शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड शहर स्वच्छता निविदेचा निकाल सोमवारी लागणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 00:18 IST

दोन महिन्यापासून वादात पडलेल्या स्वच्छता निविदेचा निकाल ५ फेब्रुवारी रोजी लागण्याची अपेक्षा आहे. महापालिकेला हा निकाल आपल्या बाजुने लागण्याची अपेक्षा आहे तर न्यायालयात गेलेल्या ठेकेदारानेही पुढची तयारी केल्याचे सांगण्यात येत आहे.

ठळक मुद्दे कचरा प्रश्न ६ महिन्यांपासून प्रलंबित

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : दोन महिन्यापासून वादात पडलेल्या स्वच्छता निविदेचा निकाल ५ फेब्रुवारी रोजी लागण्याची अपेक्षा आहे. महापालिकेला हा निकाल आपल्या बाजुने लागण्याची अपेक्षा आहे तर न्यायालयात गेलेल्या ठेकेदारानेही पुढची तयारी केल्याचे सांगण्यात येत आहे.शहर स्वच्छतेच्या निविदामध्ये वर्षाच्या सुरुवातीला आर अ‍ॅन्ड बी या मुंबईच्या ठेकेदाराच्या निविदा कमी दराने असल्याने त्या मंजूर करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. या निर्णयास महापालिकेच्या पहिल्या सर्व साधारण सभेत मान्यताही देण्यात आली होती. मात्र या प्रक्रियेत दुसºया क्रमांकाचे दर असलेल्या बेंगळूरूच्या पी गोपीनाथ रेड्डी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली. या प्रकरणाच्या सुनावणीत खंडपीठाने प्रारंभी आयुक्तांच्या स्तरावरच निर्णय घ्यावा, असे आदेश पारित केले होते. या आदेशानंतर आयुक्त गणेश देशमुख यांनी आर अ‍ॅन्ड बी आणि पी गोपीनाथ रेड्डी या दोघांचीही समोरासमोर बाजू ऐकून घेतली. त्यानंतर सदर प्रकरणात आर अ‍ॅन्ड बी या ठेकेदाराला कार्यारंभ आदेश देण्या संदर्भात सूचना दिल्या होत्या. ही बाब समजताच पी गोपीनाथ रेड्डी यांनी पुन्हा एकदा न्यायालयाचा दरवाजा ठोठावताना न्यायाची मागणी केली आहे.मुंबईच्या आर अ‍ॅन्ड बी या ठेकेदारास घरोघरी जाऊन कचरा उचलण्याचा अनुभव नाही. मुंबईमध्ये फ्लॅट सिस्टीममध्ये एकाच ठिकाणाहून कचरा संकलित केला जातो. आपल्याला तसा अनुभव असल्याचे पी गोपीनाथ रेड्डी यांनी आपल्या रिट याचिकेत नमुद केले आहे. विशेष म्हणजे पी गोपीनाथ रेड्डी यांनी आर. अ‍ॅन्ड बी या ठेकेदाराने दिलेल्या दरातच काम करण्याची तयारीही दर्शविली आहे. असे असताना महापालिकेने निविदा प्रक्रियेत ज्या ठेकेदाराचे दर सर्वात कमी असतील त्यांच्याशी करार करणे नियमानुसार आवश्यक असल्याचे सांगितले. दुसºया क्रमांकाचे दर असलेल्या ठेकेदाराने अशा पद्धतीने पहिल्या ठेकेदाराच्या दरात काम करण्याची तयारी दर्शविली तर त्याला काम देणे ही बाब नियमात बसत नसल्याचे स्पष्ट केले आहे.