शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

हळद लागण्याआधीच काळाने गाठलं; नांदेड ट्रॅक्टर अपघातातील मृतांत दोन भावी वधूंचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 19:31 IST

हळदीची तयारी थांबून दोन्ही तरुणींना अखेरचा निरोप देण्याची वेळ आल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील आलेगाव येथे शुक्रवारी सकाळी शेतमजुरीसाठी जात असलेला ट्रॅक्टर ट्रॉलीसह विहिरीत कोसळून सात महिलांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. यावेळी विहिरीत पडलेल्या दोन महिला आणि एका पुरुषाला सुखरूप बाहेर काढण्यात ग्रामस्थांना यश आले. पण, ट्रॉलीखाली अडकलेल्या सात जणींचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये पाच महिला आणि दोन तरुणींचा समावेश आहे. मृत दोन्ही तरुणींचा विवाह ठरला होता अशी माहिती आहे. मात्र, आता हळदीची तयारी थांबून त्यांना अखेरचा निरोप देण्याची वेळ आल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

या अपघातात मृतांमध्ये दोन भावी वधूंचाही समावेश आहे. धृपता सटवाजी जाधव (१८) आणि सिमरन संतोष कांबळे (१८) अशी त्यांची नावे आहेत.  त्यांचे लग्न मे महिन्यात ठरले होते. लग्नाचा खर्च भागवण्यासाठी त्या मजुरीसाठी निघाल्या होत्या. पण नियतीने वेगळंच लिहून ठेवलं होतं. धृपता आपल्या आईसोबत मजुरीला गेली होती. या अपघातात दोघींचाही मृत्यू झाला. हळद लागण्याआधीच घरात शोककळा पसरली आहे. दरम्यान, सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना प्रधानमंत्री मदत निधीतून २ लाख आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ५ लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. तर या घटनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी कठडे नसलेल्या विहिरींची नोंद घेण्याचे आदेश दिले आहेत. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

चालकाने महिलांचं ऐकलं असतं तर... रुंज, आलेगाव ते कांचननगर रस्त्यापासून जवळपास एक किलोमीटर आत शिंदे यांचे शेत आहे. ज्या शेतात भुईमूग आहे, तिथे ट्रॅक्टर घेऊन जाणे शक्य नाही. पण, सध्या गहू कापणीनंतर रान रिकामं झालेलं आहे. त्यामुळे नागेशने विहीर असलेल्या शेताच्या बाजूने दुसऱ्या शेतात ट्रॅक्टर नेण्याचा प्रयत्न केला. परंतु, गुरुवारी रात्री झालेल्या पावसामुळे चारी ओली होती. त्यामुळे तेथून ट्रॅक्टरवर काढण्यासाठी त्याला कसरत करावी लागली. ट्रॉली जाणार नाही, हे लक्षात आल्यानंतर महिलांनी इथेच उतरू दे, आम्ही पायी येताे, असा आग्रही धरला. पण, नागेशने त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत चारीतून ट्रॅक्टर काढण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी स्पीड वाढविली अन् ट्रॅक्टर चारीतून निघून थेट विहिरीत कोसळले. 

टॅग्स :NandedनांदेडAccidentअपघात