शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड धान्य घोटाळा: आरोपीचा जामीन फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 00:40 IST

शासकीय अन्न-धान्य गोदामात न पाठवता परस्पर अ‍ॅग्रो कंपनीत पाठवणाऱ्या प्रकरणातील मॅनेजरचा अटकपूर्व जामीन बिलोलीच्या जिल्हा सत्र न्यायालयाने गुरुवारी फेटाळला़ सदरील प्रकरणात अजून दहापेक्षा जास्त आरोपी फरार आहेत़

ठळक मुद्देबिलोली न्यायालयात सुनावणी: बुधवारी झाला होता सरकार व बचाव पक्षाचे जोरदार युक्तिवाद

लोकमत न्यूज नेटवर्कबिलोली : शासकीय अन्न-धान्य गोदामात न पाठवता परस्पर अ‍ॅग्रो कंपनीत पाठवणाऱ्या प्रकरणातील मॅनेजरचा अटकपूर्व जामीन बिलोलीच्या जिल्हा सत्र न्यायालयाने गुरुवारी फेटाळला़ सदरील प्रकरणात अजून दहापेक्षा जास्त आरोपी फरार आहेत़गेल्या जुलै महिन्यात नांदेडच्या एफसीआय गोदामातून निघालेले गहू व तांदळाचे ट्रक तालुका पातळीवरील न जाता कृष्णूर येथील औद्योगिक वसाहतमध्ये एका अ‍ॅग्रो कंपनीत शिरले़ बºयाच दिवसापासून धान्याचा काळाबाजार होत असल्याची कुणकुण पोलिसांना होती़ १८ जुलैच्या रात्री पोलिस नांदेड-कृष्णूर मार्गावर पाळत ठेवून होते़ सदरील घोटाळा प्रकरणात दहा ट्रक पकडण्यात आले़ अ‍ॅग्रो कंपनीसह शासकीय वाहतूक ठेकेदार व अन्य दहा जणांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल झाला़ अन्नधान्य काळा बाजाराचा व घटनेचा तपास धर्माबादचे सहाय्यक पोलिस अधीक्षक नुरुल हसन करीत आहेत़ अद्यापही सर्व आरोपी फरार आहेत़ कंपनीला सील ठोकून सर्व महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत़घटनेतील आरोपी व धान्य कंपनीत रिकामे करून घेण्याची जबाबदारी असलेले मॅनेजर जयप्रकाश तापडिया याने बिलोली जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता़ बुधवारी सरकार व बचाव पक्षात जोरदार युक्तीवाद झाला़ पोलिसांच्या दहा पानी से रिपोर्टमध्ये सविस्तर चौकशी अहवाल न्या़ एस़बी़ कचरे यांच्या न्यायालयात सादर झाला़ सरकार पक्षाकडून धान्य घोटाळ्यातील संपूर्ण कार्यवाही, अ‍ॅग्रो कंपनीतील जप्त केलेली कागदपत्रे, पोलिसांनी एफसीआय गोदाम ते पुरवठा विभागाची जीपीएस पद्धती, गहू-तांदळाच्या पेन्सीलने लिखित बनावट नोंदी असे पुरावे दाखल करून जामिनाला कडाडून विरोध केला़ शासकीय अन्नधान्याची सीमावर्ती भागातून होणारी विल्हेवाट मोठी व्याप्ती असून मॅनेजरला जामीन दिल्यास पुढील तपासात अडचणी ठरतील़ अजून पुरवठा विभागाचीही चौकशी शिल्लक असल्याचा युक्तीवाद मांडला़ गुरुवारी न्या़एस़बी़ कचरे यांनी प्रकरणातील पहिला जामीन अर्ज फेटाळला़ सरकार पक्षाची बाजू अ‍ॅड़ दिलीप कुलकर्णी यांनी मांडली़ निकालाकडे सर्वांचे लक्ष होते.---दहापेक्षा जास्त आरोपी फरारधान्य घोटाळ्यात दहापेक्षा जास्त आरोपी अद्यापही फरार आहेत.पोलिसांचा दहा पानांचा चौकशी अहवालघोटाळ्याचे पुरावे दाखल करुन सरकारी वकिलांनी जामीनाला केला कडाडून विरोधपुरवठा विभागाची होणार चौकशी

टॅग्स :NandedनांदेडfraudधोकेबाजीCourtन्यायालय