शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडात विमानतळ सुरक्षेला धोका असणारे अतिक्रमण हटवले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 15:44 IST

विमानतळाच्या बफर झोन अर्थात सुरक्षा परिसरातच उभारण्यात आलेल्या फळे आणि भाजीपाला मार्केटचे अतिक्रमण मनपाने आजपासून हटवण्यास प्रारंभ केला आहे.

ठळक मुद्दे या अतिक्रमणामुळे विमानतळाच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला होता.. दुपारपर्यंत जवळपास २०० शेड पाडण्यात आली

नांदेड : विमानतळाच्या बफर झोन अर्थात सुरक्षा परिसरातच उभारण्यात आलेल्या फळे आणि भाजीपाला मार्केटचे अतिक्रमण मनपाने आजपासून हटवण्यास प्रारंभ केला आहे. या अतिक्रमणामुळे विमानतळाच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला होता. 

नांदेड विमानतळाच्या बफर झोन अर्थात सुरक्षा परिसरातच म्हाळजा परिसरात भाजीपाला मार्केट आणि फळ मार्केटची उभारणी केली होती. महापालिकेने प्रारंभी फळ मार्केटला तात्पुरत्या स्वरूपात परवाना दिला होता. प्रारंभी ४३ दुकानांना परवाना असताना या दुकानाची संख्या दोनशेहून अधिक झाली होती. फळ आणि भाजीपाला मार्केटमुळे येणारे पक्षी पाहता विमानांनाही धोका निर्माण झाला होता. याबाबत विमानतळ प्राधिकरणाने महापालिकेला सुचित केले होते. त्यानंतर महापालिकेने एक समिती स्थापन करुन विमानतळाचे सर्व बाजूंनी निरीक्षण केले. तसेच अनधिकृत बांधकाम केलेल्या मालमत्ता धारकांना नोटीसा बजावल्या. 

९ एप्रिल रोजी पाहणी केली होती. त्यानंतर महिनाभरापासून हे अतिक्रमण हटवण्याबाबत हालचाली सुरू होत्या. अखेर ९ मे रोजी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त मिळताच हे अतिक्रमण काढण्यास प्रारंभ करण्यात आला. दुपारपर्यंत जवळपास २०० शेड पाडण्यात आली होती. त्याचवेळी मनपाने प्रारंभी परवानगी दिलेल्या ४३ दुकाने हलवण्यासाठी तीन महिन्याची परवानगी दिली आहे. या मोहिमेत उपायुक्त रत्नाकर वाघमारे यांच्यासह संतोष कंदेवार, क्षत्रिय अधिकारी संजय जाधव, अविनाश अटकोरे, सुधीर इंगोले, मनपा पोलिस पथक, स्वच्छता निरीक्षक, बांधकाम निरीक्षक, विद्युत पथक उपस्थित होते. 

यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी अभिजीत फस्के यांच्यासह दोन पोलिस निरीक्षक, दोन सहा. पोलिस निरीक्षक, ५० पोलिस कर्मचारी, मनपा पोलिस पथक बंदोबस्तासाठी नियुक्त करण्यात आले होते. मोहिमेच्या प्रारंभी व्यापाऱ्यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो विरोध हाणून पाडण्यात आला.

आयुक्तांची दुसऱ्याच दिवशी  कारवाईमहापालिकेच्या आयुक्तपदी एल.एस. माळी हे मंगळवारी सायंकाळी रुजू झाले. रुजू झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी नांदेड विमानतळ सुरक्षेला धोका निर्माण करणारे अतिक्रमण हटवून आपल्या नांदेड येथील कामाचा प्रारंभ केला आहे.   या परिसरातील दोनशे दुकाने हटवण्यात आली आहे तर ४३ दुकांनाना तीन महिन्याची मुदत देण्यात आली आहे.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणNanded policeनांदेड पोलीसMuncipal Corporationनगर पालिकाAirportविमानतळ