शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

बिलोली, भोकर येथे मुस्लिमांचा मूक मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 00:47 IST

बाबरी मशिद पुर्वीच्याच ठिकाणी बांधण्यात यावी, अशी मागणी बिलोली तालुक्यातील मुस्लिम बांधवांनी एका निवेदनाद्वारे राष्ट्रपती कोविंद यांच्याकडे केली असून गुरूवारी शहरात मूक मोर्चा काढण्यात आला़

बिलोली : बाबरी मशिद पुर्वीच्याच ठिकाणी बांधण्यात यावी, अशी मागणी बिलोली तालुक्यातील मुस्लिम बांधवांनी एका निवेदनाद्वारे राष्ट्रपती कोविंद यांच्याकडे केली असून गुरूवारी शहरात मूक मोर्चा काढण्यात आला़मुस्लिम समाजाची पवित्र बाबरी मशीद ६ डिसेंबर १९९२ रोजी उद्ध्वस्त करुन मुस्लिम व इस्लाम धर्माच्या भावना दुखावल्या. या घटनेचा निषेध व्यक्त करीत बिलोली येथे मुस्लीम बांधवाकडुन मूक मोर्चा काढण्यात आला़ या मूक मोर्चात कुंडलवाडी, मुतन्याळ, रामतीर्थ, कासराळी यासह परीसरातील असंख्य मुस्लिम बांधवांनी सहभाग घेतला़ येथील तहसील समोर मुस्लीम बांधवांना मौलाना मुबिन खान, मौलाना अहेमद बेग इनामदार, सुलेमान शेख, पाशाभाई गादीलगे, वलिओद्दीन फारुखी आदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या़ यावेळी पोलीस निरीक्षक भगवान धबडगे यांनी चोख पोलीस ठेवला होता. सूत्रसंचालन ए. जी. कुरेशी यांनी केले़ अहेमद मौलाना यांनी दुवा करुन मोर्चाची सांगता केली़यशस्वीतेसाठी नगरसेवक जावेद कुरेशी, शाहेद बेग, अमजद चाऊश, शफी बिल्डर, मैनोद्दिन शेख, बाबा कुरेशी, दादेसहाब कुरेशी, गफ्फार कुरेशी, रहिम कुरेशी, समिर पटेल, जुबेर पटेल,नोमान फारुखी, अ.अतीख अ.हफीज, फराज पटेल यांच्यासह अनेक मुस्लिम बांधवांनी सहकार्य केले आहे.शहरातील प्रतिष्ठाने बंदशहरातील मुस्लिम समाजाने आपली दुकाने, हॉटेल, पानटपरी, मेडिकल आदी दुकाने बंद करुन सदरील घटनेचा निषेध केला आहे. या मोर्चात तालुक्यातील कासराळी, कुंडलवाडी, रामतीर्थ, बडूुर, मुतन्याळ आदी गावातील अनेक मुस्लिम बांधव सहभागी झाले होते.भोकर येथे मुस्लिम समाजाची मूक रॅलीभोकर : बाबरी मशिद पाडल्यानंतर भारतीय मुस्लिम समाजाची मने दुखावली गेली. यासाठी बाबरी मशिद पुन्हा त्याच ठिकाणी बांधण्यात यावी, यामागणीचे निवेदन जमियत उलैमा ए हिंद च्या वतीने उपविभागीय अधिकारी पवन चांडक यांना गुरुवारी देण्यात आले. या घटनेच्या निषेधार्थ मुस्लिमांनी आपली दुकाने बंद ठेवून बाबरी मशिद त्याच ठिकाणी बांधण्यात यावी, या मागणीसाठी मक्का मशिद सोहराबपुरा येथुन तहसील कार्यालयापर्यंत मूक रॅली काढली़ रॅलीत जमियत ए उलैमा चे मौलाना मुबिन खाँन, शेख युसुफ, काजी जमील, मौलाना हाफिज, कामरान हाफिज, शुजाऔद्दिन हाफिज, सद्दाम काजी, मौलाना मस्लियोद्दीन, अ‍ॅड. मुजाहेद शेख, अ‍ॅड. अल्तमश, हमीद खान पठाण, जवाजोद्दिन बडबडेकर, शमीमोद्दिन ईनामदार, अहेमद करखेलीकर, सऊद गौंदवाले, नाजिम बाबा, सय्यद जुनेद, बाबा खाँन, सनाओद्दीन ईनामदार, अफसर भाई, जुनेद पटेल, रफीख खतीब, ईरशाद पठान, आसिफ तामसेकर आदी सहभागी झाले़

टॅग्स :NandedनांदेडMuslimमुस्लीमagitationआंदोलन