शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

विभागीय आयुक्तांच्या आदेशालाही नांदेड जि.प.ने झुगारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 18:53 IST

नायगाव पं. स. चे विस्तार अधिकारी जे. एस. कांबळे यांच्या नायगाव येथील पदस्थापनेत बदल करुन नांदेड येथील रिक्त पदावर पदस्थापना द्यावी, असे आदेश विभागीय आयुक्तांकडून दिले  असतानाही या आदेशाची अंमलबजावणी जिल्हा परिषदेत अद्यापही झाली नाही.

नांदेड : नायगाव पं. स. चे विस्तार अधिकारी जे. एस. कांबळे यांच्या नायगाव येथील पदस्थापनेत बदल करुन नांदेड येथील रिक्त पदावर पदस्थापना द्यावी, असे आदेश विभागीय आयुक्तांकडून दिले  असतानाही या आदेशाची अंमलबजावणी जिल्हा परिषदेत अद्यापही झाली नाही.

नायगाव पं. स. तील पंचायत विभागाचे विस्तार अधिकारी जीवन कांबळे यांची बदली नांदेडहून नायगाव पं. स. मध्ये केली होती. नांदेड पं. स. मध्ये कार्यरत असताना प्रभारी गटविकास अधिकाऱ्यांनी ५ जानेवारी २०१७ रोजी त्यांना निलंबित केले होते. या निलंबनाच्या आदेशाविरुद्ध कांबळे यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे अपिल केले. 

मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कांबळे यांचे निलंबन संपुष्टात आणून त्यांना नायगाव  पंचायत समितीमध्ये पदस्थापना दिली. कांबळे यांनी नायगावऐवजी नांदेड येथे आपल्याला पदस्थापना द्यावी, अशी मागणी केली होती. मात्र त्याकडे दुर्लक्षच करण्यात आले. याप्रकरणी कांबळे यांनी न्यायालयातही धाव घेतली होती. मात्र विभागीय आयुक्तांच्या पदस्थापनेबाबतच्या आदेशानंतर त्यांनी न्यायालयातील आपली याचिका मागे घेतली. 

दुसरीकडे नांदेड पं. स. मध्ये रिक्त असलेल्या विस्तार अधिकारी पदावर संजय मिरजकर यांची नियुक्ती करण्याच्या हालचाली जि. प. मध्ये सुरु झाल्या. सार्वत्रिक बदली प्रक्रियेत मिरजकर यांची नियुक्ती नांदेड पं. स. मध्ये करण्यात आली. मात्र या नियुक्तीला कांबळे यांनी आक्षेप घेतला. शासनाने दिलेल्या आदेशानुसार काम केलेल्या ठिकाणी पुन्हा १५ वर्षे नियुक्ती देवू नये असे स्पष्ट केले असताना ही नियुक्ती दिल्याचे तक्रारीत म्हटले. त्यामुळे मिरजकर यांच्या नियुक्तीला सध्या स्थगिती दिली आहे. 

त्याचवेळी विभागीय आयुक्तांना पाठविलेल्या एका पत्रात मिरजकर यांच्या नियुक्तीबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. या सर्व प्रकरणांत विभागीय आयुक्तांच्या आदेशाला मात्र केराची टोपली दाखविली आहे. दरम्यान, या प्रकरणात मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.

विभागीय आयुक्तांचा पत्रव्यवहार सुरूचकांबळे यांच्या बदली प्रकरणात विभागीय आयुक्तांनी २६ मे २०१७ रोजी जि.प.ला अभिप्रायासह अहवाल मागितला. विभागीय आयुक्तांच्या आदेशानंतरही हा अहवाल जिल्हा परिषदेने सादर केला नाही. त्यानंतर २१ सप्टेंबर २०१७ रोजी विभागीय आयुक्तांनी याबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सदर अहवाल विनाविलंब सादर करण्याचे निर्देश दिले. त्यानंतरही अहवाल न मिळाल्याने ७ नोव्हेंबर २०१७ रोजी परत एकदा अहवाल मागविला.

टॅग्स :Nanded zpनांदेड जिल्हा परिषदcommissionerआयुक्तblock development officerगटविकास अधिकारी