शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडचे मुख्य अभियोक्ता पदच रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 23:50 IST

सरकारच्या विधि व न्याय विभागाच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा सरकारी अभियोक्ताची नेमणूक केली जाते़ हे पद अर्धा दिवसही रिक्त राहू नये असा दंडक आहे़ परंतु, अत्यंत महत्त्वाच्या या पदाबाबत विधि व न्याय विभागाला गांभीर्य नसल्याचेच दिसून येत असून गेल्या १९ दिवसांपासून हे पद रिक्त आहे़ त्यामुळे अनेक महत्त्वाच्या खटल्यावर त्याचा परिणाम होत आहे़

ठळक मुद्देइतिहासात पहिल्यांदाच तब्बल १९ दिवसांपासून मुख्य अभियोक्ताच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : सरकारच्या विधि व न्याय विभागाच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा सरकारी अभियोक्ताची नेमणूक केली जाते़ हे पद अर्धा दिवसही रिक्त राहू नये असा दंडक आहे़ परंतु, अत्यंत महत्त्वाच्या या पदाबाबत विधि व न्याय विभागाला गांभीर्य नसल्याचेच दिसून येत असून गेल्या १९ दिवसांपासून हे पद रिक्त आहे़ त्यामुळे अनेक महत्त्वाच्या खटल्यावर त्याचा परिणाम होत आहे़तत्कालीन जिल्हा संघचालक अ‍ॅड़अमरिकसिंघ वासरीकर यांची दोन वर्षांपूर्वी जिल्हा अभियोक्ता पदावर नेमणूक करण्यात आली होती़ गेले दोन वर्षे तेच या पदावर होते़ १४ आॅगस्ट रोजी मात्र त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाला़ अ‍ॅड़ वासरीकर यांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी नवीन व्यक्तीची जिल्हा अभियोक्तापदी निवड होणे किंवा वासरीकर यांना मुदतवाढ मिळणे अपेक्षित होते़परंतु, सरकारने यापैकी काहीही केले नाही़ विशेष म्हणजे, वासरीकर यांनी पदभार कुणाकडे सुपूर्द करावयाचा याचेही आदेश मिळाले नाहीत़ त्यामुळे मोठा पेच निर्माण झाला आहे़ त्यामुळे गेल्या १९ दिवसांपासून हे पद रिक्तच आहे़ शासनाची बाजू न्यायालयात मांडण्यासाठी विविध कायदेशीर विषयांत मार्गदर्शन घेण्यासाठी जिल्हा सरकारी अभियोक्त्याकडेच जावे लागते़परंतु, हे पदच रिक्त असल्यामुळे मोठी अडचण झाली आहे़ नांदेडच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढे दिवस जिल्हा सरकारी अभियोक्ता पद रिक्त असल्याचे बोलले जात आहे़ आता या पदावर नियुक्तीसाठी जाहिरात देवून अर्ज मागवावे लागणार आहेत़ त्यानंतर मुलाखतीमधून अभियोक्त्याची निवड केली जाईल किंवा एखाद्याकडे त्याचा पदभार देण्यात येईल़

पद रिक्त ठेवताच येत नाही-अ‍ॅड़ शिंदेजिल्हा सरकारी अभियोक्ता हे अत्यंत महत्त्वाचे पद आहे़ जिल्ह्यातील खटल्यांची रुपरेषा ठरविणे, त्याचे नियोजन करणे, कामाचे वाटप करणे, खटल्यांमध्ये शासनाची बाजू मांडणे यासह इतर अनेक महत्त्वाची कामे सरकारी अभियोक्ताला करावी लागतात़ त्यामुळे अर्धा दिवसही हे पद रिक्त ठेवता येत नाही़ परंतु, गेल्या १९ दिवसांपासून हे पद रिक्त आहे़ सरकारच्या वतीने जाहिरात दिल्यानंतर आलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जातात़ त्यानंतर या पदाची नियुक्ती केली जाते, अशी प्रतिक्रिया माजी जिल्हा सरकारी अभियोक्ता अ‍ॅड़ बालाजी शिंदे यांनी दिली़

टॅग्स :NandedनांदेडCourtन्यायालयadvocateवकिल