शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडकरांची तहान भागणार; दिग्रस बंधाऱ्यातून पोलीस बंदोबस्तात सोडले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 16:45 IST

जवळपास 7 लाख लोकसंख्या असलेल्या शहराला विष्णुपुरीतून पाणी कमी पडू लागल्यानंतर पालम तालुक्यात दिग्रस बंधाऱ्याची उभारणी 2007-08 मध्ये करण्यात आली.

ठळक मुद्देदिग्रस बंधाऱ्यातून सोडलेल्या 25 दलघमी पाण्यापैकी 20 दलघमी पाणी उपलब्ध होईल

नांदेड़ - नांदेड शहरवासीयांची तहान भागवण्यासाठी परभणी जिल्ह्यातील दिग्रस बंधाऱ्यातून सोमवारी पहाटे 25 दलघमी पाणी सोडण्यात आले. पाणी सोडण्यासाठी होणारा विरोध लक्षात घेता मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.      नांदेड शहराची तहान भागवण्यासाठी विष्णुपुरीतून पाणीपुरवठा केला जातो. जवळपास 7 लाख लोकसंख्या असलेल्या शहराला विष्णुपुरीतून पाणी कमी पडू लागल्यानंतर पालम तालुक्यात दिग्रस बंधाऱ्याची उभारणी 2007-08 मध्ये करण्यात आली. बंधाऱ्याची उभारणी करतानाच नांदेडसाठी या बंधाऱ्यात पाणी राखीव राहील अशी तरतूद करण्यात आली होती. पुढे पाणी मिळत गेले. मात्र गेल्या काही वर्षांपासून नांदेडला पाणी देण्यास स्थानिकांनी विरोध करण्यास प्रारंभ केला. त्यामुळे पोलीस बंदोबस्तात पाणी घ्यावे लागत आहे. २२ जानेवारी २०२० रोजी झालेल्या कालवा समितीच्या बैठकीत जलनियोजन मंजूर करण्यात आले होते. त्यानुसार नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी परभणी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. परभणीचे पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी आवश्यक बंदोबस्त उपलब्ध करून दिला. त्यामुळे सोमवारी पहाटे 5 वाजता बंधाऱ्याचे दरवाजे उघडण्यात आले. सकाळी 9.35 वाजता दरवाजे बंद करण्यात आले. यावेळी कार्यकारी अभियंता निळकंठ गव्हाणे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील, करडीले, तहसीलदार ज्योती चव्हाण, पोलीस निरीक्षक सुनील माने यांची उपस्थिती होती.      दिग्रस बंधाऱ्यातून सोडलेल्या 25 दलघमी पाण्यापैकी 20 दलघमी पाणी उपलब्ध होईल अशी माहिती महापालिका पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे यांनी दिली. जुलै अखेरपर्यंचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न हे पाणी उपलब्ध झाल्याने मार्गी लागल्याचेही अंधारे म्हणाले.

टॅग्स :NandedनांदेडWaterपाणीNanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिका