शहरं
Join us  
Trending Stories
1
कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
वंचित, कष्टकऱ्यांसाठी लढणारा महान संघर्षयोद्धा हरपला; बाबा आढाव यांच्या निधनानंतर पवार-फडणवीसांकडून म्हणून श्रद्धांजली
3
"ठाकरे ब्रँड एकच होता, सध्या राज ठाकरेंचा वापर करून..."; CM देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत
4
"असदुद्दीन ओवेसींचे पूर्वज हिंदू होते, ब्राह्मण कुटुंबात झाला होता जन्म" बृजभूषण शरण सिंह यांचा दावा 
5
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
6
“धर्मवीर ३ ची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, आनंद दिघे...”; एकनाथ शिंदेंनी सांगितले ‘राज’कारण
7
बाबरी मशिदीचे भूमिपूजन करणाऱ्या हुमायूं कबीर यांचा मोठा 'यू-टर्न'; आता काय म्हणाले?
8
1 रुपये 34 पैशांच्या शेअरची कमाल, ₹90 वर गेला भाव, खरेदीसाठी लोकांची झुंबड; आता कंपनीनं केली मोठी घोषणा!
9
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
10
गोवा अग्निकांडाचे आरोपी इंडिगोच्या फ्लाईटने फुकेतला पसार; पोलीस पोहोचण्याआधीच काढला पळ
11
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
12
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
13
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
14
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
15
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
16
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
17
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
18
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
19
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
20
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड जिल्ह्यात पावसाचे शतक साजरे; १०५ टक्के झाला पाऊस 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 18:42 IST

सर्वाधिक मुदखेड तालुक्यात तर सर्वात कमी पाऊस हदगावमध्ये

ठळक मुद्दे परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसानकाढणीला आलेल्या सोयाबीन, कापसाची मोठी हानी

नांदेड : गत चार वर्षांपासून कोरड्या दुष्काळाने होरपळणाऱ्या नांदेड जिल्ह्यावर यंदा परतीच्या पावसाची अधिकच कृपा झाल्यामुळे ओल्या दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे़ यावर्षी प्रथमच पावसाने शतक साजरे केले आहे़ एकूण १०५ टक्के पाऊस झाल्याची नोंद झाली आहे़ 

जिल्ह्यात शेवटच्या टप्प्यात पावसाने दिलासा दिल्याने पाणी टंचाईचे संकट दूर झाले़ नद्या, नाले, प्रकल्प, बंधारे पाण्याने भरले आहेत़ यावर्षीच्या पावसाची सरासरी कासवगतीने वाढली़ सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली़ त्यामुळे अर्धशतक गाठलेला पाऊस ७० टक्क्यांच्या दिशेने पुढे सरकला़  उत्तरा  व हस्त नक्षत्राने साथ दिल्याने शेतकरी सुखावला होता़ त्यातच विष्णूपुरी प्रकल्पही पूर्ण भरला़ मात्र दसऱ्यानंतर परतीच्या पावसाने सर्वत्र धुमाकूळ घातला़  जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ९५५ इतके आहे़ २० सप्टेंबर पर्यंत जिल्ह्यात ६८५़८८ मि़मी़ म्हणजेच वार्षिक सरासरीच्या ७४़४३ टक्के पावसाची नोंद झाली होती़ त्यानंतर या टक्केवारीत  हळूहळू वाढ होवू लागली़

परतीच्या पावसाने शेवटच्या टप्प्यात ९० टक्क्यापर्यंत पावसाची नोंद झाली़ तर ३० आॅक्टोबरपर्यंत जिल्ह्यात ९५०़८६ मि़ मी़ एकूण पावसाची नोंद करण्यत आली़ १० ते ११ तालुक्यातील पावसाची  नोंद शंभर टक्केहून अधिक झाली आहे़ जिल्ह्यात हदगाव, किनवट, माहूर या तालुक्यात मात्र इतर तालुक्यांच्या तुलनेत कमी पाऊस झाला आहे़ तर सर्वाधिक पाऊस मुखेड, कंधार तालुक्यात झाला आहे़ परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून काढणीला आलेल्या सोयाबीन, कापसाची मोठी हानी झाली आहे़ त्यामुळे ऐन दिवाळीत शेतकऱ्यांवर परतीच्या पावसाने संकट आणले़ यावर्षी सोयाबीन व कापसाचे पीक चांगले आले होते़ मात्र, हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतला़ परंतु या पावसाने भूगर्भातील पाणीपातळी उंचावली असून नद्या, नाल्यांना पाणी वाहत आहे़ त्यामुळे येणाऱ्या काळातील पाणीटंचाईचा प्रश्न मिटला आहे़ १ जून ते ३० आॅक्टोबर या कालावधीत झालेल्या पावसाची तालुकानिहाय वार्षिक टक्केवारी पुढील प्रमाणे, नांदेड- १२०़८० मि़ मी़, मुदखेड- १४७़०७, अर्धापूर -  १०२़८४, भोकर- १००़०३, उमरी - ९८़८७, कंधार- १३०़५१, लोहा- १२५़२१, किनवट- ७९़४३, माहूर - ८०़२३, हदगाव- ७८़७१, हिमायतनगर- ९३़०५, देगलूर- ९९़५२, बिलोली- १०७़०६, धर्माबाद- ११६़९४, नायगाव- ११४, मुखेड- ११९़०६ मि़मी़ 

२ नोव्हेंबरपर्यंत पाऊसहवामान खात्याने मराठवाड्यातील बहुतांश जागी पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला आहे़ २ नोव्हेंबरपर्यंत नांदेड, लातूर, उस्मानाबाद परभणी, हिंगोली, बीड या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटांसह पाऊस होणार असल्याचा अंदाज असून सावधानता बाळगावी,असे आवाहन केले आहे़ 

टॅग्स :RainपाऊसNandedनांदेडagricultureशेती