शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
4
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
5
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
6
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
7
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
8
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
9
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
10
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
11
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
12
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
13
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
14
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
16
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
17
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
18
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
19
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
20
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे

नांदेड मनपा पदाधिकारी आज कोल्हापूरला जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 1:20 AM

सामाजिक क्रांतीचे प्रणेते छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा शहरात पूर्णत्वास आला असून येत्या २५ ते २६ तारखेपर्यंत या पुतळ्याचे काम पूर्ण होणार आहे. दरम्यान, या पुतळ्याच्या उद्घाटनासाठी राजर्षी शाहू महाराजांचे वंशज कोल्हापूर संस्थानचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना आमंत्रित करण्यासाठी महापालिका पदाधिकाऱ्यांचे एक शिष्टमंडळ गुरुवारी कोल्हापूरकडे रवाना होत आहे.

ठळक मुद्देछत्रपती शाहू महाराज पुतळा : सुशोभिकरणाचे काम १५ दिवसांत पूर्ण होणार

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: सामाजिक क्रांतीचे प्रणेते छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा शहरात पूर्णत्वास आला असून येत्या २५ ते २६ तारखेपर्यंत या पुतळ्याचे काम पूर्ण होणार आहे. दरम्यान, या पुतळ्याच्या उद्घाटनासाठी राजर्षी शाहू महाराजांचे वंशज कोल्हापूर संस्थानचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना आमंत्रित करण्यासाठी महापालिका पदाधिकाऱ्यांचे एक शिष्टमंडळ गुरुवारी कोल्हापूरकडे रवाना होत आहे.समाजव्यवस्थेत मानवता रुजविण्यासाठी अस्पृश्यता नष्ट करुन बहुजनांना धार्मिक गुलामगिरीतून मुक्त करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून राजर्षी शाहू महाराजांचे इतिहासात स्थान आहे. बहुजनांची अस्मिता म्हणूनही शाहू महाराजांची ओळख आहे. शाहू महाराजांना आरक्षणाचे जनक म्हणूनही ओळखले जाते. अशा या महापुरुषाचा पुतळा नांदेडमध्ये उभारला जात आहे.शहरात छत्रपती शाहूंच्या पूर्णाकृती पुतळ्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. हे काम २५ आॅक्टोबरपर्यत पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. बुधवारी माजी राज्यमंत्री आ. डी. पी.सावंत, महापौर शीलाताई भवरे, उपमहापौर विनय गिरडे, सभागृहनेते विरेंद्रसिंघ गाडीवाले, आयुक्त लहुराज माळी, नगरसेवक उमेश चव्हाण, सुभाष रायबोले, विठ्ठल पाटील डक, किशोर भवरे, विरेंद्र कानोजी, संदीप सोनकांबळे, अनिकेत भवरे, कार्यकारी अभियंता गिरीष कदम आदींनी पाहणी केली. छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.या पुतळ्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रमही लवकरच घेतला जाणार असल्याचे महापालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. या उद्घाटन सोहळ्यास छत्रपती शाहू महाराज यांचे वंशज कोल्हापूर संस्थानचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना निमंत्रित केले जाणार आहे. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या भेटीची वेळही निश्चित झाली असून त्यांच्या वेळेप्रमाणे उद्घाटन सोहळा निश्चित केला जाणार असल्याचे सभागृह नेता विरेंद्रसिंघ गाडीवाले यांनी सांगितले. त्यामुळे आता छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन लवकरच होईल, हे निश्चित झाले आहे.छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळा उभारणीसाठी २०१३ पासून पाठपुरावा सुरु आहे. २०१३ मध्ये कृषी विद्यापीठाच्या जागेचे हस्तांतरण महापालिकेकडे आले. २०१४ मध्ये या पुतळ्याच्या कामाचे भूमिपूजन झाले होते. चार वर्षानंतर का होईना हा पुतळा आता पूर्णत्वास गेला आहे.महात्मा फुले दांपत्याच्या पुतळ्याचे कामही सुरुशहरात आयटीआय महात्मा फुले चौकात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे काम सुरु करण्यात आले आहे. हे कामही जवळपास दहा वर्र्षांपासून रखडले होते. महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे लहुराज माळी यांनी हाती घेतल्यानंतर या पुतळा कामाला गती मिळाली आहे. आवश्यक त्या सर्व परवानग्यांसह जागेचा वादही मिटविण्यात महापालिकेला यश आले आहे. या सर्व प्रक्रियेनंतर निविदा प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली असून प्रत्यक्षात पुतळा सुशोभिकरणाच्या कामासही प्रारंभ झाला आहे. हे कामही लवकरच होईल,अशी अपेक्षा आहे.

टॅग्स :NandedनांदेडNanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिका