शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडच्या शेतकऱ्याने दुष्काळातही रेशीम उद्योगामुळे साधली प्रगती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 12:05 IST

यशकथा :  दुष्काळी परिस्थितीमधूनही अल्पभूधारक शेतकऱ्याने वर्षाला पाच लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळवले.

- प्रा. शरद वाघमारे (मालेगाव, जि.नांदेड)

शेतकरी शेतात विविध पिकांची लागवड करताना पारंपरिक पद्धतीच्या पिकांचे उत्पादन घेत असतात. यामुळे एकतर खर्च जास्त होतो अन् त्या प्रमाणात उत्पन्न मिळत नाही. दुष्काळी परिस्थिती, पिकांना योग्य भाव मिळत नाही, अशा स्थितीत अर्धापूर तालुक्यातील कोंढा येथील शेतकरी अ‍ॅड. बालाजी माधवराव कदम या अल्पभूधारक शेतकऱ्याने आपल्या दोन एकर शेतात गेल्या चार वर्षांपासून रेशीम उद्योग सुरू केला आहे. दुष्काळी परिस्थितीमधूनही ते वर्षाला पाच लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळवीत आहेत. उत्पादित रेशमाला परराज्यात मोठी मागणी आहे.

व्यवसायाने वकील असलेल्या बालाजी माधवराव कदम यांनी २०१४ साली दोन एकर शेतीमध्ये रेशीम उद्योग सुरू केला. यासाठी त्यांना रेशीम विकास विभागाकडून अनुदान मिळाले आहे. यात त्यांनी शेड व लोखंडी रॅक उभारले आहे. रेशीम उद्योगाची प्रक्रिया वीस दिवसांची आहे. ही प्रक्रिया चार अवस्थांमध्ये असते. एका दिवसात २५० अंडपुंजातून साठ ते सत्तर किलो कोष मिळतो. सद्य:स्थितीत बाजारात ४५० रुपये भाव मिळत आहे. म्हणजेच दिवसाला तीन हजार रुपये मिळतात. यासाठी मजूरही खूप कमी लागतात. पहिल्या आठवड्यात दोन मजूरांवर काम भागते. रेशीम अळ्यांना दररोज सकाळी व संध्याकाळी खाद्य द्यावे लागते.

सुरुवातीला रेशीम उद्योग सुरू करताना केवळ दहा हजार इतक्या कमी प्रमाणात खर्च येतो. खत फवारणीला जास्त खर्च येत नाही. एप्रिल व मे महिन्यात पाण्याची कमतरता पडते. मात्र, या काळात पाणी मिळाले नाहीतर, तुतीच्या झाडावर परिणाम होतो. मात्र, ती झाडे मरत नाहीत. त्यामुळे पाण्याची कमतरता असलेल्या ठिकाणच्या शेतकऱ्यांनाही हा व्यवसाय करता येतो. रेशीम व्यवसायात तुती लागवड, कीटक संगोपन, धागानिर्मिती आणि कापडनिर्मिती असे प्रामुख्याने चार प्रकारचे व्यवसाय करता येतात.

अल्पभूधारक शेतकरी कदम यांनी दोन एकर शेतात हा तुतीचा रेशीम उद्योग सुरू केला आहे. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील हा पहिला रेशीम उद्योग आहे.  तयार झालेले रेशीम कोष  बंगळुरू, हैदराबाद याठिकाणी विकल्या जातात. स्वत: शेतकरी बालाजी कदम रेशमाची विक्री करून रोख पैसे मिळवितात. गेल्या चार वर्षांपासून त्यांच्या शेतात रेशीम उद्योग सुरू असून, वर्षाकाठी ते जवळजवळ पाच लाख रुपयांचे उत्पन्न मिळवितात.

शेतकऱ्यांनी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून बघावे. पारंपरिक पद्धतीने शेती केल्यामुळेच शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. कमी खर्चात जास्त उत्पन्न देणाऱ्या रेशीम उद्योग क्षेत्रात शेतकऱ्यांनी पुढे आले पाहिजे, असा सल्ला कदम यांनी दिला. सद्य:स्थितीत पर्जन्यमान कमी झाल्याने पाण्याचे स्रोत कोरडे पडले आहेत. त्यामुळे पिके हातचे जाण्याची वेळ आली आहे. उत्पादित पिकांना योग्य भाव मिळत नाही; परंतु रेशीम उद्योगात अतिशय कमी खर्चात शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी