शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडात चिमुकल्याचा निर्घृण खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 00:05 IST

शनिवारी सायंकाळी घरासमोरील अंगणात खेळताना बेपत्ता झालेल्या सहा वर्षीय चिमुकल्याचा रविवारी मिलगेट परिसरातील जंगलात मृतदेह आढळला़ चिमुकल्याच्या डोक्यावर जखमा असून चेहराही विद्रूप केला आहे़ या प्रकरणात वजिराबाद पोलिसांनी खून असल्याचा संशय वर्तविला आहे़ या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : शनिवारी सायंकाळी घरासमोरील अंगणात खेळताना बेपत्ता झालेल्या सहा वर्षीय चिमुकल्याचा रविवारी मिलगेट परिसरातील जंगलात मृतदेह आढळला़ चिमुकल्याच्या डोक्यावर जखमा असून चेहराही विद्रूप केला आहे़ या प्रकरणात वजिराबाद पोलिसांनी खून असल्याचा संशय वर्तविला आहे़ या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे़खडकपुरा भागात शेख शोएब शेख सलीम हा सहा वर्षीय चिमुकला आईवडील व भावासह राहत होता़ शोएबचे आई आणि वडील हे दोघेही मजुरीची कामे करतात़ शनिवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास तो घराबाहेर अंगणात खेळत होता़ त्यानंतर तो बेपत्ता झाला़ शोएबच्या आईवडिलांनी त्याचा परिसरात अनेक ठिकाणी शोध घेतला़ परंतु तो सापडला नाही़ त्यानंतर या प्रकरणात वजिराबाद पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली़ दरम्यान, रविवारी दुपारी उस्मानशाही मिलच्या पाठीमागे असलेल्या जंगलात एका मुलाचा मृतदेह पडल्याचे काहींच्या नजरेस पडले़ त्यांनी ही बाब वजिराबाद पोलिसांना कळविली़ वजिराबाद पोलिसांनी घटनास्थळ गाठून तो बेपत्ता असलेला शोएब असल्याचे स्पष्ट केले़ शोएबच्या डोक्यावर जड वस्तूने मारहाण करण्यात आली होती़त्याचबरोबर ओळख पटू नये यासाठी चेहराही विद्रूप करण्यात आला होता़ पोलिसांनी लगेच श्वानपथकाला पाचारण केले़ श्वानपथकाने घटनास्थळापासून ते शोएबच्या घरापर्यंत माग काढला़ या प्रकरणात वजिराबाद पोलिसांकडून शोएब खेळत असताना नेमका कुणासोबत इथपर्यंत आला़ त्याच्यासोबत कोण होते? याची चौकशी सुरु केली आहे़