शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

नांदेडमध्ये जुन्या वादातून ट्रॅक्टर चालक तरूणाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 15:54 IST

या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना जेरबंद केले आहे.

नवीन नांदेड :  जुन्या वादातून भायेगाव येथील एका ३५ वर्षीय तरूणाचा जबर मारहाण करून खून केल्याची घटना गुरुवारी रात्री उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना जेरबंद केले आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की, भायेगाव (ता.जि. नांदेड) येथील दत्ता उर्फ मोगो हनुमंत कोल्हे, राम उर्फ काळबा दत्तराव कोल्हे व बालाजी भीमराव कोल्हे यांनी गुरुवारी (दि.२०) रात्री १०.३० वाजे दरम्यान काकांडी रस्त्यावर भायेगाव येथीलच ट्रॅक्टर चालक संजय गोपीनाथ कोल्हे यास शिवीगाळ करून  धक्काबुक्की केली. यानंतर वाद वाढवत नेऊन तिघांनी संजयला लोखंडी टॉमीने जबर मारहाण केली. यात गंभीर जखमी संजयला नागरिकांनी उपचारासाठी विष्णूपुरी येथील शासकीय रूग्णालयात दाखल केले. येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. अशी माहिती ठाणे अंमलदार दिलीप पंडित व मदतनीस पो. कॉ. विशाल वाघमारे यांनी दिली.

दरम्यान, पोउपनि. गजानन पाटील, गुन्हे शोध पथकातील पोउपनि. गोविंद खैरे तसेच त्यांचे सहकारी पोलीस कर्मचारी, पोउपनि. प्रसेनजित जाधव, पो.कॉ. तानाजी चाटे, नामदेव मोरे आदींनी सहायक पो.नि. कमलाकर गड्डीमे यांच्या मार्गदर्शनाखाली तिन्ही आरोपींना अटक केली आहे.

टॅग्स :MurderखूनArrestअटकNandedनांदेड