शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड जिल्हा परिषदेच्या १ हजार शाळा अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 13:34 IST

मूलभूत सुविधांची वानवा 

ठळक मुद्देशाळांकडे २९ लाख रुपयांचे बिल थकलेविजेअभावी डिजिटलायझेशन वाऱ्यावर

नांदेड : जिल्ह्यातील जि़प़ च्या तब्बल १ हजार १९ शाळांचा विद्युत पुरवठा बंद असल्याने या शाळा अंधारात आहेत़ यातील ६२२ शाळांना अद्याप वीजजोडणीच करण्यात आली नसल्याचे वास्तव समोर आले आहे. 

जिल्ह्यात सोळा तालुक्यात २ हजार २६३ शाळा आहेत़ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषदेच्या शाळा हाच पर्याय आहे़ सर्व शिक्षा अभियानांतर्गत  शाळा विकासासाठी लाखोंचा निधी देण्यात येतो़ मात्र काही शाळांना हा निधी उपलब्ध होत नसल्याने संबंधित शाळा प्रशासन विद्युत बिल भरत नाहीत़ यामुळे शाळेतील विद्युत पुरवठा खंडीत केला जात आहे. अनेक शाळेतील संगणक कक्षात धूळ साचली आहे़   जिल्हा परिषदेच्या वाडी, वस्ती, तांड्यावरील ६२२ शाळेत विज जोडणी झाली नाही़ तर ३९७ शाळांनी विद्युत बिल भरले नाही़ या शाळांकडे जवळपास २८ लाख ९५ हजार रूपये वीज बिल थकले आहे.

सुविधांअभावी कुचंबणा खाजगी शाळांच्या स्पर्धेत उतरत असताना जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांना मूलभूत सुविधांचीही पूर्तता करता येत नसल्याचे चित्र आहे़ अनेक शाळेत स्वच्छतागृह नसल्याने विद्यार्थ्यांची कुचंबणा होत आहे़ विशेषता १२३ शाळेत  विद्यार्थिंनीसाठी स्वच्छतागृह नाही.या कारणामुळे  मुली शिक्षणापासून दूर राहत आहेत़ 

विजेअभावी डिजिटलायझेशन वाऱ्यावरजिल्हा परिषद शाळांचे डिजिटलायझेशन होत असल्याची चर्चा होत असताना अनेक शाळेत पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, क्रीडांगण, विद्युत पुरवठा नसल्याचे सिद्ध झाले आहे़ त्यामुळे डिजिटल शाळांच्या वाटेत मोठा अडथळा निर्माण होत आहे़ जिल्ह्यात ज्या शाळा डिजिटल झाल्या आहेत तेथे वीजच नसल्याने डिजिटलायझेशन वाऱ्यावर आहे.

शासनाने शाळांचे थकीत बिल माफ करावे, अशी मागणी करण्यात आली होती़ शासन निर्णयानुसार शाळांना जो विद्युत पुरवठा केला जातो त्याचे व्यावसायिक दराने बिल न अकारता घरगुती दराने बिल आकारणे गरजेचे आहे़ ज्या शाळेत वीज नाही, त्या ठिकाणी शालेय समितीने पाठपुरावा करून शाळेला विद्युत जोडणी करून घेणे आवश्यक आहे़ - व्यंकटेश चौधरी, शिक्षण विस्तार अधिकारी़ 

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाNanded zpनांदेड जिल्हा परिषदSchoolशाळाelectricityवीज