शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांसाठी येणार ६०० मे. टन तूरडाळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2017 12:31 IST

राज्यात गतवर्षी तुरीचे विक्रमी उत्पादन झाल्याने बाजारात तुरीची आवक वाढली असून केंद्र व राज्य शासनामार्फत वेगवेगळ्या योजनेअंतर्गत तुरीची हमीभावाने खरेदी केली आहे. ही तूरडाळ आता स्वस्तधान्य दुकानावर उपलब्ध होणार असून जिल्ह्यात ६०० मे. टन तुरीची मागणी करण्यात आली आहे. 

ठळक मुद्दे राज्यात स्वत:च्या निधीतून राज्य शासनाने बाजार हस्तक्षेप योजनेअंतर्गत २५.२५ लाख क्विंटल तूर खरेदी केली आहे. जिल्ह्यात असलेल्या शिधापत्रिकाधारकांना प्रतिकार्ड १ किलो तूरडाळ दिली जाणार आहे. जिल्ह्यात जवळपास ६ लाख शिधापत्रिकाधारक आहेत.

नांदेड : राज्यात गतवर्षी तुरीचे विक्रमी उत्पादन झाल्याने बाजारात तुरीची आवक वाढली असून केंद्र व राज्य शासनामार्फत वेगवेगळ्या योजनेअंतर्गत तुरीची हमीभावाने खरेदी केली आहे. ही तूरडाळ आता स्वस्तधान्य दुकानावर उपलब्ध होणार असून जिल्ह्यात ६०० मे. टन तुरीची मागणी करण्यात आली आहे. 

तुरीची बाजारातील आवक मोठ्या प्रमाणात होत असल्याने तुरीसाठी निश्चित केलेल्या किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी बाजारभाव शेतक-यांना मिळत होता. ही बाब लक्षात घेऊन शासनाने तुरीची खरेदी केली. राज्यात स्वत:च्या निधीतून राज्य शासनाने बाजार हस्तक्षेप योजनेअंतर्गत २५.२५ लाख क्विंटल तूर खरेदी केली आहे. या तुरीची भरडाई करण्यासही परवानगी दिली आहे. भरडाई केलेली ही तूरडाळ विक्री करण्यास परवानगी दिली आहे. त्याचप्रमाणे ही तूरडाळ आता राज्यातील स्वस्तधान्य दुकानातही उपलब्ध होणार आहे. 

जिल्ह्यात असलेल्या शिधापत्रिकाधारकांना प्रतिकार्ड १ किलो तूरडाळ दिली जाणार आहे. जिल्ह्यात जवळपास ६ लाख शिधापत्रिकाधारक आहेत. त्यामध्ये अंत्योदय अन्न योजनेच्या शिधापत्रिकांची संख्या ८० हजार ४७५, प्राधान्य कुटुंब योजनेच्या शिधापत्रिकांची संख्या ४ लाख २ हजार ७०९ इतकी आहे. या शिधापत्रिकाधारकांसाठी नांदेड जिल्हा पुरवठा विभागाने ४ हजार ८३२ क्विंटल तूरडाळीची मागणी केली आहे. ही तूरडाळ लवकरच स्वस्तधान्य दुकानात उपलब्ध होईल, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर यांनी दिली.

स्वस्तधान्य दुकानात ही तूरदाळ ५० रुपये किलो याप्रमाणे उपलब्ध करुन दिली जाणार आहे. दरम्यान, स्वस्तधान्य दुकानात मिळणारी तूरदाळ ५० रुपये किलो या दराने मिळणार असली तरी बाजारात ५१ रुपये ते ६१ रुपये किलो या प्रमाणे डाळ मिळत आहे. त्यातही आजघडीला फटका प्रकारातील तूरडाळ ही ५८ रुपय किलो तर सव्वानंबर प्रकारातील तूरडाळ ५३ रुपये किलो प्रमाणे मिळत आहे.  त्याचवेळी स्वस्तधान्य दुकानात तूरडाळ उपलब्ध झाल्याने तुरडाळीचे बाजारभाव काही प्रमाणात उतरतील, अशी अपेक्षा आहे. पण त्याचवेळी स्वस्तधान्य दुकानातील तूरडाळ ही कशी राहील, यावरही बरेच काही अवलंबून राहणार आहे. स्वस्तधान्य दुकान आणि बाजारात मिळणाºया तूरडाळीच्या भावामध्ये थोडाच फरक आहे. स्वस्तधान्य दुकानात मिळणाºया तूरडाळीच्या किमतीवर मात्र निश्चितच नियंत्रण राहणार आहे.

विक्रमी उत्पन्नाने येणार वरणाला येणार चवसर्वसामान्यांसह प्रत्येक घरांतील जेवणात वरणाला महत्व आहे. ते आवश्यकही आहे. वर्ष-दीड वर्षांपूर्वी तूरडाळीचे भाव गगनाला भिडले होते. तब्बल २०० रुपये किलोदराने तूरडाळ मिळत होती. त्यामुळे सामान्यांच्या ताटातून वरण बाजूला झाले होते. आतामात्र प्रत्येकाच्या जेवणामधील वरणाला चव येणार आहे. तुरीच्या विक्रमी उत्पादनाने ही परिस्थिती बदलली आहे.  

टॅग्स :Nandedनांदेडfoodअन्न