शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

नांदेड जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश मंत्र्यांनी केला रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 01:05 IST

माहूर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष, नगरसेवक अपात्र प्रकरणी नांदेड जिल्हाधिकारी यांनी दिलेला १९ डिसेंबरचा आदेश तांत्रिकदृष्ट्या सदोष असल्याचे मत नोंदवित राज्यमंत्र्यांनी तो आदेश रद्द केला आहे़ त्यामुळे अपात्र ठरलेल्या नगराध्यक्षांसह नगरसेवकांना मोठा दिलासा मिळाला आहे़

ठळक मुद्देमाहूरचे अपात्रतेचे प्रकरणआदेश तांत्रिकदृष्ट्या सदोष असल्याचे मत

माहूर : माहूर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष, नगरसेवक अपात्र प्रकरणी नांदेडजिल्हाधिकारी यांनी दिलेला १९ डिसेंबरचा आदेश तांत्रिकदृष्ट्या सदोष असल्याचे मत नोंदवित राज्यमंत्र्यांनी तो आदेश रद्द केला आहे़ त्यामुळे अपात्र ठरलेल्या नगराध्यक्षांसह नगरसेवकांना मोठा दिलासा मिळाला आहे़माहूर नगरपंचायत हद्दीतील गाळे लिलावात अनियमितता झाल्या- प्रकरणी १९ डिसेंबर रोजी आदेश क्रमांक ४५/२०१७ व प्रकरण क्रमांक १७/२०१८ ने नगराध्यक्ष, उपाध्यक्षसह ११ नगरसेवकांना जिल्हाधिकाºयांनी अपात्र केले होते. जिल्हाधिकारी यांच्या निर्णयानंतर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती. निर्णयावर नगराध्यक्ष फिरोज कादर दोसानी व शीतल मेघराज जाधव यांनी महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती, औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ च्या कलम ४४ (४) अन्वये नगर विकास विभागाचे राज्यमंत्री रणजित पाटील यांच्याकडे अपिल दाखल केले होते. सदर अपीलाच्या अनुषंगाने राज्यमंत्री नगरविकास यांच्याकडून प्राप्त आदेशानुसार, संदर्भाधिन जिल्हाधिकारी नांदेड यांच्या १९ डिसेंबर रोजीच्या आदेशाला पुढील आदेशापर्यंत २९ डिसेंबरला स्थगिती दिली होती.त्यानंतर ३ जानेवारी रोजी या प्रकरणी मंत्रालयात राज्यमंत्री यांच्या दालनात सुनावणी झाली होती. या सुनावणीनंतर १७ जानेवारीला सदर प्रकरणी नगरविकास विभाग राज्य मंत्री यांनी अपिलार्थी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व ९ नगरसेवक त्याचप्रमाणे नगरसेविका आशाताई निरधारी जाधव, दीपाली नाना लाड या दोन सदस्याविरूद्धही कलम ५५(ए)(बी)/४२ मधील तरतुदीनुसार अपात्रतेची कार्यवाही करण्यात यावी. गैरवर्तणुकीच्या बाबी त्यांना कळवून विभागाने तत्काळ कारणे दाखवा नोटीस द्यावी, तत्कालीन मुख्य अधिकारी यांच्याविरूद्ध तत्काळ विभागीय चौकशीची कार्यवाही सुरू करावी, प्रतिवादी यांना नगर- पंचायतीने त्यांनी केलेल्या अतिक्रमणाबाबत नोटीस दिली आहे, किंवा कसे ही बाब तपासून जिल्हाधिकाºयांनी यासंदर्भात पुढील योग्य ती कार्यवाही करून शासनास अहवाल सादर करावा, असे म्हटले आहे़कलम ५५(ए) (बी)/४२ मधील कार्यवाही पूर्ण होईपर्यंत अपिलार्थी हे अध्यक्ष, उपाध्यक्ष, नगरसेवक पदावर कार्यरत राहतील, असे महत्त्वपूर्ण आदेश दिले आहे. या आदेशाने ‘कही खुशी कही गम’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नगराध्यक्ष, नगरसेवकांच्या अपात्रतेच्या प्रकरणामुळे उलटसुलट चर्चा होती़‘कही खुशी, कही गम’नगरविकास विभागाचे राज्यमंत्री रणजित पाटील यांनी या प्रकरणातील प्रतिवादी शिवलिंग बळीराम टाकलीकर नगरपंचायतीने त्यांनी केलेल्या अतिक्रमणाबाबत नोटीस दिली आहे का ? ही बाब तपासून जिल्हाधिकाºयांनी या संदर्भात पुढील योग्य ती कार्यवाही करून शासनास अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत़ या आदेशामुळे एकीकडे अपात्र नगराध्यक्ष, नगरसेवकांना मोठा दिलासा मिळाला आहे़ माहूरमध्ये दिवसभर या विषयाची चर्चा सुरु होती़

टॅग्स :NandedनांदेडNanded collector officeजिल्हाधिकारी कार्यालय नांदेडcollectorजिल्हाधिकारी