शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड : जीव धोक्यात घालून ते पोहोचवतात दूध; गुरफळीच्या दुग्ध व्यावसायिकांची कसरत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2021 07:54 IST

नदीला पूर आल्यानं, तसंच रस्ते वाहतूक ठप्प झाल्याने शहरात दूध पुरवठा करणाऱ्या दुग्ध व्यावसायिकांची अडचण झाली आहे.

ठळक मुद्देनदीला पूर आल्यानं, तसंच रस्ते वाहतूक ठप्प झाल्याने शहरात दूध पुरवठा करणाऱ्या दुग्ध व्यावसायिकांची अडचण झाली आहे.

सुनील चौरे हदगाव (जि. नांदेड) : मुसळधार पावसामुळे नदीला पूर आल्याने तालुक्यातील २५ गावांचा संपर्क तुटला आहे. रस्ते वाहतूक ठप्प झाल्याने शहरात दूध पुरवठा करणाऱ्या दुग्ध व्यावसायिकांची अडचण झाली आहे. मात्र, गुरफळी येथील युवक रोज  पोहत नदी पार करत दूध पुरवठा करत आहेत.  

गुरफळी  येथील नदीला पूर येऊन  गावाला पाण्याचा वेढा पडत असल्याने या गावाचे पुनर्वसन झाले आहे. परंतु काही लोकांची शेती नदीपलीकडील विदर्भ शिवारात आहे. गेल्या तीन पिढ्यांपासून या गावातील शेतकरी दुग्ध व्यवसाय करतात. दररोज १० किमी अंतर चालत जात हदगाव शहरात दूध पुरवठा करतात. तीन वर्षापूर्वी बेलमंडळ गावात डेअरी सुरू झाल्याने पायी प्रवास कमी होऊन  दोन किमी झाला आहे. मात्र, पावसाळ्यात नदीला पूर येत असल्याने पोहतच नदीपात्र ओलांडावे लागते. 

दररोजची जीवघेणी कसरत थांबविण्यासाठी एक होडी खरेदी करण्यात आली होती. मात्र, चालकाचा मृत्यू झाल्याने होडी नदीकिनारीच आहे. त्यामुळे रोज किमान अर्धातास पोहत नदी पार करण्याशिवाय पर्याय नाही.

कौतुक नको, पूल हवानदीपार करत शहरात दूध पोहोचविणाऱ्या या धाडसी युवकांचा व्हीडिओ समाजमाध्यमात ‘व्हायरल’ होताच त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. मात्र, कौतुक नको, या नदीवर पूल बांधून देण्यासाठी सरकारला आवाहन करा, अशी विनंती गावकऱ्यांनी केली आहे.

या जिद्दीला सलाम!   गुरफळी गावातील दहा युवक पोटाला दुधाची किटली बांधून अर्धा तास पोहत नदीपात्र पार करतात. नदीपात्र खूप खोल असल्याने एकमेकांना आधार देत रोज ही जीवघेणी कसरत करावी लागते. भरपावसात देखील त्यांच्या ‘जलदिंडी’ला खंड पडलेला नाही, हे विशेष! 

टॅग्स :milkदूधfloodपूरNandedनांदेड