शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
5
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
7
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
8
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
9
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
10
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
11
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
12
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
13
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
14
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
15
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
16
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
17
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
18
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
19
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
20
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

नांदेड मनपात सत्ताधारीच आमने-सामने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 00:44 IST

महापालिकेने प्रस्तावित केलेल्या प्रमुख रस्त्यांच्या मजबुतीकरण कामाच्या यादीवरुन सत्ताधारीच आमने-सामने आले. इतकेच नव्हे, तर आयुक्तांनाही धारेवर धरत सत्ताधाऱ्यांनी सभागृहात गोंधळ घातला. याच विषयावर सभागृहातच माजी महापौर अब्दुल सत्तार यांनी विद्यमान महापौरांचा निषेधही नोंदवला.

ठळक मुद्देमहापालिकेची सर्वसाधारण सभा : माजी महापौरांनी केला विद्यमान महापौरांचा निषेध

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : महापालिकेने प्रस्तावित केलेल्या प्रमुख रस्त्यांच्या मजबुतीकरण कामाच्या यादीवरुन सत्ताधारीच आमने-सामने आले. इतकेच नव्हे, तर आयुक्तांनाही धारेवर धरत सत्ताधाऱ्यांनी सभागृहात गोंधळ घातला. याच विषयावर सभागृहातच माजी महापौर अब्दुल सत्तार यांनी विद्यमान महापौरांचा निषेधही नोंदवला.शहरातील प्रभाग क्र. १७ मधील रेल्वेस्टेशन ते महावीर चौक, हुतात्मा स्मारक ते वजिराबाद, शिवाजी पुतळा ते हिंगोलीगेट भुयारी मार्ग आणि स्टेशनरोड या रस्त्यांचे डांबरीकरण, मजबुतीकरण करण्यासाठी लागणाºया रकमेस प्रशासकीय आणि आर्थिक मान्यता देण्याचा विषय सभागृहापुढे ठेवण्यात आला होता. या विषयावर प्रारंभी अब्दुल सत्तार यांनी आक्रमक भूमिका घेत केवळ प्रभाग क्र. १७ मधील रस्तेच संपूर्ण शहरात महत्त्वाचे आहेत का? असा प्रश्न करीत इतर रस्त्यांचा या कामात समावेश का केला नाही? अशी विचारणा केली. याच विषयावर भानुसिंह रावत यांच्यासह स्थायी समिती सभापती अब्दुल शमीम, शेर अली आदी सदस्य आक्रमक झाले. जुन्या नांदेडचा विकास जाणीवपूर्वक केला जात नसल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. इतर भागातील रस्त्यांचा समावेश करुनच या प्रस्तावाला मंजुरी द्यावी, अशी मागणीही सदस्यांनी केली. त्यावेळी आयुक्तांनीही खंबीर भूमिका घेत प्रशासनाने सुचवलेली रस्त्यांची कामे ही शहरातील प्रमुख रस्त्यांची आहेत. त्यामुळे हीच कामे का सुचवली? हा प्रश्न विचारु शकत नाहीत, असे त्यांनी उत्तर दिले. आपलेही प्रस्ताव द्या, त्याचा दुसºया टप्प्यात समावेश करु, असे उत्तर त्यांनी सभागृहात दिले. या उत्तरानंतर सदस्य आणखीच आक्रमक झाले. आमचेही प्रस्ताव घेतल्याशिवाय हा ठराव मंजूर केला जाणार नसल्याचे सांगत त्यांनी ठिय्या मांडला. यावेळी अब्दुल सत्तार यांनी तर महापौरांनी विकासकामात भेदभाव करत असल्याचा आरोप करत त्यांचा निषेध केला. रस्त्याची कामे घेण्याच्या कारणावरुन महापालिकेत सत्ताधाºयांचे दोन गट आमने-सामने आले होते. काही वेळानंतर काही सदस्यांच्या मध्यस्थीनंतर हा विषय पास करण्यात आला.याच सभेत काँग्रेसच्या नगरसेवकांनी आपल्या प्रभागात मूलभूत सुविधाही नसल्याचा मुद्दा ऐरणीवर आणला होता. त्यात शिवाजीनगर प्रभागाच्या मोहिनी येवनकर, दुष्यंत सोनाळे यांचा समावेश होता. शिवाजीनगरातील ड्रेनेज व्यवस्था कोलमडल्याचे त्यांनी सांगितले तर देगावचाळ प्रभागाच्या नगरसेविका ज्योत्स्ना गोडबोले यांनी तर आपल्याच घरी पाणी येत नसल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे एकूणच सत्ताधाºयांनी प्रशासनाला धारेवर धरले.महापालिकेच्या प्रभारी वसुलीकार म. अख्तर शेख महेबूब यांना कामावर घेण्याचा निर्णयही सभागृहाने सोमवारी झालेल्या सभेत घेतला. म. अख्तर यांना वसुलीतील रक्कमेच्या अपहारप्रकरणी आयुक्तांनी बडतर्फ केले होते. या बडतर्फी आदेशाविरुद्ध अख्तर यांनी स्थायी समितीकडे अपिल केले होते. स्थायी समितीने हे अपिल मंजूर केले. स्थायी समितीच्या निर्णयाविरुद्ध प्रशासनाने सर्वसाधारण सभेपुढे दाद मागितली होती. अखेर सर्वसाधारण सभेनेही अख्तर यांना कामावर घेण्याचा निर्णय घेतला. या विषयावर आयुक्तांनी हा निर्णय म्हणजे कर्मचाºयांना खुली सूट देणारा ठरेल, असेही नमूद केले. पत्रकारांसाठी निधीची तरतूद करण्याची मागणी बापूराव गजभारे यांनी केली. सतिश देशमुख यांनी सांगवी रस्त्यावरील वॉकिंग ट्रॅकची सुधारणा करणे गरजेचे असल्याचे सांगितले़शहरातील वजिराबाद येथील सन्मान कन्स्ट्रक्शनच्या स्वीमिंग पूलचाही विषय चांगलाच चर्चिला गेला. या स्वीमिंग पूलला परवानगी आहे काय? पाणीपुरवठा कोठून होतो? याबाबतचा खुलासा करण्याची मागणी नगरसेवकांनी केली. यावर माहिती घेवून उत्तर देण्यात येईल, असे प्रशासनाने सांगितले. शहरातील अमृत योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात अ‍ॅड. महेश कनकदंडे यांनी विषय उपस्थित केला. अमृत योजनेअंतर्गत कामादरम्यान पाईपलाईन टाकल्यानंतर खोदलेले रस्ते बुजवले जात नसल्याचा आरोप त्यांनी केला. हे रस्ते पावसाळ्यापूर्वी बुजवावेत, अशी मागणीही त्यांनी केली.सोमवारी झालेल्या सभेत जुन्या नांदेडातील पाईप चोरी प्रकरणी स्थानिक नगरसेवकाविरुद्धही कारवाईची मागणी नगरसेविका गुरप्रितकौर सोडी यांनी केली. या कामाचे उद्घाटन स्थायी समिती सभापतींच्या हस्ते झाले. यावेळी स्थानिक नगरसेवकही उपस्थित होते. एवढे मोठे प्रकरण घडले असतानाही कारवाई मात्र झाले नसल्याचे त्या म्हणाल्या. या विषयावर काँग्रेसच्या सदस्यांनी विरोध करत पुरावे देण्याची मागणी केली. पुरावे दिले तर कारवाई नक्की केली जाईल, अशी भूमिका गाडीवाले यांनी मांडली.नांदेड स्टेडियमअंतर्गत असलेल्या जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाला दिलेल्या विविध जागा महापालिकेने आपल्याकडे घ्याव्यात, अशी मागणी या सभेत गाडीवाले यांनी केली.परळीस सांडपाणी देण्याचा प्रस्ताव फेटाळलाशहरातील सांडपाणी परळी येथील औष्णिी विद्युत केंद्रास देण्याचा प्रस्ताव सभागृहाने मंगळवारी फेटाळला. शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करुन हे पाणी नांदेडमधील शेतीलाच द्यावे, अशी भूमिका सभागृह नेते विरेंद्रसिंघ गाडीवाले यांनी मांडली.अब्दुल सत्तार,किशोर स्वामी यांनीही त्यांचे समर्थक करीत हा विषय फेटाळत असल्याचे सांगितले.तीन दिवस पाणीपुरवठा कराभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शहरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. त्यानिमित्त शहराला १३, १४ आणि १५ एप्रिल असे तीन दिवस सलग पाणीपुरवठा करावा, अशी मागणी महेंद्र पिंपळे यांनी केली.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाcommissionerआयुक्त