शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

'तिकडे ट्रॅक्टर नको घालू'; चालकाने महिलांचं ऐकलं असतं तर वाचले असते सात जणींचे प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 13:07 IST

Nanded Tractor Accident: चालकाचा निष्काळजीपणा अन् हुल्लडबाजीनेच हा अपघात झाल्याचे सांगत नातेवाइकांनी त्याच्याविषयी रोष व्यक्त केला.

नांदेड : पाऊस झालेला असल्याने चारीतून ट्रॅक्टर निघणार नाही, चढ-उतार आहे. तिकडे ट्रॅक्टर नको घालू, आम्हाला इकडेच उतरू दे, असे सांगूनही चालक नागेश आवटे याने केलेली डेरिंग सात महिलांच्या जीवावर बेतली. त्या शेतमजूर महिलांनी केलेली विनवणी नागेशने ऐकली असती तर ही वेळ आलीच नसती, त्याचा निष्काळजीपणा अन् हुल्लडबाजीनेच हा अपघात झाल्याचे सांगत नातेवाइकांनी त्याच्याविषयी रोष व्यक्त केला. यावेळी अनेकांना अश्रू अनावर झाले. 

रुंज, आलेगाव ते कांचननगर रस्त्यापासून जवळपास एक किलोमीटर आत शिंदे यांचे शेत आहे. ज्या शेतात भुईमूग आहे, तिथे ट्रॅक्टर घेऊन जाणे शक्य नाही. पण, सध्या गहू कापणीनंतर रान रिकामं झालेलं आहे. त्यामुळे नागेशने विहीर असलेल्या शेताच्या बाजूने दुसऱ्या शेतात ट्रॅक्टर नेण्याचा प्रयत्न केला. परंतु, गुरुवारी रात्री झालेल्या पावसामुळे चारी ओली होती. त्यामुळे तेथून ट्रॅक्टरवर काढण्यासाठी त्याला कसरत करावी लागली. ट्रॉली जाणार नाही, हे लक्षात आल्यानंतर महिलांनी इथेच उतरू दे, आम्ही पायी येताे, असा आग्रही धरला. पण, नागेशने त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत चारीतून ट्रॅक्टर काढण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी स्पीड वाढविली अन् ट्रॅक्टर चारीतून निघून थेट विहिरीत कोसळले. विहिरीत पडलेल्या दोन महिला आणि एका पुरुषाला सुखरूप बाहेर काढण्यात ग्रामस्थांना यश आले. पण, ट्रॉलीखाली अडकलेल्या सात जणींचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये पाच महिला आणि दोन तरुणींचा समावेश आहे.

रात्री उशिरा चालक ताब्यातनागेश आवटे हा अनेक वर्षांपासून दगडोजी शिंदे यांच्या शेतात काम करतो. त्यामुळे त्यांचे ट्रॅक्टरदेखील तो चालवितो. त्याचे वय १६-१७ वर्ष असल्याची चर्चा होती. अल्पवयीन मुलाच्या हाती ट्रॅक्टरसारख्या वाहनाचे स्टेअरिंग दिलेच कशाला? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. मात्र, अपघातानंतर पसार झालेल्या चालकास पोलिसांनी बचाव कार्य संपल्यानंतर शोधून काढले. चौकशीअंती तो अल्पवयीन नसल्याचे स्पष्ट झाले. त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सपोनि बोधनकर यांनी सांगितले.

ट्रॅक्टर विहिरीत पडल्याचे सांगत ठोकली धूमचालक नागेश याने ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटताच उडी घेतली. त्यामुळे त्याचा प्राण वाचला. मात्र, मातीत कष्ट करून पोट भरणाऱ्या महिलांना त्याने मृत्यूचे दाढेत लोटले. घटनेनंतर घटनास्थळावरून धूम ठोकणाऱ्या नागेशने रस्त्यात मेंढपालांना घडलेला प्रकार सांगितला. महिलांसह ट्रॅक्टर विहिरीत पडल्याचे सांगितल्याने मेंढपालांनी परिसरातील शेतकऱ्यांसह घटनास्थळाकडे धाव घेतली.

टॅग्स :AccidentअपघातNandedनांदेड