शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
3
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
4
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
5
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
6
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
7
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
8
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
9
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
10
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
11
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
12
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
13
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
14
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
15
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
16
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
17
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
18
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
19
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
20
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव

नांदेडची पोलीस यंत्रणा मुख्य आरोपींच्या शोधात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 00:25 IST

मेगा अ‍ॅग्रो कंपनीतील मॅनेजरचा जामीन बिलोली जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर आता पोलीस मुख्य आरोपींच्या शोधात लागले आहेत. मागच्या १५ दिवसांत मराठा आंदोलनाच्या बंदोबस्तामुळे व्यस्त पोलीस विभागाने आता तपास वाढवल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली़

ठळक मुद्देधान्य घोटाळा : मॅनेजरचा जामीन फेटाळल्याने पोलीस तपास वेगात

लोकमत न्यूज नेटवर्कबिलोली : मेगा अ‍ॅग्रो कंपनीतील मॅनेजरचा जामीन बिलोली जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर आता पोलीस मुख्य आरोपींच्या शोधात लागले आहेत. मागच्या १५ दिवसांत मराठा आंदोलनाच्या बंदोबस्तामुळे व्यस्त पोलीस विभागाने आता तपास वाढवल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली़गेल्या महिन्यातील १८ तारखेला एफसीआय गोदामातून निघालेले शासकीय धान्य शासकीय संबंधित गोदामाकडे न जाता मेगा अ‍ॅग्रो कंपनीत वळले़ बऱ्याच दिवसांपासून पाळतीवर असलेल्या पोलिसांनी दहा तांदूळ व गव्हाचे ट्रक पकडले़ घटना होताच शासकीय वाहतूक कंत्राटदार राजू पारसेवार व त्यांचा पार्टनर दमकोंडवार आणि मेगा अ‍ॅग्रोचे मालक अजय बाहेती फरार झाले़ दहा ट्रकचालकांना नायगावच्या कनिष्ठ न्यायालयातून जामीन मिळाला़ सध्या सर्व ट्रक पोलिसांच्या ताब्यात आहेत़---

  • बिलोली, कुंडलवाडी, तसेच देगलूर व मुक्रमाबाद या शासकीय गोदामात एन्ट्री करून रास्त भाव दुकानदाराकडे द्वारपोच धान्य पोहोचवणे अपेक्षित होते़ मात्र पुरवठा विभागाला हाताशी धरून शासकीय वाहतूक कंत्राटदाराने परस्पर धान्याची विल्हेवाट लावल्याची माहिती पोलिसांनी से-रिपोर्टमध्ये बिलोलीच्या सत्र न्यायालयात दाखल केली़
  • मॅनेजरने अ‍ॅग्रो कंपनीचा आपला संबंध नाही, आपण येथे कर्मचारीच नाही असा पवित्रा न्यायालयात घेतला, पण तपास अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी तापडिया मॅनेजर असल्याचे भक्कम पुरावे सादर केल्याने न्या़ एस़बी़ कचरे यांनी त्याचा जामीन फेटाळला़
  • धान्य घोटाळ्यातील तपास व चौकशी वाढवण्यात आली असून शासकीय ठेकेदार पारसेवार व मेगा कंपनीचे संचालक अजय बाहेती यांना ताब्यात घेतल्यानंतरच संपूर्ण प्रकरण पुढे येणार आहे़ यात पुरवठा विभागातील काहीजण अडकण्याचीही शक्यता आहे.
टॅग्स :NandedनांदेडNanded policeनांदेड पोलीसNanded S Pपोलीस अधीक्षक, नांदेडfraudधोकेबाजी