शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

नांदेड महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 00:53 IST

उत्पन्नवाढीच्या चिंतेत असलेल्या महापालिकेने सोमवारी बैठक घेऊन कर वसुलीच्या मोहिमेला प्रारंभ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचवेळी शहरातील अवैध नळजोडणी शोधून दंडात्मक कारवाईनंतर ते नियमित करण्याबाबतही चर्चा करण्यात आली.

ठळक मुद्देकर वसुलीची मोहीम सुरु : खड्डे बुजविण्यासाठीही निधीची चणचण

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : उत्पन्नवाढीच्या चिंतेत असलेल्या महापालिकेने सोमवारी बैठक घेऊन कर वसुलीच्या मोहिमेला प्रारंभ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचवेळी शहरातील अवैध नळजोडणी शोधून दंडात्मक कारवाईनंतर ते नियमित करण्याबाबतही चर्चा करण्यात आली.महापालिकेचे स्थायी समिती सभापती शमीम अब्दुल्ला, आयुक्त लहुराज माळी, उपायुक्त संतोष कंदेवार, प्रकाश येवले, गिता ठाकरे आदींची प्रमुख उपस्थितीत महापालिकेच्या आर्थिक परिस्थितीवर चिंतन करण्यात आले. शहरात आज एखादा खड्डा पडला तर तो बुजविण्याची ताकद महापालिकेकडे उरली नाही. आयुक्तांनी आदेश दिल्यानंतर काम होणे अपेक्षित आहे. मात्र प्रलंबित देयकामुळे ठेकेदार कामासाठी धजावत नसल्याचे चित्र आहे. एकीकडे महापालिकेची आर्थिक परिस्थिती खालावली असताना उत्पन्नवाढीसाठी कोणताही अधिकारी पुढाकार घेऊन काम करण्यास तयार होत नाही. क्षेत्रीय अधिकारीही नेमके काम काय करतात? असा प्रश्न स्थायी समिती सभापती शमीम अब्दुल्ला यांनी उपस्थित केला. अधिकाऱ्यांनी आता कार्यालयात नव्हे, तर शहरात फिरुन काम करण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.महापालिकेचे मालमत्ताकराचे एकूण १७६ कोटी रुपयांचे वसुली उद्दिष्ट आहे. त्यातील अनधिकृत बांधकामावरील शास्ती वगळल्यास १०६ कोटी ८६ लाख रुपये मालमत्ता करापोटी महापालिकेला वसूल करावे लागणार आहेत.३१ आॅगस्टपर्यंत शास्ती रक्कम शंभर टक्के माफ होणार आहे. तर कर सवलतही देण्यात येणार आहे. कर वसुलीसाठी झोननिहाय दत्तक अधिकारी नेमण्यात आले आहेत. या कर वसुलीत ज्या मालमत्ताधारकाकडे एक लाखापेक्ष अधिक कर तीन वर्र्षांपासून थकला आहे, अशा मालमत्ताधारकाची करवसुली प्राधान्याने केली जाणार आहे. कर न भरल्यास कारवाईचा बडगाही उगारला जाणार आहे.शहरात एकूण मालमत्तांची संख्या आणि नळधारकांची संख्या यात मोठी तफावत आहे. शहरात असलेल्या अवैध नळधारकांना शोधून त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.शहरात २८, २९ आणि ३० आॅगस्ट रोजी अवैध नळजोडणी शोधण्यासाठी विशेष मोहीम राबविली जाणार आहे. गाळेधारकांकडील वसुलीही केली जाणार आहे. यासाठी दोन विशेष पथके स्थापन करण्यात आली आहेत.महापालिकेच्या आर्थिक परिस्थितीमुळे कोणतीही नवीन कामे शहरात केली जात नाहीत. केलेल्या कामाची डागडुजीही होत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.फेरमूल्यांकनापूर्वीच मागणीबिल वाटपशहरात महापालिकेकडून मालमत्ताचे फेरमूल्यांकन केले जात आहे. काम जवळपास ६० टक्के पूर्ण झाले आहे. काम पूर्ण होण्यापूर्वीच महापालिकेने मालमत्ताकराच्या नोटिसा वाटप केल्या आहेत. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत फेरमूल्यांकनापूर्वी नोटिसा देवू नये अशी मागणी करण्यात आली होती. मात्र महापालिकेने वाटप केलेली मागणीबिले ही जुन्या दराप्रमाणेच दिले असून फेरमूल्यांकनानंतर मालमत्ताधारकांना खास नोटीस दिल्या जाणार आहेत. त्यावर मालमत्ताधारकांना आक्षेपही घेता येणार आहे. फरकाची रक्कम पुढील मागणी बिलात समाविष्ट करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. वाढीव मालमत्ताकराच्या विषयावर नाशिक मनपाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्यावर अविश्वास ठराव आणला आहे. नांदेडमध्येही मालमत्ताकराच्या वाढीवरुन सदस्यांनीही न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.लवकरच संयुक्त बैठकमनपा उत्पन्न वाढविण्यासाठी सोमवारी स्थायी समिती सभापतींच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीस महापौर शीलाताई भवरे, उपमहापौर विनय गिरडे, सभागृह नेता विरेंद्रसिंघ गाडीवाले उपस्थित नव्हते. त्यांच्या उपस्थितीत लवकरच बैठक घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. एकूणच मनपाची आर्थिक परिस्थिती डबघाईस आल्याचे स्पष्ट होत आहे.

टॅग्स :NandedनांदेडNanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिकाTaxकर