शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

नांदेडच्या शासकीय केंद्रात दुधाचा रतीब आटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 01:06 IST

नांदेड : दूध उत्पादक शेतकºयांसाठी मोठा आधार ठरलेले शहरातील शासकीय दूध संकलन केंद्र दुधाची विक्रमी आवक घटल्याने अखेरचे क्षण मोजत आहे़ २५ वर्षांपूर्वी प्रतिदिन ७५ हजार लिटर दुधाचे संकलन करणाºया या केंद्रात आता केवळ दोन ते अडीच हजार लिटर दूध संकलित होत आहे़ दूध उत्पादक सहकारी संस्थांनीही या केंद्राकडे पाठ फिरविल्याने शासनाने वेळीच हस्तक्षेप न केल्यास या केंद्राला कायमस्वरुपी टाळे लागू शकते.

ठळक मुद्देसहकारी संस्थांनी फिरविली पाठ : प्रतिदिन ७५ हजारांवरुन संकलन आले अडीच हजार लिटरवर

विशाल सोनटक्के।लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : दूध उत्पादक शेतकºयांसाठी मोठा आधार ठरलेले शहरातील शासकीय दूध संकलन केंद्र दुधाची विक्रमी आवक घटल्याने अखेरचे क्षण मोजत आहे़ २५ वर्षांपूर्वी प्रतिदिन ७५ हजार लिटर दुधाचे संकलन करणाºया या केंद्रात आता केवळ दोन ते अडीच हजार लिटर दूध संकलित होत आहे़ दूध उत्पादक सहकारी संस्थांनीही या केंद्राकडे पाठ फिरविल्याने शासनाने वेळीच हस्तक्षेप न केल्यास या केंद्राला कायमस्वरुपी टाळे लागू शकते.दुष्काळी मराठवाड्यातील शेती मोठ्या प्रमाणात पावसावर अवलंबून आहे़ त्यामुळेच शेतकºयांना नगदी पैसे देणारा जोडव्यवसाय म्हणून पशू पालनाकडे पाहिले जाते़ शासनही हा जोडव्यवसाय अधिक वृद्धिंगत व्हावा यासाठी शेतकºयांसाठी विविध योजना राबविते़ मात्र संकलित झालेल्या दुधापासून इतर उपपदार्थ बनविण्याकडे कानाडोळा झाल्याने तसेच खाजगी संकलन केंद्रासोबतच्या स्पर्धेत मागे पडल्याने कधीकाळी शेतकºयांसाठी वैभव ठरलेले शासकीय दूध संकलन केंद्र आज अखेरच्या घटका मोजत आहे़१९७८ च्या सुमारास नांदेड येथे हे केंद्र सुरु करण्यात आले़ शहराच्या परिसरातील दूध उत्पादक शेतकरी सुमारे २०० सहकारी संस्थांच्या माध्यमातून या केंद्राकडे दूध पाठवित होते़ या केंद्राची प्रतिदिन १ लक्ष लिटर एवढी क्षमता असून नोव्हेंबर १९९४ मध्ये याच केंद्रावर ७५ हजार ५८८ लिटर एवढे विक्रमी दूध संकलित झाल्याची नोंद आहे़ येथे संकलित झालेल्या दुधावर प्रक्रिया करुन हे दूध शासनाच्या मुंबई, पुणे, अकोला, उदगीर आणि मिरज येथील इतर दूध योजनांसाठी पाठविले जात होते़यातील अकोला, उदगीर आणि मिरज येथे दुधाची भुकटी आणि लोणी तयार करण्यात येत होते़ जिल्ह्यातील ३९ मार्गावरुन संकलित होणाºया या दुधाचा ओघ पाहता दुग्ध व्यवसाय विकास विभागाच्या या संकलन केंद्राने शहरात ६ पूर्णवेळ तर ३२ अर्धवेळ दूध विक्री केंद्रेही उभारली होती़ या केंद्राच्या माध्यमातून शासकीय दूध डेअरीतील सरासरी ५ हजार लिटर दुधाची शहरात दररोज विक्री केली जात होती़ या शासकीय संकलन केंद्रामुळे परिसरातील शेतकºयांचीही मोठ्या प्रमाणात आर्थिक उन्नती होत होती़ याबरोबरच दूध विक्री केंद्र आणि संकलन केंद्रात लागणाºया मनुष्यबळामुळे अनेकांच्या हाताला रोजगारही उपलब्ध झाला होता़दरम्यानच्या काळात खाजगी दूध डेअºया बाजारपेठेत उतरल्या़ सुरुवातीच्या काळात या डेअºयांनी दुधाला शासकीयपेक्षा अधिक दर दिल्याने दुग्धसंस्थांनी खाजगी संस्थांना पसंती दिली आणि तेथूनच शासकीय दूध संकलन केंद्राच्या वैभवाला घसरण लागली़ दूध संकलन कमी होत गेले तसे या केंद्रातील कर्मचाºयांसह यंत्रसामग्रीही गुंडाळण्यात आली़ पर्यायाने आता प्रतिदिन १ लाख लिटर संकलनाची क्षमता असतानाही केवळ दोन ते अडीच हजार लिटर एवढेच दूध संकलित होत आहे़ सद्य:स्थितीत गायीच्या दुधाला २७ रुपये तर म्हशीच्या दुधाला ३६ रुपये प्रतिलिटर दर या संकलन केंद्राद्वारे दिला जातो़ याबरोबरच प्रतिलिटर ७० पैसे कमिशन आणि प्रतिलिटर २़६० पैसे वाहतूक भाडे दुग्ध संस्थांना अदा केले जाते़दुसरीकडे खाजगी दूध संकलन केंद्र अगदी २२ रुपये प्रतिलिटरपासून दुधाची खरेदी करीत असतानाही शासकीय संकलन केंद्राकडील दुधाचा ओघ वाढत नसल्याचे दिसून येते़ आजघडीला केवळ ५ ते ६ सहकारी दूध उत्पादक संस्थाच येथे दूध पाठवित आहेत़ शासनाने वेळीच हस्तक्षेप करुन योग्य त्या उपाययोजना न केल्यास शासनाच्या या चांगल्या उपक्रमाला टाळे लागू शकतात़असे घसरले दूध संकलन४नांदेड येथील या शासकीय दूध संकलन केंद्रात नोव्हेंबर १९९३ साली ७५ हजार ५८८ लिटर दुधाचे संकलन होत होते़ मात्र त्यानंतर हळूहळू दुधाची आवक कमी होत गेली़ १९९४ साली १० हजार लिटरचा फटका बसला़ आणि हे संकलन ६४ हजार ७५८ लिटरवर पोहोचले़ ही घसरण पुढे वाढतच गेली़ मागील ५ वर्षांतील आकडेवारी पाहता नोव्हेंबर २०१४ मध्ये १७ हजार ४०० लिटर, नोव्हेंबर २०१५ मध्ये २० हजार ९००, नोव्हेंबर २०१६ मध्ये २ हजार तर सरत्या महिन्यात म्हणजेच नोव्हेंबर २०१७ मध्ये या केंद्रात सरासरी प्रतिदिन २३०० लिटर दुधाचे संकलन होत आहे़