शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

नांदेडच्या कुणाल व कपिलची राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारावर मोहोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 17:33 IST

भोंगा, पाणी चित्रपटात दोघांच्या दमदार भूमिका 

ठळक मुद्देकपिल कांबळे व कुणाल गजभारे यांच्या चित्रपटात मुख्य भूमिकाराष्ट्रीय चित्रपट पुरस्कारावर नांदेडची मोहोर

- भारत दाढेल 

नांदेड : यंदाच्या राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात नांदेडच्या कुणाल गजभारे व कपिल कांबळे या दोन अभिनेत्यांनी आपली मोहोर उमटवली़ चित्रपटसृष्टीतील पदार्पणातच राष्ट्रीय पुरस्कार मिळविणाऱ्या या दोन कलावंतांची नाळ येथील मातीशी जोडल्या गेली असल्याने सिनेसृष्टीत नांदेडचा दबदबा निर्माण झाला आहे़

६६ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून घोषित झालेला ‘भोंगा’ व पर्यावरण संवर्धनावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलेला ‘पाणी’  या  दोन्ही चित्रपटात कपिल कांबळे व कुणाल गजभारे यांनी भूमिका साकारली आहे़ त्यांच्या अभिनयाची दखल  राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे़ न्यूयार्क  व गोवा येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात  समीक्षकांनी भोंगा व पाणी या चित्रपटांचे कौतुक केले आहे़ हा यशस्वी प्रवास दोन्ही कलावंतांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला़ नांदेड येथील लोकमित्रनगर येथे राहणारा कपिल अशोकराव कांबळे हा युवा कलावंत भोंगा मध्ये मुख्य भूमिका साकारत आहे़ यापूर्वी त्याने पाटील चित्रपटात साकारलेला खलनायक गाजल्यानंतर भोंगा या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे़ देगलूर येथील शालेय व महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर स्वारातीम विद्यापीठात एम़ ए़ नाट्य शास्त्राची पदव्युत्तर पदवी हातात घेऊन कपिल थेट मुंबईला निघाला़ रंगभूमीवर काही नाटकातून काम  केलेल्या कपीलचे अनोळखी असलेल्या चित्रपटसृष्टीत  सुरूवातीचे पाच, सहा वर्षे अत्यंत खडतर गेले़ सुरुवातीला टीव्हीवरील लक्ष्य, क्राईम पेट्रोल या मालिकेत काम करून पोटाची सोय करता आली़ एक दिवस धग चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माता शिवाजी लोटन पाटील यांचा फोन आला आणि भोंग्या या चित्रपटात तू मुख्य भूमिका करत असल्याचे त्यांनी सांगितले़ 

‘पाणी’ चित्रपटात खलनायकश्रीनगर येथील कुणाल विठ्ठलराव गजभारे या युवा कलावंताने आदिनाथ कोठारे दिग्दर्शित ‘पाणी’ या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारली आहे़ तसेच या चित्रपटाचे संवाद लेखन व कास्टिंगची महत्त्वाची भूमिकाही पार पाडली आहे़ प्रियंका चोप्रानिर्मित पाणी या चित्रपटात काम  करणारे आदिनाथ कोठारे, सुमेध भावे, किशोर कदम आदी कलावंतांना नांदेड जिल्ह्यातील भाषा शिकविण्याचे कामही कुणालने केले आहे़  च् ‘पाणी’ हा चित्रपट मुळात नांदेडच्या मातीत निर्माण झालेला चित्रपट आहे़ जिल्ह्यातील नागदरवाडीतील हनुमंत केंद्रे यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे़ त्याचे संपूर्ण चित्रिकरण कंधार- लोहा तालुक्यात झाले आहे़ 

या चित्रपटाचे दिग्दर्शन  नांदेडचे भूमिपुत्र दिग्दर्शक कुणाल गजभारे यांनी केले आहे़ हा अनुभव सांगताना कुणाल म्हणाला, मुंबई विद्यापीठात एम़ ए़ नाट्यशास्त्राची पदवी घेतल्यानंतर हळूहळू सिनेसृष्टीत अभिनय, दिग्दर्शन, लेखन आदी कामे करण्याची संधी मिळू लागली़ बाबा आमटे या चित्रपटाचे कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम केले. ‘पाणी’ चित्रपटासाठी नितीन दीक्षित यांचा फोन आल्यानंतर मी आदिनाथ कोठारे यांना भेटलो़ त्यांनी मला या चित्रपटाच्या कथेतील संवाद नांदेड जिल्ह्यातील भाषेत लिहिण्यास सांगितले़ कारण हा चित्रपटच कंधार, लोहा परिसरात तयार होणार होता़ मी माझ्या भाषेत लिहिलेले संवाद त्यांना आवडले़ आणि मग या चित्रपटाच्या विविध जबाबदाऱ्याही माझ्यावर त्यांनी टाकल्या़ या चित्रपटातील भाषा ही नांदेडच्या मातीतील आहे़ या चित्रपटात नांदेडमधील कलावंत दिनेश कवडे, रवी जाधव, किरण कवडे, गणेश जयस्वाल, अनुराधा पत्की यशवंत कागणे, माधुरी लोकरे, विजय गजभारे, महेश घुंगरे, बळी डिकळे, मयूर दवणे, प्रमोद देशमुख आदी कलावंतांनी यात भूमिका साकारल्या आहेत़

टॅग्स :National Film Awardsराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2018Nandedनांदेडcinemaसिनेमा