शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडमध्ये क्रिकेटवर सट्टेबाजी करणारे दोघे ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 00:55 IST

गुरुवारी भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सामन्यावर सट्टा चालविणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चैतन्यनगर भागातून ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्याकडून सुमारे ४५ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिस पथकाला यश आले असून शहरात आणखी कुठे क्रिकेटवर सट्टा चालू आहे काय? याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: गुरुवारी भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सामन्यावर सट्टा चालविणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चैतन्यनगर भागातून ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्याकडून सुमारे ४५ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिस पथकाला यश आले असून शहरात आणखी कुठे क्रिकेटवर सट्टा चालू आहे काय? याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.गुरुवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला भाग्यनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चैतन्यननगर भागातील हनुमान मंदिरा नजिकच्या एका झाडाजवळ भाड्याच्या खोलीत सुधीर पाटील नावाची व्यक्ती क्रिकेट सामन्यावर सट्टा चालवित असल्याची माहिती मिळाली. या माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिस निरीक्षक निकाळजे यांनी पोलिस अधीक्षक संजय जाधव आणि अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांना या प्रकाराबाबत माहिती दिली. यावर संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश आल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चैतन्यनगर भागातील संबंधित ठिकाणी धाड टाकून सुधीर लक्ष्मण पाटील (वय ४२, रा. वैभवनगर) आणि पवन अशोक जाधव (वय २७, रा. भगिरथनगर) या दोघांना ताब्यात घेतले. सदर सट्टा लावण्याकरिता आणखी कोण सामिल आहे याबाबतची विचारणा केल्यानंतर सदर सट्याचे काम लातूर जिल्ह्यातील बाभूळगाव येथील मलंग सेठ यांना देत असल्याचे दोघांनी पोलिसांना सांगितले. यावेळी घटनास्थळावरुन रोख १६ हजार रुपये, ६ मोबाईल, एक एलईडी टीव्ही आणि नोटबुकचे पान असा ४५ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदरची कारवाई पोलिस निरीक्षक निकाळजे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक दिघोर, उपनिरीक्षक वाघमारे, शाहू, जांबळीकर, पांगरीकर आदींनी केली.

टॅग्स :NandedनांदेडCricket Bettingक्रिकेट सट्टेबाजी