शहरं
Join us  
Trending Stories
1
बळीराजाची खरी दिवाळी...! जीएसटी कपातीचा शेतकऱ्यांना काय-काय फायदा होणार? एकदा पहाच... 
2
वाट माझी बघतोय रिक्षावाला संघटना खूश होणार; कार, दुचाकींवर लागणार एवढा जीएसटी...
3
GST: मोठी घोषणा! २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार; काय स्वस्त काय महागले...
4
GST Rate Cuts News: आरोग्य विमा, जीवन विम्यासह ३३ औषधांवर शून्य GST; विद्यार्थ्यांना काय...? 
5
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक
6
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
7
दादर टर्मिनसबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या; १०-१२ दुचाकी खाक
8
भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
9
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
10
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
11
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
12
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
13
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
14
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
15
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
16
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
17
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
19
पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना
20
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...

नांदेड जिल्ह्यातील प्रकल्पांत ५७ टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 19:31 IST

गतवर्षीच्या तुलनेत यंदा प्रकल्पात २१ दलघमी साठा अधिक

ठळक मुद्दे नांदेडकरांना मिळाला दिलासा

नांदेड : उशिरा का होईना जिल्ह्यातील मोठे, मध्यम, लघू व उच्च पातळी बंधाºयांत पाणीसाठा उपलब्ध झाला असून गतवर्षीच्या तुलनेत यंदा २१ दलघमी साठा अधिक झाला आहे़ सर्व प्रकल्पांत ५७ टक्के उपयुक्त साठा असल्याची नोंद झाली असून विष्णूपुरी व मानार हे प्रकल्प तुडुंब भरले आहेत़ त्यामुळे दुष्काळाने होरपळलेल्या अनेक गावांना या पाण्यामुळे दिलासा मिळाला आहे़ 

यंदा जून, जुलै व आॅगस्टमध्ये समाधानकारक पाऊस  न पडल्यामुळे   जिल्ह्यातील सर्व प्रकल्प कोरडेच होते़ विष्णूपुरी प्रकल्पाची अवस्था बिकट झाली होती़ मागील १५ वर्षांत प्रथमच विष्णूपुरी प्रकल्पात शून्य टक्के साठा शिल्लक राहिला होता़ त्यामुळे पाणीटंचाईचे मोठे संकट नांदेडसह, ग्रामीण भागात निर्माण झाले होते़ गत चार वर्षांपासून दुष्काळासोबत लढणाºया ग्रामीण भागातील नागरिकांसमोर यंदाही मोठे आव्हान निर्माण झाले होते़

 त्यामुळे पावसाची प्रतीक्षा करण्यात येत होती़ नाशिक विभागात झालेल्या पावसाने गोदावरीचे नदीपात्र वाहू लागले़ त्यामुळे जायकवाडी धरण भरले़ या पाण्यामुळे अर्ध्या मराठवाड्याची तहान भागली़ मात्र नांदेड जिल्ह्यातील सर्वच प्रकल्प रिकामे होते़ दरम्यान,  जिल्ह्यात शेवटच्या टप्प्यात पावसाने दिलासा दिल्याने पाणीटंचाईचे संकट दूर झाले असून नद्या, नाल्या व बंधारे भरले आहेत़ काही ठिकाणी अजूनही पावसाची गरज आहे़ गुरूवारी झालेल्या पावसामुळे जिल्ह्याची  टक्केवारी वाढली असून आतापर्यंत सरासरी ८७ टक्के पाऊस झाला आहे़ हस्ताच्या पावसाने ही टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे़ परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील एकूण पावसाची सरासरी वाढल्यास प्रकल्पातील साठ्यात होण्याची अपेक्षा आहे़ 

सध्या मानार प्रकल्पात उपयुक्त साठा १०२़६५ दलघमी, विष्णूपुरी प्रकल्पात ८०़७९,  नऊ मध्यम प्रकल्पांत ७०़२८, आठ  उच्च पातळी बंधाºयांत ५८़८० व ५८ लघू प्रकल्पांत १०५़३३ दलघमी पाणीसाठा उपलब्ध झाला आहे़ मात्र चार कोल्हापुरी बंधारे अद्यापही कोरडेच आहेत़ मागील वर्षी २० सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांत ३९१़ ५६ दलघमी साठा उपलब्ध झाला होता. यावर्षी २० सप्टेंबरपर्यंत ४१८़३७ दलघमी पाणी उपलब्ध झाले आहे़ सप्टेंबर अखेरपर्यंत जिल्ह्यातील प्रकल्पांत गतवर्षीपेक्षा चांगला पाणीसाठा आहे़ त्यामुळे दिलासा मिळाला.

विष्णूपुरी प्रकल्पामधील पाणी उपसून लाभक्षेत्रातील गावतळ्यामध्ये व लाभक्षेत्रामध्ये सोडण्याची पायाभूत सुविधा आहे़ त्यामुळे खरीप, रबी व उन्हाळी अशा तीन हंगामात हे पाणी उपसून ग्रामीण भागात सोडले जाऊ शकते़ परंतु त्यादृष्टीने नियोजन करावे, अशी मागणी पुढे येत आहे़

आतापर्यंत जिल्ह्यात ६८५ मि़मी़पाऊसयंदा मृगासह आर्द्रा व इतर नक्षत्र कोरडेच गेले होते़ त्यामुळे शेतकºयांसह सर्वांच्याच तोंडचे पाणी पळाले होते़ परंतु, आॅगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पावसाने जोरदार बॅटिंग केली़ त्यामुळे जिल्ह्यात ९५५ मि़मी़सरासरीच्या आतापर्यंत ६८५ मि़मी़पावसाची नोंद झाली आहे़ सरासरी गाठण्यासाठी अद्यापही २७० मि़मी़पावसाची गरज आहे़ विष्णूपुरी प्रकल्पक्षेत्रात यंदा तुलनेत कमी पाऊस झाला असला तरी, नाशिकमध्ये पडलेल्या पावसाने जायकवाडी धरण शंभर टक्के भरले़ त्यामुळे जायकवाडीतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला़ हे पाणी विष्णूपुरीला मिळाले़ काही दिवसांपूर्वी विष्णूपुरी प्रकल्पक्षेत्रातही चांगला पाऊस झाल्याने विष्णूपुरी प्रकल्प भरला. 

टॅग्स :vishnupuri damविष्णुपुरी धरणNandedनांदेडWaterपाणीRainपाऊस