शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड मनपात मजुरांचे वारस लिपीक पदावर; आयुक्तांनी दिले चौकशी करण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2017 12:54 IST

औरंगाबाद महापालिके - पाठोपाठ नांदेड महापालिकेतही मजुरांच्या वारसांची थेट लिपीक पदावर नियुक्ती केल्याचा प्रकार समोर आला आहे़ या नियुक्त्या देताना लाड-पागे समितीच्या शिफारशीकडे साफ कानाडोळा करण्यात आला़ या प्रकरणात आता आयुक्त गणेश देशमुख यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत़ 

ठळक मुद्देसफाई कामगारांच्या रिक्त झालेल्याच जागेवर त्यांच्या वारसांना नियुक्ती देण्याची प्रचलित शासन नियमात तरतुद आहे.आस्थापना विभागाने २००९-१० या कालावधीत एकूण ९ उमेदवारांना थेट वर्ग- ३ च्या लिपीक या पदावर नियुक्ती दिल्याचे गंभीर प्रकरण उघडकीस आले आहे़ औरंगाबाद व नवी मुंबई महापालिकेत अशाच प्रकारे लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार नियुक्त्या करताना झालेल्या अनियमिततेची शासनाने ज्येष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांच्यामार्फत चौकशी केली होती़ 

नांदेड: औरंगाबाद महापालिके - पाठोपाठ नांदेड महापालिकेतही मजुरांच्या वारसांची थेट लिपीक पदावर नियुक्ती केल्याचा प्रकार समोर आला आहे़ या नियुक्त्या देताना लाड-पागे समितीच्या शिफारशीकडे साफ कानाडोळा करण्यात आला़ या प्रकरणात आता आयुक्त गणेश देशमुख यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत़ 

सफाई कामगारांच्या रिक्त झालेल्याच जागेवर त्यांच्या वारसांना नियुक्ती देण्याची प्रचलित शासन नियमात तरतुदी असताना आस्थापना विभागाने २००९-१० या कालावधीत एकूण ९ उमेदवारांना थेट वर्ग- ३ च्या लिपीक या पदावर नियुक्ती दिल्याचे गंभीर प्रकरण उघडकीस आले आहे़ औरंगाबाद व नवी मुंबई महापालिकेत अशाच प्रकारे लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार नियुक्त्या करताना झालेल्या अनियमिततेची शासनाने ज्येष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांच्यामार्फत चौकशी केली होती़ 

तक्रारीत तथ्य असल्याचा निष्कर्ष निघाल्यानंतर उपायुक्तापासून संचिका हाताळणा-या सर्व लिपीकाविरुद्ध विभागीय चौकशी सुरु करण्यात आली़ नांदेडातही तसाच प्रकार उघडकीस आला़ नांदेड महापालिकेत नऊ वारसांना थेट लिपीक पदावर नियुक्ती देण्यात आली आहे़ या प्रकरणात आयुक्त गणेश देशमुख यांनी चौकशीसाठी मुख्य लेखा परीक्षक रावसाहेब कोलगने यांची निवड केली आहे़ त्यांना १५ दिवसांत अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे़ या प्रकरणात तत्कालीन आस्थापनेवरील लिपीक, कार्यालय अधीक्षक, सहाय्यक आयुक्त व उपायुक्त हे चौकशीच्या फे-यात येण्याची शक्यता आहे़ त्याचबरोबर भरत्यामध्ये अशा प्रकारचे आणखी काही घोटाळे झाले का? हे तपासून पाहण्याचीही गरज आहे़ 

टॅग्स :NandedनांदेडMuncipal Corporationनगर पालिका