शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

‘नीट’मध्ये नांदेडचा कृष्णा अग्रवाल देशात सातवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 00:41 IST

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे वैद्यकीय शिक्षणासाठी घेतल्या जाणाऱ्या पात्रता प्रमाणपत्र परीक्षेत (नीट) नांदेडचा कृष्णा अग्रवाल देशात सातवा आला असून राज्यात अव्वल ठरला आहे़

नांदेड : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे वैद्यकीय शिक्षणासाठी घेतल्या जाणाऱ्या पात्रता प्रमाणपत्र परीक्षेत (नीट) नांदेडचा कृष्णा अग्रवाल देशात सातवा आला असून राज्यात अव्वल ठरला आहे़नीटसाठी देशभरातून १३ लाख २६ हजार ७२५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती़ यात ७२० पैकी ६८५ गुण मिळवित नांदेडच्या कृष्णाने घवघवीत यश मिळविले़ कृष्णाचे आईवडील दोघेही डॉक्टर आहेत़ वडील बालरोगतज्ज्ञ तर आई दंतरोगतज्ज्ञ आहे. कृष्णाचे इयत्ता १० वी पर्यंतचे शिक्षण नांदेड येथीलच ज्ञानमाता विद्यालयात तर ११, १२ वी चे वेदांत महाविद्यालयात झाले़ पाचवीपासूनच त्याचा नियोजनबद्ध अभ्यास घेतला़ त्यामुळे हे यश अपेक्षितच होते़ महाराष्ट्रात अव्वल तर देशात पहिल्या १० विद्यार्थ्यांमध्ये तो असेल असा विश्वास होता़ आज जाहीर झालेल्या निकालाने हा विश्वास सार्थकी लागल्याचे सांगत या यशाचे श्रेय वडिलांनी नांदेड येथील त्याच्या शिक्षकांना दिले़ नांदेडची टीम चांगली आहे़ त्यामुळे कृष्णाचे बेसिक फाऊंडेशन मजबूत झाले़ गणेश चौगुले, भार्गव राजे, रमाकांत जोशी, व्ही़डीक़ोनाळे, एक़े़सिंग आदी शिक्षकांकडे आम्ही कृष्णाला सोपविले होते़ निकालात या शिक्षकांचा सिंहाचा वाटा असल्याचे सांगत नीटसाठीचा अभ्यास करताना आम्ही आमचे डोके लावले नाही़ त्याचे शिक्षक सांगतील तेवढा आणि तसाच अभ्यास कृष्णाकडून करुन घेतल्याचेही डॉ़ आशिष अग्रवाल यांनी नमूद केले़ वैद्यकीय अभ्यासक्रमाची ४ वर्षे आहेत़ या कालावधीत पुढे काय करायचे याचा निर्णय कृष्णाच त्याच्या आवडीनुसार घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले़

---एम्समध्ये प्रवेशासाठी उत्सुककृष्णा अग्रवाल एम्स वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश घेण्यासाठी उत्सुक आहे़ एम्सचा निकाल १८ तारखेला लागणार आहे़ एम्समध्ये प्रवेश मिळेलच अन्यथा ‘मौलाना आझाद’चा पर्याय असल्याचे कृष्णा याने सांगितले़

टॅग्स :NandedनांदेडNEET Result 2018नीट परीक्षा निकाल २०१८