शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

नांदेड जिल्ह्यात केवळ १२ टक्के पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 00:08 IST

एकीकडे लोकसभा निवडणुकीचा प्रचार रंगात आला असताना मतदार राजा मात्र पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात आजघडीला केवळ १२.३७ टक्के जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे आगामी तीन महिने तहान कशी भागवायची याचीच चिंता अनेक भागातील नागरिकांना पडली आहे.

ठळक मुद्देतीन महिने तहान भागवायची कशी? याचीच जिल्हावासीयांना चिंता

नांदेड : एकीकडे लोकसभा निवडणुकीचा प्रचार रंगात आला असताना मतदार राजा मात्र पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात आजघडीला केवळ १२.३७ टक्के जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे आगामी तीन महिने तहान कशी भागवायची याचीच चिंता अनेक भागातील नागरिकांना पडली आहे.लोकसभा निवडणुकीसाठी रिंगणात उतरलेल्या १४ उमेदवारांचा प्रचार वेगात सुरू आहे. या उमेदवारांना स्थानिकांकडून पाण्याच्या प्रश्नावर उत्तर द्यावे लागत आहे. पाणी प्रश्न सोडवला जाईल, असे आश्वासन देवून उमेदवार परतत आहेत. पण नागरिक मात्र पाण्यासाठी भटकंती करत आहे.जिल्ह्यात असलेल्या दोन मोठ्या प्रकल्पापैकी मानार प्रकल्पात १९.४८ टक्के म्हणजेच २६.९२ दलघमी पाणी साठा आहे तर विष्णूपुरी प्रकल्पात १४.१६ दलघमी म्हणजेच १७.५३ टक्के पाणी उरले आहे. यातीलही उपयुक्त जलसाठा हा केवळ १४.१६ दलघमी इतका आहे. त्यामुळे नांदेड शहरावर भीषण जलसंकट घोंगावत आहे. महापालिकेने तसेच जिल्हा प्रशासनाने वेळीच उपाययोजना न केल्याने शहराला आता पाणी कपातीला तोंड द्यावे लागणार आहे. ही पाणी कपात १८ एप्रिल नंतर होणार हे निश्चित आहे. ही पाणीकपात आता तीन की चार दिवसाची राहील. हेच पहावे लागणार आहे.जिल्ह्यात ९ मध्यम प्रकल्प आहेत. या प्रकल्पात फक्त ८ टक्के जलसाठा उरला आहे. मध्यम प्रकल्पात ११.५ दलघमी जलसाठा आहे. उच्च पातळी बंधाऱ्याची क्षमता १२१.७० दलघमी इतकी असताना आजघडीला या बंधाऱ्यात ११.१४ दलघमी पाणी शिल्लक आहे. जिल्ह्यातील लघु प्रकल्पात १०.६३ टक्के पाणी राहिले आहे. ८८ लघु प्रकल्पात २०.३१ दलघमी पाणी राहिले आहे.जिल्ह्यात ८३.५८ दलघमी पाणीसाठा उरला आहे. या पाणी साठ्यातून तीन महिन्याची तहान भागवावी लागणार आहे.प्रशासकीय यंत्रणा १८ एप्रिल पर्यंत निवडणुकीत व्यस्त राहणार आहे. त्यानंतरच जिल्ह्यातील पाणी प्रश्नाकडे लक्ष वेधले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्रामस्थांना आता पिण्याच्या पाण्याची सोय करावी लागणार आहे.नांदेड परिमंडळात असलेल्या १४६ प्रकल्पामध्ये केवळ १०.८२ टक्के पाणी शिल्लक आहे. २९१ दलघमी साठा नांदेड, हिंगोली, यवतमाळ आणि परभणी जिल्ह्यात आहे. त्यातही सर्वाधिक पाणी इसापूर प्रकल्पात २०३.११ दलघमी म्हणजेच २१.७ टक्के आहे. त्याचवेळी हिंगोली जिल्ह्यातील येलदरी, सिद्धेश्वर प्रकल्प कोरडे पडले आहेत. त्यामुळे आगामी काळात तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणारमालेगावला इसापूरचे पाणी देण्यास दुजाभाव

  • अर्धापूर तालुक्यातील मालेगाव परिसराला इसापूर ऊर्ध्व पैनगंगा धरणाचे हक्काचे पाणी देण्यास शासन दुजाभाव करीत असून मालेगाव परिसराला पाणी देण्याची मागणी फेटाळली असून यामुळे शेतकरी वर्गात असंतोष निर्माण झाला आहे. मालेगाव परिसरातील गावांना ऊर्ध्व पैनगंगा धरणांचे पाणी देण्याचे आदेश तत्कालीन मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या काळात झाला होता. सद्यस्थितीत येलदारी व सिद्धेश्वर धरण कोरडे पडले आहेत.
  • या पार्श्वभूमीवर पूर्णा प्रकल्प अंतर्गत येणा-या लाभ क्षेत्रातील गावांना इसापूर धरणाचे पाणी दाभाडी नाल्यातून सोडण्यात यावे अशी मागणी या भागातील जेष्ठ नेते केशवराव इंगोले यांच्यासह अनेक शेतकरी यांनी जलसंपदा मंत्री यांच्याकडे केली. परंतु या मागणीकडे राजकारण पुढे करीत पाणी पाळी न देण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप केशवराव इंगोले यांनी केला आहे. पाणी सोडण्याची मागणी या भागातील शेतकरी यांनी पाटबंधारे विभागाकडे केली. पाटबंधारे विभागाने हा विषय महामंडळाकडे वर्ग केला. हिंगोली जिल्हातील दाभाडी नाल्याच्या दुरुस्ती साठी दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध असूनही हे काम रेंगाळले आहे.
  • दुष्काळी परिस्थितीत इसापुर धरणाचे पाणी देण्याचा निर्णय २००९ साली झाला होता. आम्ही निवेदनाद्वारे मागणी करूनही वरिष्ठ अधिकारी पाणी देण्यास टाळाटाळ करीत आहेत. या संदर्भात न्यायालयात धाव घेणार असल्याचे केशवराव इंगोले यांनी सांगितले.
टॅग्स :NandedनांदेडWaterपाणीvishnupuri damविष्णुपुरी धरणwater scarcityपाणी टंचाई