शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड जिल्ह्यात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून वाळू उपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 19:06 IST

वाळूमाफियांनी मात्र महसूल प्रशासनाच्या नाकावर टिच्चून चोरी-छुप्या मार्गाने अवैध वाळूउपसा सुरुच ठेवला आहे.

- अनुराग पोवळे

नांदेड : जिल्ह्यात आगामी वर्षासाठी वाळूघाटांचे सर्वेक्षण सुरु आहे. कुठेही वाळूउपसा सुरु नसल्याचे खुद्द जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी स्पष्ट केल्यानंतर  तसेच नायगाव तालुक्यात जूनपासून एकाही घाटावर वाळूउपसा सुरु नसल्याचे  तहसीलदार सुरेखा नांदे यांनी सांगितले असताना वाळूमाफियांनी मात्र महसूल प्रशासनाच्या नाकावर टिच्चून चोरी-छुप्या मार्गाने अवैध वाळूउपसा सुरुच ठेवला आहे. नायगाव तालुक्यातील बळेगाव, हुस्सा, राहेर आदी भागांत आजघडीला रात्री गोदावरी पात्रातून मशीनने उपसा करून साठा केलेल्या वाळूची दिवसा विल्हेवाट लावली जात आहे़

जिल्हा प्रशासनाने २०१८-१९ साठी वाळूघाटांचे सर्वेक्षण सुरु केले आहे. महसूलसह भूजल सर्वेक्षण, उपविभागीय अधिकारी, संबंधित तालुक्यांचे अधिकारी, भूमीअभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या पथकाकडून नदीघाटांचे सर्वेक्षण सुरु आहे. या सर्वेक्षणाला आणखी महिनाभर लागणार आहे. काही ठिकाणचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.  तर काही ठिकाणचे सुरु आहे. या सर्वेक्षण अहवालानंतर सदर पात्र घाटांच्या मान्यतेसाठी विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव पाठविला जातो.  विभागीय आयुक्तांच्या मान्यतेनंतर घाटांची लिलाव प्रक्रिया सुरु केली जाते. मात्र जिल्ह्यात काही तालुक्यांत या सर्व प्रक्रियेची वाट न पाहता वाळूमाफियांनी आपल्या कार्याला प्रारंभ केला आहे. 

जिल्ह्यात मुदखेड, नायगाव, उमरी, लोहा आदी तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाळूसाठे आहेत. या वाळूसाठ्यांची वाहतूकही मोठ्या प्रमाणात सुरु आहे. वाळू उपलब्धतेची जिल्ह्यातील परिस्थिती पाहता वाळूचे भाव ‘सोन्याच्या’ही पलीकडे गेले आहेत. सामान्यांच्या आवाक्याबाहेर  वाळू पोहोचली असून जिल्ह्याबाहेर अगदी पुण्यापर्यंत नांदेडची वाळू विक्रीसाठी जात आहे. बाहेर जिल्ह्यात जादा भाव आणि मागणी वाढली असल्याने अवैध वाळूउपशामध्ये बेमालूम वाढ झाली आहे.  

दुसरीकडे, या वाळूटंचाईचा फटका अनेक शासकीय कामांना बसला आहे. वाळूअभावी दलित वस्तीसह अन्य निधीतील कामे ठप्प झाली आहेत. जिल्हा परिषदेची अनेक कामे वाळूअभावी रखडली आहेत. याबाबत महापालिकेच्या ठेकेदाराने आयुक्तांना वाळूबाबतची परिस्थिती सांगत कामांना मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. मात्र ही मुदतवाढ देण्यास आयुक्तांनी नकार दिला. त्यामुळे ठेकेदारही आता वाळूसाठी त्रस्त झाले आहेत. शहरात छुप्या मार्गाने वाळू विक्री केली जात आहे.  वाळू आणण्यासाठी  नवी पद्धत अवलंबिली जात आहे.  ट्रकमध्ये वरच्या  भागात गिट्टीची चुरी अंथरलेली जात आहे. त्यात खाली वाळू आणि वर चुरी असा प्रकार सुरु आहे. 

जिल्हा प्रशासनाचे केवळ इशाऱ्यावर इशारेएकीकडे पावसाअभावी जिल्ह्यात पिकांची परिस्थिती चिंताजनक आहे. शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत. जलसाठ्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे. मात्र त्याचवेळी नद्या कोरड्या झाल्याचा लाभ वाळूमाफियांकडून घेतला जात आहे. महिनाभरापासून पावसाने उघडीप दिली आहे. त्याचाच लाभ घेत वाळूमाफिया खुलेआम नियमांचे उल्लंघन करत वाळूउपसा कालावधी संपला असतानाही मशीनद्वारे नदीपात्रातून वाळू उपसत आहेत. वरिष्ठ अधिकारी कारवाईचे आदेश देत असले तरी स्थानिक अधिकाऱ्यांना हाताशी धरत वाळूमाफिया स्वत:चे चांगभले करुन घेत आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्रीपद हे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्याकडे आहे. त्यांच्याच जिल्ह्यात पर्यावरणाचा रात्रंदिवस ºहास सुरु आहे. या बाबीकडे प्रशासन गांभीर्याने कधी बघणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :sandवाळूNandedनांदेडNanded collector officeजिल्हाधिकारी कार्यालय नांदेड