शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
4
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
5
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
6
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
7
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
8
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
9
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
10
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
11
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
12
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
13
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
14
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
15
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
16
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
17
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
18
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
19
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
20
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही

नांदेड मनपा स्थायीचे आठ सदस्य होणार निवृत्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 23:30 IST

महापालिका स्थायी समितीच्या आठ सदस्यांचा कार्यकाळ १ डिसेंबर रोजी संपत असून हे सदस्य कोणते ? ते सोमवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत स्पष्ट होणार आहे.

ठळक मुद्देबीओटी प्रकल्पासह दलितवस्ती निधीचीही होणार चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : महापालिका स्थायी समितीच्या आठ सदस्यांचा कार्यकाळ १ डिसेंबर रोजी संपत असून हे सदस्य कोणते ? ते सोमवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत स्पष्ट होणार आहे. चिठ्ठीद्वारे १६ पैकी ८ सदस्य निवृत्त होणार आहेत. त्यामुळे सोमवारच्या बैठकीत निघणा-या चिठ्ठ्यातील नावाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.नांदेड मनपाच्या स्थायी समितीची बैठक २६ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता सभापती शमीम अब्दुल्ला यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या बैठकीत ९ विषय ठेवण्यात आले आहेत. त्यामध्ये आर्थिक देयकांच्या मंजुरीचे, कर्मचारी वेतनवाढ हे विषयही आहेत.त्याचवेळी या बैठकीत निवृत्त होणारे आठ सदस्य कोणते ? याकडे लक्ष लागले आहे. स्थायी समिती सभापती शमीम अब्दुल्ला, माजी महापौर अब्दुल सत्तार, माजी उपमहापौर आनंद चव्हाण, उमेश पवळे, माजी सभापती मसूद अहेमद खान, फारुखअली खान, सयद शेरअली, सतीश देशमुख, मोहिनी येवनकर, प्रशांत तिडके, अ. लतिफ अ. माजीद, भानुसिंह रावत, कांताबाई मुथा, गुरुमितसिंघ नवाब, ज्योत्स्रा गोडबोले या १५ काँग्रेस नगरसेवकांचा आणि वैशाली देशमुख या एका भाजपा नगरसेविकेचा स्थायी समितीत समावेश आहे. वर्षानंतर निवृत्त होणाºया आठ सदस्यांची नावे चिठ्ठीद्वारे काढली जाणार आहेत.स्थायी समितीतील आठ रिक्त पदासाठीची नावे ही महापालिकेच्या आगामी सर्वसाधारण सभेत घोषित केली जाणार आहेत.त्याचवेळी विद्यमान स्थायी समिती अध्यक्ष शमीम अब्दुल्ला यांच्या कार्यकाळातील ही शेवटचीच बैठक राहणार आहे. त्यामुळे या बैठकीतील निर्णयाकडेही लक्ष लागले आहे. निवृत्त होणाºया आठ सदस्यांसह या बैठकीत शहरातील बीओटी अंतर्गत प्रकल्पांची सद्य:स्थितीवरही चर्चा केली जाणार आहे. भानुसिंह रावत आणि अ.लतिफ यांनी हा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवला आहे. महापालिकेच्या आर्थिक उत्पन्नवाढीसाठी बीओटी अंतर्गत प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. मात्र त्या प्रकल्पाची वाटचाल संथगतीने सुरु असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.इमारत निरीक्षकांना देण्यात आलेल्या वेतनश्रेणीवरही स्थायी समितीने आक्षेप घेतला आहे. नियमबाह्यरित्या इमारत निरीक्षकांना वेतनवाढ दिल्याचा आरोप करण्यात आला असून यामध्ये सभागृहाचा अवमान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणातील अधिकाºयांवर कारवाईची मागणीही करण्यात आली आहे.रखडलेल्या दलितवस्ती निधीवरही चर्चामहापालिकेला उपलब्ध झालेला दलितवस्ती निधी आतापर्यंत खर्च झाला नाही. परिणामी शहरातील अनेक दलित वस्त्या विकासापासून वंचित आहेत. याबाबत स्थायी समितीचे भानुसिंह रावत व अ. लतिफ यांनी चर्चेचा प्रस्ताव ठेवला आहे. दलितवस्ती निधीअंतर्गत मागील दोन वर्षांची कामे रखडली आहेत. राजकीय तसेच प्रशासकीय अडथळ्यामुळे या कामांना मुहूर्त लागत नसल्याचे दिसत आहे. ही कामे रखडल्याने स्थानिक नगरसेवकांना नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. याबाबत प्रशासनाने काय कार्यवाही केली? दलित वस्ती अंतर्गतची कामे का रखडली? ही कामे कधी होणार? असे अनेक प्रश्न पुढे आले आहेत. त्यावर सोमवारी होणाºया स्थायी समितीत चर्चा केली जाणार आहे.‘जीबी’ पुढे ढकलली ?महापालिकेची सर्वसाधारण सभा २९ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती. या सभेत १३ विषय मान्यतेसाठी ठेवण्यात आले आहेत. त्यामध्ये वजिराबाद भागातील व्यंकटराव तरोडेकर मार्केटचा बीओटी तत्त्वावरील विकासाची निविदाही आहे. या सभेकडे लक्ष लागलेले असतानाच ही सभा पुढे ढकलावी, असे पत्र महापौरांनी दिले आहे. त्यावर सोमवारी निर्णय होणार आहे.

टॅग्स :NandedनांदेडNanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिका