लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : विविध स्पर्धा आणि मनोरंजनाची धमाल घेऊन येणाऱ्या ‘माझं माहेर, माझं कलर्स’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून सखींनी आनंद आणि उत्साहाचे विविध रंग अनुभवले. सखींना प्रफुल्लित करणारा हा कार्यक्रम कलर्स चॅनल आणि लोकमत सखी मंचतर्फे सोमवार, ३० एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला होता. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात झालेल्या या कार्यक्रमाला सखींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.‘कलर्स चॅनल’ आणि ‘लोकमत सखी मंच’ मनोरंजनाच्या अनेक रंगांमध्ये आपल्या रसिकांना रंगवून टाकतात. त्याचप्रमाणे ‘माझं माहेर, माझं कलर्स’ हा कार्यक्रम म्हणजे सखींच्या उत्साहाचा उत्सवसोहळाच होता. ‘रंगुनी रंगात साºया, रंग माझा वेगळा’ या ओळीप्रमाणे मनोरंजनाचा एक वेगळा रंग कलर्स चॅनलतर्फे ‘लोकमत सखी मंच’ च्या माध्यमातून आपल्या पे्रक्षकांसाठी आणण्यात आला होता.यामध्ये रेसिपी आणि पारंपरिक वेशभूषेवर आधारित फॅशन शो अशा स्पर्धा घेण्यात आल्या. सखींच्या उत्साहपूर्ण प्रतिसादामुळे प्रत्येक स्पर्धेची रंगत अधिकच वाढली. रेसिपी स्पर्धेमध्ये आपल्या पाककलेचे कौशल्य दाखवत सखींनी रबडी विथ मँगो शेक, कैरीची पौष्टिक पेज, कैरीचे थालीपीठ, काजू मँगो रोल यासारखे नावीन्यपूर्ण पदार्थ बनवून आणले होते. फॅशन शोमध्ये सखींनी भारताच्या विविध प्रांतांमधील वेशभूषा केल्या होत्या. यातून वेगवेगळ्या प्रांतिक रंगात रंगलेल्या संस्कृतीचे दर्शन घडले. कलर्स चॅनलच्या कार्यक्रमातून आपल्याला दिसतात रोमान्स, ड्रामा, कॉमेडी, बदला यासारख्या विविध भावभावनांचे रंग. लंडन येथे दीपसोबत ‘इश्क में मरजावा’ मालिकेत आरोही घेणार आपल्या अपमानाचा बदला. यात दिसणार अपमानाचा रंग, तर ‘तू आशिकी’मध्ये आहानचे पंक्तीवर असलेले जिवापाड प्रेम आणि त्या प्रेमापोटी जे.डी.पासून वाचविण्याचा त्याचा आटोकाट प्रयत्न, हा एक वेगळाच रंग बघावयास मिळतो. ‘बेपनाह’मध्ये झोयाला कळणार आहे आपल्या नवºयाच्या प्रेमाचे रहस्य. तिच्या विश्वासाला तडा जाणार असून, विश्वासघाताचा हा रंग आणखी किती वेगळे वळण घेणार हे येणाºया काळातच समजेल.‘माझं माहेर, माझं कलर्स’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून मनोरंजन व स्पर्धांचे विविध रंग अनुभवायला मिळाल्याची आनंददायी प्रतिक्रिया सखींनी नोंदविली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन औरंगाबाद येथील नितीन दीक्षित यांनी केले.कलर्स स्पर्धांमधील विजेतेकलर्सतर्फे प्रेक्षकांसाठी घेतल्या गेलेल्या स्पर्धांमध्ये विजेत्या अंजना बोखारे, अनुराधा केंद्रे, अंजली चौधरी, सुनीता शिंदे, अॅड. शलाका डमढेरे.विविध स्पर्धांमधील विजेते४रेसिपी स्पर्धा विजेत्या- स्वाती रावत, मोनाली सोनवणे, मीना पोपशेटवार.४फॅशन शो विजेत्या -रेखा धूत, रोहिणी कुलकर्णी, तेजश्री कुलकर्णी.आशा पारवेकर व कल्याणी हुरणे यांनी फॅशन शो व रेसिपी शोचे परीक्षण केले.
‘माझं माहेर, माझं कलर्स’ची धमाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 01:17 IST
विविध स्पर्धा आणि मनोरंजनाची धमाल घेऊन येणाऱ्या ‘माझं माहेर, माझं कलर्स’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून सखींनी आनंद आणि उत्साहाचे विविध रंग अनुभवले. सखींना प्रफुल्लित करणारा हा कार्यक्रम कलर्स चॅनल आणि लोकमत सखी मंचतर्फे सोमवार, ३० एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला होता. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात झालेल्या या कार्यक्रमाला सखींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
‘माझं माहेर, माझं कलर्स’ची धमाल
ठळक मुद्देस्पर्धांची रंगत : कलर्स आणि लोकमत सखी मंचचा कलरफुल नजराणा