शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

नांदेडकरांना प्रतीक्षा शिवशाही बसेसची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 00:04 IST

प्रवाशांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी नव्याने सुरू करण्यात आलेल्या शिवशाही आरामदायी बसेस नजीकच्या लातूर जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत, परंतु मागील सहा महिन्यांपासून प्रतीक्षेत असणाºया नांदेडकरांचा शिवशाहीचा प्रवास लांबणार असल्याचे चित्र दिसत आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : प्रवाशांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी नव्याने सुरू करण्यात आलेल्या शिवशाही आरामदायी बसेस नजीकच्या लातूर जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत, परंतु मागील सहा महिन्यांपासून प्रतीक्षेत असणाºया नांदेडकरांचा शिवशाहीचा प्रवास लांबणार असल्याचे चित्र दिसत आहे़महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या योजना, उपक्रम राबविले जात आहेत़ आरामदायी प्रवासासाठी बहुतांश विभागात शिवशाही बसेसच्या माध्यमातून दर्जेदार सुविधा दिल्या जात आहेत़ नांदेड विभागासाठी दहा शिवशाही बस येणार होत्या़, परंतु आजपर्यंत एकही बस दाखल झाली नाही़ नांदेड येथून पुणे, मुंबईसाठी जाणारे खाजगी ट्रॅव्हल्स, रेल्वे नेहमी हाऊसफुल्ल धावतात़ त्यामुळे नांदेड येथून पुणे, मुंबई, नागपूर, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद आदी गर्दीच्या मार्गावर शिवशाही बसेस सोडल्या जातील, अशी अपेक्षा प्रवाशांना आहे़ मात्र प्रशासनाकडून या मार्गांना बगल देत नांदेड-हैदराबाद या मार्गावर शिवशाही बस सोडण्याचे नियोजन सुरू असल्याची माहिती आहे़नांदेडहून दररोज पन्नासहून अधिक खासगी ट्रॅव्हल्स पुण्यासाठी धावतात़ एवढ्या मोठ्या प्रमाणात नांदेड-पुणे मार्गावर प्रवाशांची गर्दी असताना केवळ हैदराबादचे नियोजन केले जात आहे़ त्यामुळे एसटीतील अधिकारी आणि खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्यांचे ‘अर्थपूर्ण’ संबंध असल्याच्या लोकप्रतिनिधींच्या आरोपास दुजोरा मिळतो़ नांदेडसह हिंगोली, परभणी, यवतमाळ जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी पुणे येथे शिक्षण, नोकरीनिमित्त वास्तव्यास आहेत़ त्यामुळे नांदेड-पुणे-नांदेड मार्गावर नेहमीच प्रवाशांची वर्दळ असते़ एसटी प्रशासनाने नांदेड येथून पुण्यासाठी शिवशाही बस सोडली आणि इतर खासगी ट्रॅव्हल्सप्रमाणे तिकीट ठेवल्यास निश्चितपणे या गाडीला भरभरून प्रतिसाद मिळू शकतो़मकर संक्रांतीला मिळतील गाड्याविभागास अद्यापपर्यंत शिवशाही गाड्या मिळाल्या नाहीत़, परंतु मकरसंक्रांतीपर्यंत गाड्या मिळतील, असा अंदाज आहे़ या गाड्या हायर्ड असून त्या आंतरराज्य मार्गावर चालविण्यात येतील, अशी माहिती विभागीय वाहतूक अधिकारी पी़एस़नेहूल यांनी दिली़