शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड जिल्ह्यात द्वारपोच योजनेत नमनालाच खोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 01:02 IST

जिल्ह्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत स्वस्त धान्य दुकानापर्यंत धान्य पोहोचवण्याच्या अन्नधान्य द्वारपोच योजनेस माथाडी कामगारांनी संप मागे घेतल्यानंतर प्रारंभ झाला. मात्र आता उर्वरित दिवसांत एप्रिल महिन्याचे धान्य स्वस्त धान्य दुकानापर्यंत पोहोचेल काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देमहिना संपत आला तरी अन्नधान्य वाहतूक होईना

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : जिल्ह्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत स्वस्त धान्य दुकानापर्यंत धान्य पोहोचवण्याच्या अन्नधान्य द्वारपोच योजनेस माथाडी कामगारांनी संप मागे घेतल्यानंतर प्रारंभ झाला. मात्र आता उर्वरित दिवसांत एप्रिल महिन्याचे धान्य स्वस्त धान्य दुकानापर्यंत पोहोचेल काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.जिल्ह्यातील २३ शासकीय गोदामांतून १ हजार ९८८ रास्त भाव दुकानापर्यंत माल पोहोचवण्यासाठी लक्ष्य निर्धारित अन्नधान्य द्वारपोच योजनेस सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करण्यासाठी मे. पारसेवार अ‍ॅन्ड कंपनीला २०२१ पर्यंतचे कंत्राट दिले आहे. भारतीय अन्न महामंडळाचे डेपो ते शासकीय अन्नधान्य गोदामापर्यंत पहिल्या टप्प्याची वाहतूक सुरू झाली आहे तर दुसऱ्या टप्प्यात शासकीय गोदाम ते रास्त भाव दुकानापर्यंत वाहतूक केली जाणार आहे. या सर्व वाहतुकीसाठी त्या त्या तहसीलदारांनी मार्ग ठरवून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.मात्र ही योजना सुरू झाली असली तरीही प्रत्यक्षात स्वस्त धान्य दुकानापर्यंत प्रत्यक्ष माल पोहोचलाच नाही. नांदेड जिल्ह्यात २१ मार्च २०१८ रोजी आदेश निघाले आहेत. मात्र हमाल माथाडी कामगारांच्या संपामुळे धान्य उचलच झाली नव्हती.दुसरीकडे स्वस्त धान्य दुकानदारांनी चालान भरले आहे. परमीटही तयार आहेत. २६ एप्रिल पर्यंत धान्य न उचलल्यास हे परमीट लॅप्स होईल. त्यांचे पुन्हा नूतनीकरण करावे लागणार आहे. आजघडीला शासकीय धान्य गोदामापासून दुकानापर्यंत नेण्यासाठी सरासरी ७० रुपये प्रतिक्विंटल खर्च येतो. त्यात वाहतूक रिबेटचे १६.५३ पैसे जोडल्यास एकूण खर्च हा ८६.५३ रुपये प्रति क्विंटल असा नाहक भूर्दंड दुकानदाराला सोसावा लागणार आहे. त्यातच ऐन डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या कालावधीत नागरिकांना धान्य मिळाले नाही. ही ओरडही मोठ्या प्रमाणात झाली आहे. स्वस्त धान्य दुकानदारांना येणारा अतिरिक्त खर्च हा कंत्राटदाराच्या देयकातून कपात करावा, अशी मागणी नांदेड जिल्हा रास्ता भाव दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक एडके यांनी जिल्हा पुरवठा अधिकाºयांकडे केली आहे.एकट्या नांदेड तालुक्याची स्थिती पाहता नांदेड तालुक्यात २३ हजार ९७७ क्विंटल धान्य नियतन मंजूर आहे. एक आठवड्यात या धान्याची केवळ १३ वाहनांमधून वाहतूक कशी होईल? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. वाहन वाढवून देण्याबाबत कंत्राटदाराला आदेशित केले असले तरी वाहनांची संख्या अद्यापही वाढली नसल्याचे स्वस्त धान्य दुकानदारांनी सांगितले.जिल्ह्यात एपीएल शेतकरी योजनेत १६ हजार ७७७ क्विंटल गहू तर १० हजार ९३९ क्विंटल तांदूळ वितरित केला जातो. तर अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांनाही २४ हजार ८६५ क्विंटल आणि प्राधान्य कुटुंब योजनेच्या लाभार्थ्यांना ९४ हजार ८४३ क्विंटल धान्य वितरित करण्यात येते. हे सर्व धान्य आता गोदामातून थेट स्वस्त धान्य दुकानापर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.वाहनांना हिरवा रंग बंधनकारकद्वारपोच अन्नधान्य योजनेअंतर्गत गोदामापासून स्वस्त धान्य दुकानापर्यंत धान्य पोहोचवणाºया वाहनांना हिरवा रंग लावणे आवश्यक आहे. जेणेकरुन या वाहनाद्वारे सिमेंट, कोळसा, रासायनिक खते इ. वस्तूंची वाहतूक होऊ नये. या वाहनांना कंत्राटदाराने जीपीएस यंत्रणा बसवणे बंधनकारक आहे. त्याचवेळी या वाहनावर सार्वजनिक वितरण व्यवस्था महाराष्ट्र शासन असा नामफलकही आवश्यक आहे. या सर्व नियमांची अंमलबजावणी अद्याप तरी झाली नसल्याचे दिसत आहे.

 

टॅग्स :Nanded collector officeजिल्हाधिकारी कार्यालय नांदेडNandedनांदेड