शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
2
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
3
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
4
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
5
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
6
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
7
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
8
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
9
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
10
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
11
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
12
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
13
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
14
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
15
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
16
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
17
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
18
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
19
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
20
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस

'नांदेड-मुंबई-नांदेड' राज्यराणी एक्स्प्रेसला अखेर मुहुर्त मिळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2020 7:01 PM

१० जानेवारीपासून धावणार एक्स्प्रेस

ठळक मुद्दे मनमाडसाठी स्वतंत्र डब्बे 

नांदेड : नांदेड येथून मुंबईसाठी राज्यराणी एक्स्प्रेस सुरू होणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून होती़ परंतु, रेल्वे प्रशासनाकडून अधिकृत दुजोरा मिळत नव्हता़ अखेर रेल्वे प्रशासनाने राज्यराणी एक्स्प्रेसचे वेळापत्रक जाहीर केले असून सदर गाडी १० जानेवारीपासून धावणार आहे़ मुंबईसाठी नव्याने गाडी सुरू होत असल्याने नांदेडसह मराठवाड्यातील प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे़ 

मुंबई-मनमाडदरम्यान चालणाऱ्या राज्यराणी एक्स्प्रेसला नांदेडपर्यंत वाढविण्यास मनमाडकरांचा विरोध होता़ परंतु, सदर गाडी नांदेडपर्यंत वाढविण्याची मागणी गत अनेक वर्षांपासून स्थानिक लोकप्रतिनिधींसह रेल्वे संघटनांनी लावून धरली होती़ दरम्यान, दोन्ही ठिकाणच्या प्रवाशांचा विचार करून रेल्वे प्रशासनाने मनमाड येथील प्रवाशांना स्वतंत्र डब्बे दिले आहेत़ सदर गाडी नवीन गाडी संख्येने धावणार आहे़ यामध्ये नांदेड ते मनमाड प्रवाशांसाठी एक एसी आणि आठ जनरल, नांदेडसाठी दोन एसी आणि तीन जनरल डब्बे असणार आहेत़ त्याचबरोबर एक एसएलआर डब्बा असेल़ गाडी संख्या २२१०२ आणि २२१०१ मनमाड-मुंबई -मनमाड गाडी आता नांदेडपर्यंत धावणार असून सदर गाडीचा नवीन नंबर १७६११ आणि नांदेड-मनमाड-मुंबई गाडीचा नंबर १७६१२ असा राहील़ नव्याने सुरू होत असलेली गाडी संख्या १७६११ नांदेड मुंबई राज्यराणी एक्स्प्रेस नांदेड येथून रात्री १० वाजता सुटेल़

पुढे सदर गाडी पूर्णा स्थानकावर ११़३५ वाजता, परभणी - ११़१८ वाजता, मानवत रोड - रात्री ११़३९ वाजता, सेलू-११़५५ वाजजा, परतूर - मध्यरात्री १२़३५ वाजता, जालना- १़२३ वाजता, औरंगाबाद - २़३५ वाजता, लासूर - ३़१४ वाजता, रोटेगाव - ४़०१ वाजता, मनमाड येथे पहाटे ५़२० वाजता पोहचेल़ पुढे नाशिक रोड येथे ६़ १२ वाजता, देवळाई - ६़२३ वाजता, इगतपूरी- ७़१५ वाजता, कसारा - ७़४८ वाजता, कल्याण जं़ - ८़४८ वाजता, ठाणे - ९़१३ वाजता तर मुंबई येथे सकाळी १० वाजून ७ मिनिटाला पोहचेल़ सदर गाडी जवळपास ६०७ किलोमिटरचे अंतर १२ तासांमध्ये पूर्ण करणार आहे़ परतीच्या प्रवासासाठी सदर गाडी संख्या १७६१२ मुंबई येथून सायंकाळी ६़ ५० वाजता सुटेल़ कल्याण, मनमाड, नाशिक, औरंगाबाद मार्गे नांदेड येथे सकाळी ७़२० वाजता पोहचेल़ 

टॅग्स :NandedनांदेडRailway Passengerरेल्वे प्रवासीrailwayरेल्वे