शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
2
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
3
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
4
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
6
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
7
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
8
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
9
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
10
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
11
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
12
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
13
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
14
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
15
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
16
उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे भरण्यास सर्वोच्च न्यायालय प्रयत्नशील : सरन्यायाधीश गवई
17
कांदळवनांचा अडथळा; पुनर्विचार याचिका करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती; सर्वेक्षणातून समजणार अचूक क्षेत्रफळ
18
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
19
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...

नांदेड जिल्ह्यात दोन लाचखोर जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 01:22 IST

जिल्ह्यातील तामसा येथे वनरक्षकाला अडीच हजार रुपये तर बिलोली तालुक्यातील केसराळी येथे ग्रामसेवकाला दोनशे रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले़ या प्रकरणात दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे़

ठळक मुद्देवनरक्षक अडीच हजार, तर ग्रामसेवकाची दोनशेची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड/बिलोली : जिल्ह्यातील तामसा येथे वनरक्षकाला अडीच हजार रुपये तर बिलोली तालुक्यातील केसराळी येथे ग्रामसेवकाला दोनशे रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले़ या प्रकरणात दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे़तेंदूपाने जमा केल्याची नोंद घेण्यासाठी पाच हजार रुपये लाचेची मागणी करुन तडजोडीअंती अडीच हजार रुपये स्वीकारणाऱ्या वनरक्षक नितीन चनबस स्वामी याला लाचलुचपत प्रतिबंधकच्या पथकाने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु होती़वनपरिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक कार्यालय, हदगावअंतर्गत तामसा, माळेगाव बिटचे वनरक्षक नितीन स्वामी यांच्याकडे त्यांचे व त्यांच्या सोबतच्या मजुराचे प्रोत्साहनात्मक रकमेचा धनादेश जमा केल्याचे व चालू वर्षी रजिस्टरमध्ये तेंदूपाने जमा केल्याची खरी नोंद घेण्यासाठी तक्रारदाराकडे पाच हजार रुपये लाचेची मागणी केली होती़ तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत विभागाने तामसा येथील बसस्थानक परिसरात पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली़तडजोडीअंती अडीच हजार रुपये देण्याचे ठरले़ १३ आॅक्टोबर रोजी तामसा बसस्थानक परिसरात सापळा रचण्यात आला़ यावेळी वनरक्षक नितीन स्वामी याला अडीच हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले़याप्रकरणी तामसा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु होती़ पोलीस अधीक्षक संजय लाठकर यांच्या मार्गदर्शनाखाली, उपअधीक्षक विजय डोंगरे, पोना़ साजीद अली, शेख चाँद अली साब, सुरेश पांचाळ, अमरजितसिंघ चौधरी, शिवहार किडे यांचा या कारवाईत सहभाग होता़तर दुसºया घटनेत, बिलोली तालुक्यातील केसराळी येथील ग्रामरोजगार सेवक वीरभद्र हणमंतराव घंटे यांनी प्रधानमंत्री घरकुल यादी प्रपत्र ‘ड' आॅनलाईन करण्यासाठी २०० रुपयांची लाच घेताना नांदेड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडून कारवाई केली़ सदर घटना १३ आॅक्टोबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली आहे.१५ आॅगस्टपासून बिलोली तालुक्यात प्रधानमंत्री प्रपत्र ‘ड' च्या घरकुल यादीत नावे आलेल्या लाभार्थ्यांची माहिती आॅनलाईन केली जात आहे.तालुक्यात सर्वत्र होत असलेल्या आॅनलाईन यादीसाठी संबंधित परिचारक लाभार्थ्यांकडून पैसे घेत असल्याची चर्चा असतानाच नांदेड येथील लाचलुचपत प्रतिबंधक अधिकारी बी.एल.पेडगावकर यांच्या टीमने सापळा रचून आरोपी ग्रामरोजगारसेवक वीरभद्र घंटे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे़ याप्रकरणी बिलोली पोलिसांत ग्रामरोजगार सेवकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

टॅग्स :NandedनांदेडCrime Newsगुन्हेगारीNanded policeनांदेड पोलीस