शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
लग्नाच्या सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
3
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
4
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
5
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
6
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
7
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
8
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
9
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
10
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
11
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
12
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
13
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
14
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
15
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
16
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
17
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
18
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
19
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
20
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत

नांदेडात अवतरली शिवशाही...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 00:43 IST

शाहिरी जलसा, पोवाडे अन् मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी सुरू असलेले तलवारबाजी, लाठीकाठी अन् दांडपट्ट्याची प्रात्यक्षिके, शिवकालीन देखावे, ढोल-ताशांचा गजर आणि शिवरायांच्या नावाच्या गगनभेदी घोषणांनी शहरात शिवशाही अवतरल्याचे चित्र नांदेडकरांना अनुभवायला मिळाले़

नांदेड : शाहिरी जलसा, पोवाडे अन् मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी सुरू असलेले तलवारबाजी, लाठीकाठी अन् दांडपट्ट्याची प्रात्यक्षिके, शिवकालीन देखावे, ढोल-ताशांचा गजर आणि शिवरायांच्या नावाच्या गगनभेदी घोषणांनी शहरात शिवशाही अवतरल्याचे चित्र नांदेडकरांना अनुभवायला मिळाले़शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त आपल्या लाडक्या राजाला अभिवादन करण्यासाठी १९ फेब्रुवारीच्या भल्या पहाटेपासून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात शिवप्रेमींनी हजारोंच्या संख्येने गर्दी केली होती़ शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अनेकांनी अभिवादन केले़ रात्री उशिरापर्यंत अभिवादनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या़ यावेळी युवकांकडून होणारा शिवरायांचा जयघोष, जय जिजाऊ, जय शिवरायांच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता़दरम्यान, शहरातील नवीन मोंढा, छत्रपती चौक, छत्रपती राजर्षी शाहू महाराज पुतळा, सांगवी नाका, चैतन्यनगर, भाग्यनगर, आनंदनगर, अण्णाभाऊ साठे चौक, सिडको-हडको आदी भागांतून निघालेल्या मिरवणुका आणि त्यात सहभागी कार्यकर्त्यांकडून होणारा शिवरायांचा जयघोष मनामनात स्फुरण निर्माण करणारा ठरला़ नवीन मोंढा येथे मराठा सेवा संघ आणि ३२ कक्षाच्या वतीने आयोजित सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या उद्घाटन समारंभानंतर त्याच मंडपात दोन जोडप्यांचा शिवविवाह सोहळा पार पडला़ प्राग़ंगाधर बनबरे यांचे व्याख्यान झाले आणि त्यानंतर भव्य मिरवणूक काढण्यात आली़पावडेवाडी नाका परिसरातील राजर्षी शाहू महाराज पुतळा परिसरात सकल मराठा समाज आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्याची सुरूवात शाहिरी जलशाने झाली़ त्यानंतर उद्घाटन सोहळा, शिवबाचा जन्मोत्सव सोहळा आणि त्यानंतर पाळणा गीते झाली़ यावेळी मंचावर उभारलेला पाळणा, शिवकालीन देखाव्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले़ दरम्यान, छावाचे शहराध्यक्ष तानाजी पाटील यांच्या नेतृत्वात भाग्यनगर येथून मिरवणूक काढण्यात आली़शेतकरी आत्महत्या नाटिकेने वेधले लक्षसकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित शिवजन्मोत्सव सोहळा उद्घाटन सोहळ्यास खा़अशोकराव चव्हाण, आ़ डी़ पी़ सावंत, आ़अमरनाथ राजूरकर, आ़राम पाटील रातोळीकर, जि़प़अध्यक्षा शांताबाई पवार, राजेश पवार, पुनम पवार आदींची उपस्थिती होती़ दरम्यान, मिरवणुकीमध्ये बाल कलावंतांनी विविध नाटकांचे सादरीकरण केले़ उघड्या ट्रकवर मंच साकारून सामाजिक बांधीलकी जोपासणारे आणि जनजागृती निर्माण करणारे विविध नाटकं या कलावंतांनी सादर केले़ यामध्ये शेतकरी आत्महत्येवर आधारित नाटकातील अभिनय काळजाला भिडणारा ठरला़ या रॅलीत शिवकालीन देखावे तसेच राजमाता जिजाऊ आणि शिवाजी महाराज यांची वेशभूषा परिधान करून जिवंत देखावे तयार करण्यात आले होते़ त्याचबरोबर लेझीम पथक, दांडपट्टा पथक आणि ढोल पथकाच्या उत्कृष्ट सादरीकरणाने सर्वांचे लक्ष वेधले़पहाडी आवाजात डफावर थाप अन् त्याला तुणतुण्याची साथशिवजन्मोत्सवानिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकांमध्ये शाहिरांनी सर्वांचे लक्ष वेधले होते़ शिवरायांच्या पराक्रमांचे पोवाडे गाताना पहाडी आवाजात पडणारी डफावर थाप अन् त्याला तुणतुण्याची साथ यामुळे अंगावर शहारे उभे राहत होते़ प्रतापगड, पुरंदर, आग्रा येथून सुटका यासह शिवरायांच्या जीवनातील अनेक रोमांचकारी प्रसंग शाहिरांनी पोवाड्यातून उभे केले होते़ शाहिरांच्या या वीररसाच्या पोवाड्यांनी अवघे वातावरण शिवमय झाले होते़ या पोवाड्यांना नांदेडकरांनीही भरभरुन प्रतिसाद दिला़

टॅग्स :NandedनांदेडShivjayantiशिवजयंती