शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड, परभणी, हिंगोलीला अवकाळी पावसाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 12:47 IST

या पावसामुळे रबीच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून उभ्या पिकांवर रोगराई पसरायला सुरुवात झाली आहे.  

ठळक मुद्दे नांदेड शहरासह विविध ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस परभणीत दुसऱ्यांदा अवकाळी हिंगोली जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी बरसला

नांदेड/परभणी/हिंगोली : मराठवाड्यातील नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत गुरुवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे रबीच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून उभ्या पिकांवर रोगराई पसरायला सुरुवात झाली आहे.  

नांदेड जिल्ह्यातील लोहा, भोकर, किनवट, उमरी आदी भागांत  बुधवारी पाऊस झाला होता.  उमरी येथे ७.६७ मि.मी. तर भोकर तालुक्यात १०.२५ मि.मी. पावसाची नोंद झाली. 

दुसऱ्या दिवशी गुरुवारीही नांदेड शहरासह विविध ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. नांदेड तालुक्यात ३.५० मि.मी. तर मुदखेड तालुक्यात ५ मि.मी. पावसाची नोंद झाली. दोन दिवसांत जिल्ह्यात ३२.७५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सध्या हरभरा, गहू, तुरीचे पीक शेतात आहे. अवकाळी पावसामुळे या पिकांचे नुकसान झाले असून रोगराईमुळे उत्पन्नातही घट होण्याची शक्यता आहे. 

परभणीत दुसऱ्यांदा अवकाळी परभणी शहरासह परिसरामध्ये गुरुवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. आठवडाभरात दुसऱ्यांदा पाऊस झाला. दिवसभर शहरामध्ये ढगाळ वातावरण होते. सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारासही शहरात पुन्हा एकदा भुरभुर पाऊस सुरू झाला. बदललेल्या वातावरणामुळे आणि अचानक आलेल्या पावसामुळे रबी हंगामातील पिकांच्या वाढीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

हिंगोली जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी बरसलाहिंगोली जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी काही भागात तुरळक पावसाने हजेरी लावली. हिंगोलीत गुरुवारी सकाळी पंधरा ते वीस मिनिटे चांगल्याच सरी बरसल्या. रात्री नऊ वाजेदरम्यान पुन्हा पाऊस झाला. जिल्ह्यातील नांदापूर, वारंगा फाटा, आडगाव रंजे, डोंगरकडा, कवठा, आखाडा बाळापूर, हयातनगर, दांडेगाव आदी परिसरात हा पाऊस झाला.  

टॅग्स :NandedनांदेडHingoliहिंगोलीparabhaniपरभणीRainपाऊस