शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

ट्रॉलीसह ट्रॅक्टर विहिरीत कोसळून ७ कष्टकरी महिलांचा बुडून अंत; तिघांचे असे वाचले प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 14:57 IST

Nanded Tractor Accident: या घटनेमुळे आलेगाव, गुंजसह परिसरातील गावांमध्येदेखील स्मशानशांतता पसरली आहे.

नांदेड : टीचभर पोटासाठी मिळेल ते काम करून जगणाऱ्या अन् कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी हातभार लावणाऱ्या कष्टकरी महिलांचा विहिरीत बुडून दुर्दैवी अंत झाला. कधीच कष्टाला न जुमानणाऱ्या, प्रामाणिकपणे काम करून पोटाची खळगी भरण्यासाठी भल्या पहाटे रानात निघालेल्या सात महिलांच्या मृत्यूने अख्खे गाव सुन्न झाले असून, या घटनेमुळे आलेगाव, गुंजसह परिसरातील गावांमध्येदेखील स्मशानशांतता पसरली आहे. नांदेड तालुक्यातील आलेगाव शिवारातील विहिरीत ट्रॉलीसह ट्रॅक्टर कोसळून सात महिलांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी पहाटे घडली. मृतांमध्ये पाच महिला आणि दोन तरुणींचा समावेश आहे. तर विहिरीत पडलेल्या दोन महिला आणि एका पुरुषाला सुखरूप बाहेर काढण्यात ग्रामस्थांना यश आले. पण, ट्रॉलीखाली अडकलेल्या सात जणींचा बुडून मृत्यू झाला.

आलेगाव येथील शेतकरी दगडोजी लक्ष्मण शिंदे यांच्या मालकीच्या शेतात गुंज येथील शेतमजूर महिला, पुरुष कामाला येतात. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने पहाटेच्या वेळी अधिक काम होईल अन् चार पैसे लागून येतील, या अपेक्षेने महिला मजूर उपाशीपोटीच रानात दाखल होत आहेत. शुक्रवारी पहाटे शिंदे यांच्या कामावर असलेल्या नागेश आवटे याने गुंज गावातून महिलांना ट्रॅक्टरमध्ये घेतले. गुंजपासून काही मिनिटांच्याच अंतरावर असलेल्या शिंदे यांच्या शेतात मजुरांना घेऊन निघालेला ट्रॅक्टर साडेसात वाजेच्या सुमारास तेथे पोहोचला. दरम्यान, विहिरीलगत असलेल्या चारीतून ट्रॅक्टर वर काढून दुसऱ्या शेतात नेताना हा अपघात झाला अन् होत्याचे नव्हते झाले. ट्रॅक्टर कंट्रोल होत नाही हे लक्षात येताच चालक नागेश आवटे याने उडी घेत स्वत:चा जीव वाचवला. पण, दहा जणांसह ट्रॅक्टरच्या हेडसह ट्रॉली विहिरीत कोसळली. कॅनॉलला पाणी येऊन गेल्याने ८० फूट खोल विहिरीत जवळपास ४० फूट पाणी होते. त्यामुळे हेडसह ट्रॉली पूर्णपणे विहिरीत बुडाली. सर्व जण ट्रॉलीच्या खाली अडकले. त्यावेळी दोन महिला अन् एका पुरुषाच्या हाती विहिरीतील मोटारीचा पाइप लागला. त्याचा आधार घेत ते मदतीसाठी धावा करीत होते. त्यावेळी घटनास्थळी धाव घेतलेल्या शेतकरी, ग्रामस्थांच्या मदतीने त्यांचे प्राण वाचविता आले. पण, पाण्यात बुडालेल्या सात महिलांचा जीव त्यांना वाचविता आला नाही.

हात सुटला अन् पार्वतीची जाऊ सरस्वती बुडाली...ट्रॅक्टरच्या हेडची समोरील दोन्ही चाके वर झाली आणि काही कळायच्या आत ट्रॉलीसह मजूर महिला विहिरीत कोसळल्या. प्रत्येकाने आपला जीव वाचविण्यासाठीची धडपड केली. त्यात पार्वती बुरड यांच्या हाती पाइप लागला अन् त्यांनी लगेचच आपली जाऊ सरस्वतीचा धावा करीत तिला आवाज दिला, तिने हातही दिला. पण, तो निसटला अन् सरस्वती बुडून तिचा मृत्यू झाला. या दोन्ही जावांसोबत सासू कांताबाई बुरड दररोज कामाला येत असतात. पण, शुक्रवारी त्यांना वसमतला जायचे असल्याने त्या घरीच थांबल्या. या अपघातापासून त्या बचावल्या असल्या तरी सुनेच्या मृत्यूने त्या पुरत्या खचल्या आहेत. तान्हुल्यासह तीन लेकरं सोडून गेलेल्या सरस्वतीच्या मृत्यूने कांताबाईचे अश्रू थांबत नव्हते.

टॅग्स :NandedनांदेडAccidentअपघात