शहरं
Join us  
Trending Stories
1
तत्कालीन सीजेआय लाडक्या कर्मचाऱ्यांवर मेहेरबान, सहा सहावेळा इन्क्रीमेंट दिली; सर्वोच्च न्यायालयात नेमके चाललेय तरी काय...
2
जीएसटी कपातीचा आनंद संपल्यात जमा...! नवीन वर्षात ‘महागाईचा झटका’! टीव्ही, कार, स्मार्टफोनच्या किंमती १० टक्क्यांनी वाढणार
3
Kandivali Crime: कांदिवलीत गुंडांचा माज! कॉलर पकडली, वर्दी खेचत पोलिसांना मारहाण; कशामुळे झाला राडा?
4
सिडनी हल्ल्याला नवं वळण, पाकिस्तानी कनेक्शन आलं समोर; दहशतवादी बाप-लेकानं मिळून केला गोळीबार
5
'धुरंधर' अक्षय खन्नाच्या सावत्र आईची प्रतिक्रिया; म्हणाली, "मी कधीच त्याची आई झाले नाही कारण..."
6
काऊंटडाऊन सुरू, उरले १०३ दिवस! वैभव सुर्यवंशीला टीम इंडियात येण्यापासून कोणी रोखू शकणार नाही... कसे...
7
विद्यार्थ्यांना शारीरिक अन् मानसिक शिक्षा देण्यावर बंदी; शिक्षण विभागाने जारी केली नवी नियमावली
8
"वेदनेतून घेतलेला निर्णय, तुमच्या विश्वासाला..."; तेजस्वी घोसाळकरांचं शिवसैनिकांना भावनिक पत्र
9
आज एक चमकणारी एसयुव्ही लाँच होणार; इंटरनेट कनेक्टेड, मोठी टचस्क्रीन सह बरेच काही मिळणार...
10
Crime: आधी पाच मुलांना गळफास लावला, नंतर बापानेही संपवले आयुष्य; दोन मुले वाचली
11
Viral Video: लग्नाआधी तरुणी एक्स बॉयफ्रेंडला जाऊन भेटली, व्हिडीओ सोशल मीडिया तुफान व्हायरल; पण गोष्ट खरी आहे का?
12
'धुरंधर'मधील व्हायरल गाण्यावर शाहरुखनेही केला डान्स? Video व्हायरल; किंग खानचे 'जबरा फॅन' म्हणाले...
13
BMC निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का; बड्या महिला नेत्याचा भाजपात प्रवेश होणार
14
'शक्तिपीठ'च्या मार्गात बदल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक घोषणा म्हणाले, अब आगे बढ़ चुका हूँ मैं... 
15
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य,१५ डिसेंबर २०२५: नशिबाची मिळणार साथ, आज सर्वत्र लाभच लाभ 
16
२ गोळ्या झेलूनही दहशतवाद्याकडून हिसकावली बंदूक; अखेर कोण आहे सिडनीतील हा 'Brave Man'?
17
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
18
विरार-अलिबाग कॉरिडॉर सहा जोडण्यांद्वारे महानगरांना कनेक्ट करणार; ७५ हेक्टरवरील ५०४३ खारफुटी बाधित होणार
19
बापरे! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याला सोसायटीतील व्यक्तीकडून मारहाण, डोक्याला गंभीर दुखापत
20
दोन वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या महाराष्ट्रातील आरोपीला फाशीच, राष्ट्रपतींनी फेटाळली याचिका
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड जिल्हा परिषदेला दलित वस्तीचे ३० कोटी मिळाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 13:36 IST

समाजकल्याण समितीच्या बैठकीत निधीचे नियोजन

ठळक मुद्दे ५० कोटीपैकी ३० कोटी रूपये प्राप्त झाले निधीचे नियोजन करणाऱ्या ठरावास मान्यता

नांदेड : दलित वस्ती विकास योजनेतंर्गत २०१८- १९ मधील मंजूर झालेले ५० कोटीपैकी ३० कोटी रूपये प्राप्त झाले असून या निधीचे नियोजन करणाऱ्या ठरावास मान्यता देण्यात आली आहे़ 

जिल्हा परिषद नांदेड समाज कल्याण समिती मासिक सभा शुक्रवारी दुपारी सभापती शीला निखाते यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे योजनेअंतर्गत वस्त्यांची निवड करणे बाबतचा ठराव विषयसूचीप्रमाणे घेण्यात आला. सदर योजनेअंतर्गत  २०१८- १९ मध्ये  ५०   कोटी रूपये मंजूर झाले असून त्यापैकी डिसेंबरअखेर ३० कोटी रूपये तरतूद प्राप्त असल्याची माहिती जिल्हा समाजकल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार यांनी सभेत  दिली.  या निधीचे नियोजन करण्याबाबतच्या ठरावास सभापतींसह उपस्थित सर्व समिती सदस्यांनी मान्यता दिली.

वैयक्तिक लाभाच्या योजनांचे लाभार्थी निवडीबाबतचा विषय घेण्यात आला असून २०१८- १९  या वर्षात ज्या लाभार्थ्यांनी शिलाई मशीन,  सायकल, विद्युत मोटार, झेरॉक्स मशीन, पिठाची गिरणी, वाहन योजनेचा लाभ मिळण्यासाठी आवेदनपत्र सादर केलेली आहेत, अशा लाभार्थ्यांची निवड समितीमध्ये करण्यात आली आहे.  ५ टक्के दिव्यांग आणि जिल्हा दिव्यांग निधी या योजनेचे लाभार्थी निवडीसाठी  पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे सादर करायच्या प्रस्तावास देखील समितीने मान्यता दिली़ या सभेस समाजकल्याण समिती सदस्य  संगीता अटकोरे,  सविता   वारकड, विजयश्री  कमठेवाड,  शकुंतला  कोलमवाड - बोनलेवाड,  संगीता  गायकवाड, सुंदराबाई  मरखले,  भाग्यश्री  साबणे,  सुनयना  जाधव व   गंगाप्रसाद  काकडे उपस्थित होते़  

लाभार्थ्यांची निवड२०१८- १९ या वर्षात शिलाई मशीन, सायकल, विद्युत मोटार, झेरॉक्स मशीन, पिठाची गिरणी तसेच वाहनासाठी अर्ज केलेल्या लाभार्थ्यांची निवड समाजकल्याण समितीच्या बैठकीत करण्यात आली़ 

टॅग्स :NandedनांदेडNanded zpनांदेड जिल्हा परिषदfundsनिधी