपोहोच नोट्स आयआयबीने दिल्या. यातूनच आयआयबी कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास नेहमीच सज्ज असते, हा विद्यार्थी-पालकांचा विश्वास वृद्धिंगत झाल्याचे त्यांनी सांगितले़ .  प्रास्ताविक आयआयबी अकॅडमीचे संचालक डॉ. महेश पाटील यांनी तर शेख सादिक यांनी आयआयबीच्या यशाचा आलेख मांडला. एकावेळी ५० विद्यार्थी व पालक अशी व्यवस्था करून सर्वांना मास्क व हॅण्डग्लोव्हज देण्यात आले़. यशस्वीतेसाठी संचालक प्रा. नरेश भोसले व टीम आयआयबीचे डॉ. प्रभाकर देशमुख, डॉ़. मधुश्री राऊत, प्रा. प्रदीप कुशवाह डॉ. शिवप्रसाद गुंडरे, डॉ.रामकिशन गुंडरे, डॉ.रामप्रसाद हरकल, प्रा. संजय लुकने, प्रा. अभिजित राक्षे, डॉ. अश्विन दापकेकर प्रा. डॉ. जयंत राऊत, प्रा. समीर कुलकर्णी, सल्लागार बालाजी कदम आणि व्यवस्थापक संतोष पाटील, अक्षय नळदकर, भास्कर पाटील, विश्वास पाटील आदींनी परिश्रम घेतले. दरम्यान, काही निवडक विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकारी डॉ़  विपीन इटणकर यांच्या हस्ते त्यांच्या कार्यालयात गौरव करीत आयआयबीच्या विविध उपक्रमांचे कौतुक करीत शुभेच्छा दिल्या. (व्या. प्र.)

मराठवाड्यासह महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना नीटच्या तयारीसाठी राजस्थान, दिल्ली व इतर राज्यांत जाण्याची गरज नसून मागील काही वर्षांपासून आयआयबी नीटमध्ये नवनवीन विक्रम करण्याचे काम करत आहे़  यंदाही एकूण १०४० विद्यार्थ्यांनी बायोलॉजी विषयात ३६० पैकी ३०० पेक्षा अधिक गुण मिळविल आहेत़  तर एकूण ७२० पैकी ५०० हून अधिक गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ७२३ आहे़. 

टॅग्स :NandedनांदेडEducationशिक्षण